आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coronavirus Reinfections (Second Time) Cases Explained; Indian Council Of Medical Research (ICMR) Latest Study

भास्कर एक्सप्लेनर:कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढला; जाणून घ्या यावर IMCR चा काय आहे अभ्यास आणि तज्ज्ञांचे मत

आबिद खानएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोरोना रीइन्फेक्शन म्हणजे काय? ते समजून घेऊयात -

जर एखाद्या व्यक्तीला एकदा कोरोना होऊन गेला आणि आता तो पुन्हा होणार नाही, असे जर का तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्ही चुक करत आहेत. वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील भारताची सर्वोच्च संस्था इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने केलेल्या दाव्यानुसार, भारतात कोरोना विषाणूच्या रीइन्फेक्शनची 4.5% प्रकरणे समोर आली आहेत. म्हणजेच 100 पैकी 4.5 लोक असे आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि नंतर पुन्हा त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे आणि रविवारी पहिल्यांदाच एका दिवसात देशात एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणू पुन्हा संक्रमित करु शकतो की नाही हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.

चला, तर मग रीइन्फेक्शन म्हणजे काय आणि कोरोना व्हायरस दुसर्‍या वेळी आपल्यास कसा संक्रमित करू शकेल?, ते समजून घेऊयात -

कोरोना रीइन्फेक्शन म्हणजे काय?

 • कोरोना रीइन्फेक्शन म्हणजे कोरोनामुळे दुस-यांदा संक्रमित होणे. आयसीएमआरने नमूद केले आहे की, जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि 102 दिवसांत ती व्यक्ती निगेटिव्ह होऊन पुन्हा पॉझिटिव्ह झाली तर त्याला रीइन्फेक्शन म्हटले जाईल.
 • आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने जे दोनदा कोरोना पॉझिटिव्ह झाले, अशा 1,300 लोकांच्या प्रकरणांचा तपास केला. संशोधनात 1,300 पैकी 58 प्रकरणे, म्हणजे 4.5% लोकांना रीइन्फेक्शन झाल्याचे आढळून आले आहे. या अभ्यासात म्हटले आहे की SARS-CoV-2 रीइन्फेक्शनची व्याख्या सर्विलान्स वाढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हा अभ्यास एपिडेमियोलॉजी अँड इन्फेक्शन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.सार्वजनिक आरोग्य आणि धोरण तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांचे म्हणणे आहे की, रीइन्फेक्शन म्हणजे काय हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. जोपर्यंत पॉझिटिव्ह प्रकरणांची जीनोम सिक्वेसिंग होणार नाही, तोपर्यंत कोरोना रीइन्फेक्शन झाल्याचा दावा सांगता येत नाही.

रीइन्फेक्शन नसल्यास रिपोर्ट पॉझिटिव्ह का येतो?

 • जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथील कन्सल्टंट जनरल मेडिसिन डॉ. रोहन सिकोइया म्हणतात की, कोरोना विषाणूमुळे पुन्हा रीइन्फेक्शन होऊ शकते की नाही याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरु आहे. कोरोना झाल्यानंतल शरीरात तयार होणा-या अँटीबॉडीज कायमचे टिकून राहतील किंवा काही दिवसांत निघून जातील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रीइन्फेक्शनची फारच कमी प्रकरणे​​​​​​​ नोंदवली गेली आहेत.
 • ते म्हणतात की, कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरदेखील विषाणूचा छोटासा अंश शरीरात राहतो. याला पर्सिस्टंट व्हायरस शेडिंग असे म्हणतात. हे विषाणू फारच कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे ताप किंवा लक्षणे दिसून येत नाहीत. अशी व्यक्ती इतरांनाही संक्रमित करू शकत नाही. मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो. या प्रकरणात, जीनोम अॅनालिसिस नंतरच हे रीइन्फेक्शन आहे की नाही हे सांगितले जाऊ शकते.
 • डॉ. सिकोइया यांच्या मते, दोन पॉझिटिव्ह रिपोर्ट्सच्या मध्ये एक निगेटिव्ह रिपोर्ट आल्यास आम्ही त्याला प्रोव्हिजनल केस ऑफ रीइन्फेक्शन म्हणू शकतो. जीनोम अॅनालिसिस पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याची​​​​​​​ रीइन्फेक्शन असल्याची पुष्टी करू शकत नाही.

यापूर्वी रीइन्फेक्शन काही प्रकरणे समोर आली आहेत का?

 • होय, जगभरात रीइन्फेक्शनची पहिली घटना हाँगकाँगमध्ये ऑगस्ट 2020 मध्ये पहिल्यांदा समोर आली होती. मार्च 2020 मध्ये 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. ऑगस्टमध्ये तो पुन्हा​​​​​​​ कोरोना पॉझिटिव्ह झाला. यावेळी तो स्पेनला परतला होता. डॉ. सिकोइया म्हणतात की, हाँगकाँगच्या रूग्णांच्या नमुन्यांचे जीनोम अॅनालिसिस केले गेले होते, ज्यावरुन रीइन्फेक्शन झाल्याची पुष्टी झाली होती.
 • यानंतर अमेरिका, बेल्जियम आणि चीनमध्येही कोरोना रीइन्फेक्शनच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये जीनोम अ‍ॅनालिसिसही केले गेले. ऑगस्ट 2020 मध्ये आयसीएमआरने भारतात कोरोनव्हायरसचा​​​​​​​ पुन्हा संसर्ग झाल्याच्या 3 घटनांची पुष्टी केली होती.

रीइन्फेक्शन कोणकोणत्या कारणांमुळे होऊ शकते?

 • रीइन्फेक्शन होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोना व्हायरसमधील बदल. यामुळे, हा विषाणू नवीन अंदाजात नवीन अवतारात समोर येत आहे. अशा परिस्थितीत, जर एखादी व्यक्ती प्रथम​​​​​​​ पॉझिटिव्ह होऊन निगेटिव्ह झाली असेल तर ती पुन्हा नवीन स्ट्रेनने इन्फेक्ट होऊ शकते. त्याची शक्यता नाकारता येत नाही.
 • भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातही डबल म्युटंट व्हायरस आढळला होता. विषाणूमध्ये दोन मोठे बदल झाले आहेत. या व्यतिरिक्त, 18 राज्यांत व्हेरिएंट्स ऑफ कन्सर्न (व्हीओसी) मिळाले होते जे रीइन्फेक्टचे कारण ठरु शकतात. हाँगकाँगमध्ये पुन्हा रीइन्फेक्शनच्या प्रकरणांत म्युटेशन व नवीन स्ट्रेन जबाबदार असल्याचे म्हटले गेले होते.
 • भोपाळमधील कोरोना केसेसवर काम करणार्‍या डॉ. पूनम चांदानी यांच्या म्हणण्यानुसार शरीरात कोरोना विषाणूपासून बनलेल्या अँटीबॉडीज किती काळ राहतील याबद्दल वेगवेगळे दावे होत आहेत.
 • ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये झालेल्या संशोधनानुसार, शरीरात 8 ते 10 महिन्यांपर्यंत अँटीबॉडीज आढळले आहेत. परंतु कोरोना रीइन्फेक्शन होणार की नाही, हे ठामपणे सांगितले गेलेले नाही.
 • डॉ.चंदानी म्हणतात की, कोरोनाच्या प्रत्येक नव्या स्ट्रेनसह लक्षणे बदलत आहेत. नवीन लक्षणांमध्ये थंडी वाजून ताप येणे, डोळ्यांची लालसरपणा, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश आहे. ही सर्व लक्षणे फ्लूमुळे देखील उद्भवतात. अशा परिस्थितीत, सामान्य फ्लू म्हणून या लक्षणांकडे कोणीही दुर्लक्ष करू नये.
 • आयसीएमआरच्या अभ्यासाचा डेटा ऑक्टोबर 2020 पर्यंत घेण्यात आला आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु सध्या भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे संक्रमित लोकांची संख्या सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत ही संख्याही वाढण्याची शक्यता आहे. इतर देशांमध्ये, कोरोनाचा पुन्हा संसर्ग झालेल्या लोकांचे प्रमाण 1% आहे, परंतु भारतात ते 4.5% आहे. ही देखील चिंतेची बाब आहे.

रीइन्फेक्शनचा धोका कसा टाळला जाऊ शकतो?

 • केंद्र तसेच राज्य सरकारांचा भर सरकारने सावधगिरी बाळगली पाहिले, यावर आहे. कोविड - 19 च्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे अनुसरण करा. ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर आणि देशाचे नामांकित लस शास्त्रज्ञ डॉ. गगनदीप कंग म्हणतात की, विषाणूंची लाट येत-जात राहणार आहे. जोपर्यंत प्रत्येकाची लसीकरण होत नाही, तोपर्यंत प्रकरणांमध्ये वाढ आणि घट होत राहील.
 • ते म्हणतात की, कोविड -19 जीवघेणा आहे आणि व्हायरस अजून नष्ट झालेला नाही, हे लोकांनी समजून घ्यावे लागेल. लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच वारंवार हात धुकडे लक्ष देणे आणि काळजी घेणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...