आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coronavirus RT PCR Test Negative Report; Patients Chest CT Scan To Covid 19 Variant Causing Second Wave

एक्सप्लेनर:RT-PCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही 80% पर्यंत संक्रमित होत आहेत फुफ्फुस; का चाचणीत आढळून येत नाहीये हा विषाणू?

रवींद्र भजनी9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • व्हेरिएंट्स असू शकतात का नकारात्मक अहवाल येण्यामागचे कारण?

केस -1: अंबिकापूर (छत्तीसगड) येथील 58 वर्षीय व्यक्तीच्या सीटी स्कॅन अहवालात फुफ्फुसात 90% संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे, परंतु आरटी-पीसीआरची चाचणी निगेटिव्ह आली आहे. रुग्णाची प्रकृती खालावली होती, पण उपचारानंतर तो बरा झाला आहे.

केस - 2: भिलाई (छत्तीसगड) येथील एका 65 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास झाला. सीटी स्कॅनमध्ये दोन्ही फुफ्फुसांमध्ये 80% संसर्ग दिसून आला. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती, मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडला.

छत्तीसगडच्या या दोन्ही घटनांमध्ये सारखी परिस्थिती होती. दोन्ही घटनांमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी करण्यात आरटी-पीसीआर चाचाणी अयशस्वी झाली. तसे पाहता आरटी-पीसीआर चाचणीच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडले असे नाही, यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. चाचणीत व्हायरसचे नवीन व्हेरिएंट्स सापडले नाहीत अशी बातमी देशभरातून येत आहे.

सीटी स्कॅन होईपर्यंत, फुफ्फुसाचे बरेच नुकसान झाले होते. याचे कारण कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स असू शकते. देशातील 18 राज्यात कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स सापडल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यात ब्राझील, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका येथे आढळलेल्या व्हेरिएंट्सचा समावेश आहे. हे अतिशय संसर्गजन्य आहे आणि वेगाने संक्रमित करणारे आहे. सर्वात धोकादायक डबल म्युटंट व्हेरिएंट (म्हणजे एकाच व्हायरसमध्ये दोन म्युटेशन होणं, या प्रक्रियेला 'डबल म्युटेशन' आणि तशा व्हायरसला डबल म्युटंट म्हणतात.) आहे. हे डबल म्युटंट व्हेरिएंट महाराष्ट्रात आढळून आले होते.

विशेष गोष्ट अशी की, RT-PCR चाचणीला कोरोना विषाणूच्या चाचणीचे गोल्ड स्टँडर्ड असे म्हटले आहे. तुमच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असला तरी तो या टेस्टमार्फत कळू शकतो. रॅपिड अँटीजन टेस्टच्या तुलनेत या चाचणीची विश्वासहार्यता चांगली आहे. कारण रॅपिड अँटीजन टेस्ट्समधून फॉल्स निगेटिव्ह म्हणजे चुकीचा नकारात्मक रिझल्ट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे Antigen Test मध्ये निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीची RT-PCR चाचणी सुद्धा करवून घ्यावी असे सांगितले जाते.

असे असले तरी RT-PCR चाचणीत नवीन व्हेरिएंट्स शोधून काढण्यात अपयश हाती आले आहे. छत्तीसगडच्या कोरोना कोअर कमिटीचे सदस्य डॉ. आर के पांडा म्हणाले की, गेल्या आठवड्यात अशी अनेक प्रकरणे आढळली होती, ज्यात RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली आणि सीटी स्कॅनमध्ये मात्र लोकांच्या फुफ्फुसात संक्रमण झाल्याचे आणि डॉक्टरांनी अशी प्रकरणे गंभीर असल्याचे सांगितले. राज्यात अशी 250 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. सुमारे 50 प्रकरणे अशी आहेत ज्यात रुग्णांचा कोविड चाचणी अहवाल नकारात्मक होता, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

व्हेरिएंट्स असू शकतात का नकारात्मक अहवाल येण्यामागचे कारण?

 • होय, केवळ छत्तीसगडमधून तक्रारी येत आहेत, असे नाही. भोपाळमध्ये गेल्या एक वर्षापासून कोविड -19 चाचणी कार्यात सहभागी असलेल्या डॉ. पूनम चांदानी म्हणतात की, कोरोना व्हायरस एक RNA प्रथिने आहे आणि त्यात सतत बदल होत आहे. यात आणि मानवी शरीरात उद्भवणारे प्रथिने यांच्यात फरक करणे कठीण होत आहे. या कारणास्तव, रॅपिड अँटीजन आणि आरटी-पीसीआर चाचण्या देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दर्शवण्यात अपयशी ठरत आहेत. चेस्ट इंफेक्शनमधूनच रुग्णाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, हे लक्षात येत आहे.
 • तर मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सल्लागार डॉ. पिनांक पांड्या म्हणतात की, कुठे ना कुठे व्हायरसचे नवीन व्हेरिएंट्स यासाठी जबाबदार आहेत. देशात मोठ्या संख्येने नवीन प्रकरणे समोर येण्याचे कारणही हे व्हेरिएट्ंस आहेत. रीइन्फेक्शन किंवा लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग होत आहे. ते म्हणतात की, खरं तर आरटी-पीसीआर एस-जीन शोधतो. HV69 आणि HV70 ते शोधत नाहीत. बहुतेकदा जेव्हा अशा जनुकांचे अहवाल नकारात्मक आल्यानंतर प्रयोगशाळा नकारात्मक अहवाल देतात. जेव्हा ORF आणि N जीन पॉझिटिव्ह येतात, तेव्हा त्याला निगेटिव्ह मानले जात नाही. त्यामुळे आपला अहवाल केवळ एका तज्ज्ञाकडूनच जाणून घ्या. ज्यामुळे चांगल्या उपचारासाठी मदत होऊ शकेल.
रांची येथे घेण्यात आलेल्या चाचणीत फुफ्फुस कसे संक्रमित होत गेले, ते बघा
रांची येथे घेण्यात आलेल्या चाचणीत फुफ्फुस कसे संक्रमित होत गेले, ते बघा

लोकांवर काय होतोय परिणाम?

 • डॉ.चंदानी यांच्या म्हणण्यानुसार, अशा घटनांमध्ये कोविड - 19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर लोक त्यांच्या घरात राहतात. प्रोटोकॉलचे अनुसरण करत नाही आणि त्यामुळे ते इतरांना संक्रमित करत आहेत. सीटी स्कॅनवरून फुफ्फुसात 10, 20 ते 30% संक्रमण असल्याचे समोर आले आहे. पहिल्या लाटेपेक्षा हे खूप जास्त आहे. तर भोपाळच्या कोरोना वॉर्डमध्ये कार्यरत डॉ. तेज प्रताप तोमर म्हणतात की, पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत बराच फरक आहे. पहिले 10 पैकी एका रुग्णाच्या सीटीस्कॅनमध्ये डॅमेज दिसत होते, आता 10 पैकी पाच ते सहा रुग्णांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे.
 • झारखंडचे फिजिशिअन डॉ. उमेश खान यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा नवीन स्ट्रेन फुफ्फुस आणि श्वासोच्छवासाच्या संपूर्ण प्रणालीवर अतिशय कमी वेळेत परिणाम करत आहेत. दोन ते तीन दिवसांतच फुफ्फुस पांढरे दिसू लागतात आणि त्या व्यक्तीला निमोनिया झालेला असतो. चार दिवसात, फुफ्फुसांचे सुमारे 45 टक्के नुकसान झालेले असते आणि सात दिवसांत 70 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. पहिल्या लाटेत ही परिस्थिती होण्यासाठी 15 दिवस लागले होते. एमजीएम मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन विभागाचे डॉ. बलराम झा म्हणाले- नवीन स्ट्रेन ​​​​​​​सुपर स्प्रेडर​​​​​​​ आहे. व्हायरस शक्तिशाली आहे. हेच कारण आहे की एका पॉझिटिव्ह व्यक्तीकडून संपूर्ण घराला संसर्ग होत आहे.

कोरोना चाचाणीचे कोणते पर्याय आहेत?

 • मुंबईतील पीडी हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, खार फेसिलिटीचे मुख्य क्रिटिकल केअर डॉ भरेश डेढिया यांची RT-PCR चाचणी अपयशी होण्यामागची वेगळी थेअरी आहे. त्यांच्याकडे यासाठीचे पर्यायदेखील आहेत. डॉ. डेढिया म्हणतात की, RT-PCR चाचणी व्हायरसचे RNA शोधते. नवीन व्हेरिएंटमध्ये RNAमध्ये लक्षणीय बदल झालेला नाही.​​​​​​​ सद्यपरिस्थितीतील चाचणीदेखील व्हेरिएंट शोधू शकतात. अडचण अशी आहे की RT-PCR चाचणीमध्ये एफिकेसी रेट 60-70% इतका असतो, याचा अर्थ असा की 30-40% पॉझिटिव्ह​​​​​​​ केसेस निगेटिव्ह रिझल्ट देऊ शकतात. RT-PCR चाचणीत नवीन व्हेरिएंट सापडत नाहीत हे एक मिथक आहे. व्हेरिएंट्स देखील शोधली जात आहेत, परंतु ती आढळली नसल्यास त्यास RT-PCR ची अचूकता चाचणी त्यासाठी जबाबदार आहे.
 • ते म्हणतात की, इतर चाचण्यांच्याविषयी बोलायचे झाल्यास रॅपिड अँटीजन टेस्टचा एफिकेसी रेट 50-60% आहे, जो आरटी-पीसीआरपेक्षा खूपच कमी आहे. प्रथमच आरटी-पीसीआर​​​​​​​ टेस्टमध्ये एफिकेसी रेट 60-70% इतका आहे. त्याच वेळी, जर आपण दोन दिवसांच्या फरकाने दुस-यांदा ही टेस्ट केली तर एफिकेसी रेट 80% असेल. तीन वेळा चाचणी घेतल्यास​​​​​​​ एफिकेसी रेट 90% असेल. म्हणजेच, सर्वात अचूक परिणाम तीन वेळा चाचणी घेतल्यानंतर प्राप्त होईल. तथापि, लक्षणे आढळल्यास एचआर-सीटी चाचणी करुण घेणे चांगले होईल, ज्याचा एफिकेसी रेट 80% आहे. आमच्यासारखे मेडिकल प्रोफेशनल्स रक्ताची तपासणी देखील करुन घेत आहेत. जेणेकरून नेमकी स्थिती काय आहे हे समजू शकेल.
 • डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर आपल्याला श्वास घेण्यात त्रास होत असेल, ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी असेल. थंडी ताप असेल, चव किंवा वास कळत नसेल, तर आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली तरी निश्चिंत राहू नका. त्वरित तज्ज्ञांना भेटा. उर्वरित तपासण्या होईपर्यंत स्वतःला आयसोलेट करा. कुटुंबातील सदस्यांमध्ये मिसळू नका. एचआर-सीटी किंवा रक्त​​​​​​​ तपासणीद्वारे संसर्ग झाला आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकेल. अशा प्रकारे, खबरदारी घेऊनच आपण या जीवघेण्या आजाराला रोखू शकतो.
बातम्या आणखी आहेत...