आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:कोविड -19 मधून 6 दिवसांत बरी होत आहेत लहान मुले, लाँग कोविडचा त्रास नाही; सध्या शाळा किती सुरक्षित आणि लँसेंटमध्ये प्रकाशित झालेला अभ्यास काय सांगतो, ते जाणून घ्या

रवींद्र भजनीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • याविषयी जाणून घ्या सविस्तर

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगडसह भारतातील 10 हून अधिक राज्यांनी शाळा उघडल्या आहेत. यानंतर महाराष्ट्रात 600, छत्तीसगडमध्ये 18 आणि गुजरातमध्ये 4 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले. संसर्गाच्या भीतीने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. ज्या राज्यांमध्ये शाळा खुल्या आहेत, तेथे 20% पेक्षा जास्त उपस्थिती दिसली नाही. अशा पालकांना, किंग्ज कॉलेज लंडनच्या नवीन अभ्यास अहवालामुळे दिलासा मिळाला आहे.

4 ऑगस्ट रोजी द लँसेंट चाईल्ड अँड अडोलेसेन्ट हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेला हा अहवाल म्हणतो की, कोविड -19 बाधित मुले 6 दिवसांत बरी होतात. त्यांना लाँग कोविड होण्याचा धोका देखील खूप कमी आहे. 20 पैकी फक्त एका मुलामध्ये 4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे दिसली आहेत. पण चांगली गोष्ट अशी आहे की, मुले 8 आठवड्यांत पूर्णपणे बरी होत आहेत.

हा अभ्यास आणि त्याचा भारतातील प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आम्ही जयपूर येथील डॉ. संजय चौधरी, मुंबईचे डॉ.फजल नबी आणि अहमदाबाद येथील डॉ. उर्वशी राणा यांच्याशी बातचित केली. या अभ्यासावर तज्ज्ञ काय म्हणत आहेत ते जाणून घेऊया...

सर्वप्रथम, जाणून घ्या हा अभ्यास कोणावर आणि कसा केला गेला?

 • किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधकांनी हा अभ्यास कोविड अ‍ॅप 'जो'च्या मदतीने केला आहे. हे अॅप मुलांचे पालक आणि गार्डिअन वापरतात. अ‍ॅपमध्ये 5 ते 17 वयोगटातील 2.5 लाख मुलांचा हेल्थ डेटा आहे. सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान 7 हजार मुलांमध्ये कोविड -19 ची लक्षणे दिसली.
 • 1,734 मुलांना कोरोनाची लागण होण्यासाठी आणि पूर्णपणे बरे होण्यासाठीचा काळ शोधला गेला. 5-11 वर्षांच्या मुलांना कोरोनावर मात करण्यासाठी 5 दिवस लागले. त्याच वेळी, 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना बरे होण्यासाठी 7 दिवस लागले. यापैकी खूप कमी मुले होती ज्यांना 4 आठवडे कोरोनाची लक्षणे दिसली.
 • संशोधकांचे म्हणणे आहे की, मुलांमध्ये कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा धोका खूप कमी आहे. ब-याच मुलांना लक्षणे आढळली नाहीत, तर काहींमध्ये अगदी किरकोळ लक्षणे होती. मुलांमध्ये सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे डोकेदुखी, थकवा, घसा खवखवणे आणि वास घेण्याची क्षमता जाणे ही होती.
 • किंग्ज कॉलेजच्या प्राध्यापक एम्मा डंकन म्हणतात की, मुलांच्या मेंदूशी संबंधित समस्या जसे की झटके येणे, अस्वस्थता संसर्गानंतर मुलांमध्ये दिसल्या नाहीत. हे सिद्ध करते की मुलांमध्ये लाँग कोविडची प्रकरणे दुर्मिळ आहेत.

या संशोधनाच्या निकालांच्या तुलनेत भारतातील अनुभव काय आहे?

 • भारतातील मुलांच्या संसर्गाबाबत असेच परिणाम नोंदवले गेले आहेत. नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. राणा म्हणतात की, ही लक्षणे आपल्याकडेही पहिल्या आणि दुस-या लाटेत मुलांमध्ये असिम्प्टॅमॅटिक किंवा सौम्य लक्षणे आढळली होती. ती देखील 7-10 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकली नाहीत. खूप कमी मुलांमध्ये 4 आठवड्यांनंतरही लक्षणे दिसली होती. काही मुले MIS- C शी लढताना दिसली.
 • जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे बालरोग विभागाचे संचालक डॉ. नबी म्हणतात की, 1% पेक्षा कमी मुलांमध्ये मध्यम ते गंभीर लक्षणे दिसली आहेत. पोस्ट कोविड संसर्गाची देखील लक्षणे दिसून आली आहेत, परंतु त्यांच्यामुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. सौम्य प्रकरणांमध्ये, मुले दोन ते चार दिवसांत पूर्णपणे बरी झाली आहेत. लँसेंट अभ्यासाबद्दल सांगायचे झाल्यास तो एका केंद्राशी जोडलेला आहे. सॅम्पल साइजदेखील लहान आहे. हा अभ्यास स्मार्टफोन अॅपवर विचारलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. त्यात मुलांच्या क्लिनिकल तपासणीचा समावेश नाही.
 • फोर्टिस हॉस्पिटलमधील बालरोग विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. चौधरी सांगतात की, ICMR चा डिसेंबर-जानेवारीच्या डेटानुसार, मुलांमध्येही संक्रमणाचे प्रमाण अधिक होते, पण वयस्करांच्या तुलनेत त्यांच्यावर जास्त परिणाम झाला नाही. खूप कमी संक्रमित मुलांना हॉस्पिटल किंवा आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज भासली.

मुलांना शाळेत पाठवणे सुरक्षित आहे का?

 • होय. जगभरात आलेला अनुभव सांगतो की, मुलांना शाळेत पाठवले पाहिजे. अनेक देशांमध्ये महामारीच्या काळातही शाळा खुल्या राहिल्या. डॉ. राणा म्हणतात की लँसेंट अभ्यासातून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत महत्त्वाची माहिती मिळतेय. तसे, शाळा उघडण्याचा निर्णय जिल्हा आणि राज्य स्तरावरील परिस्थितीच्या आधारावर घेतला पाहिजे. शाळा आणि रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा तयार करणे आणि इतर गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
 • जानेवारीमध्ये 31 देशांतील 129 केंद्रांवरील आकडेवारीच्या आधारे मेटा-विश्लेषण अभ्यास केला गेला. यात मुलांमध्ये संक्रमणासंदर्भात सकारात्मक परिणाम मिळाले. डॉ. नबी म्हणतात की, पहिल्या लाटेनंतर आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीच्या आधारे शाळा उघडणे सुरक्षित वाटते. मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांनी लसीकरण करुन घेणे आणि मास्क घालणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
 • डॉ. चौधरी म्हणतात की, डेटा, हॉस्पिटलचे आकडे आणि दुस-या लाटेचे अनुभव स्पष्टपणे दाखवतात की, शाळा उघडल्या पाहिजेत. जर तिसऱ्या लाटेची भीती आपल्याला आपल्या मुलांना घरात बंद ठेवण्यास भाग पाडत असेल तर ते चुकीचे आहे. घाबरण्यासारखे काहीच नाही आणि हळूहळू मुलांना घराबाहेर पाठवणे आवश्यक झाले आहे.

मुलांसाठी क्रीडा उपक्रम सुरू करण्याची वेळ आली आहे का?

 • होय. डॉ. चौधरी सांगतात की, सध्या मोठ्या संख्येने मुले मानसिक समस्यांना तोंड देत आहेत. त्यापैकी बहुतेक अजूनही लॉकडाऊन मोडमध्ये आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या न्युट्रिशनल स्थितीवर परिणाम होऊ नये. दिवसभर टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब्लेटवर अॅक्टिव्ह राहिल्याने त्यांच्या इतर कामांवर परिणाम झाला आहे. घरी बसून मुलांचे वजन वाढत आहे.
 • पण डॉ. राणा यांनी मुलांबाबत महत्त्वाचा सावधगिरीचा सल्लाही दिला आहे. त्या म्हणतात की, जरी मुलांना सौम्य लक्षणे असली तरी व्हायरल लोड जास्त आहे. ते कम्युनिटीमध्ये व्हायरस पसरवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. या कारणास्तव मुलांच्या आजूबाजूच्या लोकांना लस मिळाली आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
बातम्या आणखी आहेत...