आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Coronavirus Second Wave And Children Protection; Questions And Answers About COVID 19 Vaccine, 10% Of The Total Patients Are In The Age Group Of 11 To 19 Years, How Can Children Be Safe ..?

लहान मुलांना कोरोनाचा धोका:एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील, लहान मुलांसाठी कधी येईल लस..?

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात लहान मुलांसोबत प्रवास करणे कितपत सुरक्षित ?

सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. काही दिवसांपासून कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या दुसऱ्या लाटेतील चिंतेची बाब म्हणजे, यात लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका जाणवत आहे. सध्या जगभर लसीकरण सुरू आहे, पण ही लस लहान मुलांना दिली जात नाहीये. त्यामुळेच, जगभरातील लहान मुलांसाठी व्हॅक्सीनची गरज भासत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका उद्धभवला नाही. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे विषाणूचा त्यांच्यावर जास्त परिणाम झाला नाही. पण, आता परिस्थिती बदलली आहे. आता मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही कोरोनाचा धोका जाणवत आहे. आता दररोज धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. आता सापडणाऱ्या रुग्णांपैकी दर 20वा रुग्ण लहान मुलगा आहे. एकूण रुग्णांपैकी 10 % रुग्ण हे 11 ते 19 वयोगटातील आहेत. यामुळे आता मुलांच्या सुरक्षेने पालकांच्या मनात घर केले आहे.

नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने सांगितल्यानुसार, कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 4.42 टक्के रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर, 9.78 टक्के रुग्ण 11 ते 20 वयोगटातील आहेत. जानकार सांगतात की, मुले आधी अॅसिम्टोमॅटिक होते, पण त्यांच्यात अनेक लक्षणे दिसत होती. जसे- नाक बंद, पोटदुखी, घशात दुखणे इत्यादी. लहान मुलांच्या लसीबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत...

लहान मुलांना कधीपर्यंत लस मिळू शकते ?

लहान मुलांची लस कधी येईल, हे अद्याप माहिती नाही. सध्या फायजर अँड बायोटेकने 16 आणि त्यापेक्षा वरील वय असलेल्या मुलांच्या व्हॅक्सीनला अप्रुव्ह केले आहे, पण यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अद्याप लस तयार करण्यात आलेली नाही. सध्या यावर अनेक देशांमध्ये रिसर्च सुरू आहे.

यूनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन स्कूल ऑफ मेडिसिन अँड पब्लिक हेल्थमध्ये व्हॅक्सीन प्रोग्रामला जवळून पाहणारे डॉ. जेम्स कॉन्वे सांगतात की, 12 ते 15 वयोगटातील मुलांसाठी येत्या काही महिन्यात व्हॅक्सीन येण्याची आशा आहे. 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी 2021 अखेरपर्यंत लस येण्याची शक्यता आहे आणि 6 महीने ते 4 वर्षांच्या मुलांसाठी 2022 च्या सुरुवातीला लस येईल.

घरात लहान मुले असताना व्हॅक्सीन घेतलेल्या मोठ्यांना भेटू शकतात ?

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशनने सांगितल्यानुसार, ज्या लोकांना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे, अशा लोकांना लहान मुले भेटू शकतात. प्रत्येकाने लस घेतली असेल, तरीदेखील कोरोना नियमांचे पालन केले जावे.

व्हॅक्सीन न घेतलेल्या लोकांना लहान मुले भेटू शकतात ?

डॉ. मकब्राइड सांगतात की, व्हॅक्सीन न घेतलेल्या लोकांना लहान मुलांनी भेटणे सुरक्षित नाही. तसेच, विना मास्क भेटत असतील, तर धोका आणखी वाढू शकतो. नॉर्थवेस्टर्न मेडिसिनच्या पीडियाट्रिशियन डॉ. निया हर्ड-गैरिस सांगतात की, या आजारामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम पडत आहे. मुलांमध्ये एकटेपना, डिप्रेशन, एंग्जाइटीसारख्या अनेक समस्या दिसत आहेत.

कोरोना काळात लहान मुलांसोबत प्रवास करणे कितपत सुरक्षित ?

कटलिन रिवर्स जॉन्स हॉपकिंस सेंटर फॉर हेल्थ सिक्योरिटीचे महामारी शास्त्रज्ञाचे म्हणने आहे की, मुलांसोबत प्रवास करताना सर्वात जास्त सुरक्षित राहण्याची गरज आहे. तुम्ही जिथे जात आहात, तेथील परिस्थितीची माहिती करुन घ्या आणि नंतरच प्रवास करण्याचा विचार करा.

बातम्या आणखी आहेत...