- Marathi News
- Dvm originals
- Coronavirus Side Effects After Recovery; COVID Affect Men's Sexual Health And More | What Is The Impact Of Covid 19 On Men
एक्सप्लेनर:कोरोना व्हायरसचा संसर्ग महिलांपेक्षा पुरुषांना होण्याचा धोका अधिक, मेन्स हेल्थ वीकमध्ये तज्ज्ञांकडून समजून घ्या असे का?
- जगभरात झालेल्या अनेक रिसर्चमधून कोविड 19 चा धोका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक असल्याचे दिसून आले आहे.
जगभर पसरलेल्या 'कोविड 19' या आजाराने थैमान घातले. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात झालेल्या अनेक रिसर्चमधून कोविड 19 चा धोका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही तर जगभरात 'कोविड 19'च्या बळींमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे. हे झालं कोरोना महामारीबद्दल. पण कोरोना विषाणुमुळे जगातील सर्वच देशांची अर्थव्यवस्थआ डबघाईला आली असून त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचाही सर्वाधिक परिणाम पुरुषांवर झाला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना आपल्या नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे ते नैराश्य, तणाव यासारख्या मानसिक आजाराशी झुंज देत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात जगभरात मेन्स हेल्थ वीक (14 जून ते 20 जून 2021) साजरा केला जात आहे. यामध्ये पुरुष आणि विशेषत: तरुण मुलांशी संबंधित आरोग्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे सीनिअर कंसल्टंट यूरोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन डॉ. आशिष सबरवाल यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून कोरोना 19 चा सर्वाधिक परिणाम पुरुषांवर का होतोय? जगभरात याविषयावर झालेला अभ्यास काय सांगतो ? पुरुष कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना महिलांसाठी अधिक धोकादायक आहे की पुरुषांसाठी?
- पुरुषांसाठी. जगभरात याविषयावर बराच अभ्यास केला गेला आहे, यातून महिला आणि पुरुषांवर कोरोनाचा काय परिणाम झाला, हे शोधले गेले. फेब्रुवारीमध्ये चंदीगडमधील PGIMER च्या संशोधकांना आढळले की, एकुण कोरोना रूग्णांपैकी 65% पुरुष आणि 35% महिला आहेत.
- त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यात फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोविडची तीव्र लक्षणे स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त होती. चिनी संशोधकांनी असा दावा केला आहे की, कोरोनाचे 70% रुग्ण हे पुरुष आहेत. कोरोना व्हायरस फैलावण्यापूर्वी 2003 मध्ये SARS आणि MERS चा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यावेळी हीच परिस्थिती पाहायला मिळाली होती.
- WHO च्या एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, युरोपमध्ये कोविड - 19 ने बळी पडलेल्यांपैकी 63% पुरुष होते. मार्च महिन्यात रोममध्ये रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवर अभ्यास करण्यात आला. त्यात असे आढळले की, रूग्णालयात दाखल झालेल्या 8% पुरुषांचा मृत्यू झाला. तर रूग्णालयात दाखल झालेल्या महिलांच्या मृत्यूचा आकडा हा 5% होता. एप्रिलमध्ये, न्यूयॉर्क शहराच्या आरोग्य विभागाने सांगितले की, एक लाख पुरुषांमागे 43 मृत्यूची नोंद झाली आहे, तर हा आकडा एख लाख स्त्रियांमागे 23 इतका आहे.
- भारतात संक्रमित रुग्णांच्या संख्येविषयी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र डेटा जाहीर केला जात नाही. किंवा मृत्यूचेही स्त्री-पुरुष असे वेगळे आकडे सांगितले जात नाहीत. अमेरिकेतही, रोग नियंत्रण केंद्र (सीडीसी) पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र आकडेवारी देत नाही.
यामागे काही बायोलॉजिकल कारण आहे का?
- होय. 10 मे रोजी मेन्स हेल्थ नेटवर्कने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार पुरुषांच्या रक्तात स्त्रियांच्या तुलनेत अँजिओटेंसीन रूपांतरित एंजाइम 2 (ACE 2)जास्त असतात. ACE 2 च्या उपस्थितीत कोरोना विषाणू निरोगी पेशींना संक्रमित करते. यावरुन हे स्पष्ट आहे की, ACE 2 रिसेप्टर अधिक असल्यामुळे पुरुषांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
- पुरुषांच्या रोगप्रतिकारक शक्ती देखील स्त्रियांपेक्षा कमकुवत असते. संशोधकांचे म्हणणे आहे की, अतिरिक्त एक्स गुणसूत्रांमुळे स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता पुरुषांपेक्षा अधिक मजबूत असते. संक्रमण झाल्यास लगेच रिस्पॉन्ड देतात. यासंदर्भात अमेरिकेत दोन क्लिनिकल चाचण्या देखील झाल्या. यामध्ये शास्त्रज्ञांनी पुरुषांना रिकव्हरीसाठी किता मदत मिळेल हे बघण्यासाठी कोविड -19 च्या सोबत एस्ट्रोजेन सारखे सेक्स हार्मोन्ससुद्धा दिले.
- हेल्थलाईनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार असेही म्हटले आहे की, पुरुषांना धुम्रपानाची सवय अधिक असते, त्यामुळे त्यांच्या शरीराला अगोदरच नुकसान झालेले असते. कोविड 19 प्रतिकारशक्ती कमी असलेल्या किंवा अगोदरपासूनच आजारी असलेल्या व्यक्तींच्या शरीरात सहज आणि वेगाने प्रवेश करू शकतो, हे आत्तापर्यंत स्पष्ट झालेले आहे.
कोविडमधून बरे झाल्यानंतरही पुरुष कोणत्या प्रकारच्या समस्येचा सामना करीत आहेत?
- भारतात कोविड -19 च्या दुसर्या लाटेदरम्यान अनेक नवीन आजार दिसले आहेत. ब्लॅक फंगसपासून ते हॅपी हायपोक्सिया आणि न्यूमोनियापर्यंत अनेक आजार लोकांना होत आहेत. या आजारांनी शरीराच्या अनेक भागांना नुकसान पोहोचवले. अनेक रोगांचा धोका वाढला आहे.
- नुकत्याच झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा स्ट्रेस लेव्हल अधिक वाढला आहे. यामुळे त्यांच्या सेक्स लाइफवरही परिणाम होत आहे. इरेक्टाइल डिसफंक्शनपासून ते फर्टिलिटी पर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत आहे. हा अभ्यास इटलीमध्ये करण्यात आला. असा दावा केला गेला होता की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीस नुकसान झाल्यामुळे इरेक्शनच्या अडचणी येत आहेत.
- पुरुषांमध्ये केवळ रेस्पिरेटरी इन्फेक्शनच नव्हे तर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या देखील वाढल्या आहेत. बर्याच प्रकरणांमध्ये, हार्मोनल बदलांमुळे, चेहरा आणि शरीरावरीलकेस कमी झालेले दिसत आहेत. काही पुरुषांमध्ये, छातीत असामान्य वाढ दिसून आली आहे. या व्यतिरिक्त लैंगिक इच्छेची कमतरता किंवा अभाव हे देखील पुरुष रुग्णांमध्ये एक मोठी समस्या असल्याचे दिसून येत आहे.