आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोरोना' करतो स्त्री-पुरुष भेदभाव:कोरोना पॉझिटिव्ह पुरुषांमध्ये श्वसनाचा त्रास आणि थकवा अधिक जाणवतो तर महिला वास घेण्याची क्षमता गमावतात

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

जगात कोरोनाचा प्रसार होऊन दीड वर्षांहून अधिक काळ झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अद्यापही या आजाराबद्दल नवीन माहिती बाहेर येत आहे. लंडनच्या प्रसिद्ध किंग्ज कॉलेजमध्ये झालेल्या एका मोठ्या अभ्यासानुसार, कोरोनाची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये भिन्न असल्याचे समोर आले आहे.

पुरुषांमध्ये श्वसनाचा त्रास, थकवा, थंडी वाजणे आणि ताप येणे ही लक्षणे आढळत आहेत. तर वास घेण्याची क्षमता जाणे, छातीत दुखणे आणि सतत खोकला ही महिलांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य लक्षणे आहेत. आतापर्यंत ताप, सतत खोकला आणि वास घेण्याची क्षमता जाणे ही पारंपरिकपणे कोरोनाची तीन मुख्य लक्षणे मानली गेली आहेत. तर सुरुवातीच्या दिवसांत ताप येतोच असे नाही.

पुरुषांमध्ये कोरोनाची टॉप 5 लक्षणे

 • श्वसनाचा त्रास
 • थकवा
 • थंडी वाजणे
 • ताप
 • वास घेण्याची क्षमता जाणे

महिलांमध्ये कोरोनाची टॉप 5 लक्षणे

 • वास घेण्याची क्षमता जाणे
 • छातीत दुखणे
 • सतत खोकला
 • पोटदुखी
 • ताप

या व्यतिरिक्त ...

 • 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये डायरियाची लक्षणे अधिक आढळली.
 • वास घेण्याची क्षमता जाणे हे लक्षण सहसा वृद्धांमध्ये दिसत नाही, पण खरंतर हे कोरोनाचे सर्वात महत्वाचे लक्षण मानले जाते.

लोकांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये वेगवेगळी लक्षणे
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा अभ्यास असेही दर्शवितो की डेल्टासह भविष्यातील व्हेरिएंट्सच्या बाबतीतही लोकांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये भिन्न लक्षणे असतील. हे गट वय, लिंग, वजन, बीएमआय इत्यादींवर आधारित आहेत. अभ्यासाचे सह-लेखक डॉ. मोडॅट म्हणतात की, आम्ही कोरोनाची लक्षणे एका गटापासून दुसऱ्या गटामध्ये भिन्न आहेत हे ओळखण्यात यशस्वी झालो आहोत.

कोरोना तपासणीसाठी वैयक्तिक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाऊ शकतात
डॉ. मोडॅट यांच्या मते, वेगवेगळ्या लोकांची वय, लिंग इत्यादींच्या आधारावर कोरोनाची चाचणी घेण्यासाठी आम्ही एक वैयक्तिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकतो. म्हणजेच, जर तुम्ही एका विशिष्ट वयोगटातील पुरुष किंवा स्त्री असाल, तर तुम्हाला कोरोनाची कोणती लक्षणे दिसताच चाचणी करायला हवी, हे यातून समजेल.

व्हेरिएंटमुळे कोरोना चाचणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे अपडेट व्हायला हवी
या संशोधनाचे नेतृत्व करणारे किंग्ज कॉलेज लंडनचे क्लेअर स्टीव्ह्स म्हणतात की, लोकांना हे माहित असणे महत्वाचे आहे की कोरोनाची सुरुवातीची लक्षणे खूप व्यापक आहेत आणि कुटुंबातील किंवा घरातील प्रत्येक सदस्यासाठी लक्षणे भिन्न असू शकतात.

हे पाहता, आरोग्य यंत्रणांनी कोरोना तपासणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे अपडेट करावीत. म्हणजेच, हे निश्चित केले पाहिजे की कोणती लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करायला पाहिजे. विशेषत: झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट्सला बघता हा बदल झाला पाहिजे.

कोरोना लसीकरणानुसार, ज्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले, ज्यांना फक्त एक डोस मिळाला आहे आणि ज्यांना अद्याप लस मिळाली नाही, अशा लोकांमध्येही कोरोनाची वेगवेगळी लक्षणे आढळली आहेत.

1. लसीचा एकही डोस न घेतल्यास श्वास घेण्यास त्रास होणे हे आता 30 व्या क्रमांकावरील लक्षण बनले आहे

लस न घेतलेल्या लोकांमध्येसुद्धा कोरोनाची लक्षणे बदलली आहेत. डोकेदुखी, घसा खवखवणे, वाहणारे नाक, ताप आणि सतत खोकला ही या श्रेणीतील लोकांमध्ये कोरोनाची प्रथम 5 लक्षणे आहेत, परंतु वास घेण्याची क्षमता आता 9 व्या क्रमांकावर आले आहे आणि श्वसनाचा त्रास हे लक्षण 30 व्या क्रमांकावर आले आहे. पुर्वी वास घेण्याची क्षमता कमी होणे हे पहिल्या 5 मध्ये होते आणि श्वास घेण्यात अडचण पहिल्या 10 लक्षणांमध्ये होते.

2. ज्यांना लसीचा एक डोस मिळाला त्यांच्यामध्ये घसा खवखवण्याचे लक्षणे सौम्य झाले आहे

लसीचा एक डोस घेतल्यानंतरही, सतत खोकला येण्याचे लक्षण पाचव्या क्रमांकावर आहे. सतत नाक वाहणे आणि शिंका येणे अशी लक्षणे, जी आधी कोरोनाची प्राथमिक लक्षणे मानली जात नव्हती, लसीच्या एका डोसनंतर लोकांमध्ये दिसून आली आहेत.

3. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये खोकला आणि ताप येण्याची लक्षणे आता खालच्या क्रमांकावर गेली आहेत

अभ्यासानुसार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये डोकेदुखी, घसा खवखवणे, शिंका येणे, नाक वाहणे, वास कमी होणे ही टॉप 5 लक्षणे आहेत. सतत खोकल्याचे लक्षण 8 व्या क्रमांकावर आहे, ताप 12 व्या क्रमांकावर आहे आणि श्वसनाचा त्रास 29 व्या क्रमांकावर आहे. लसीकरण झालेल्या लोकांना सतत शिंका येत असतील तर तो कोरोना संसर्ग असू शकतो. म्हणून, लसीकरण केलेल्या लोकांना सतत शिंका येत असतील तर कोविड चाचणी केली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...