आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Coronavirus Treatment Medicines; What Is Antimicrobial Resistance (AMR)? Amid Latest COVID Crisis In India

एक्सप्लेनर:कोरोनामध्ये वेगवेगळ्या औषधांचा वापर केल्याने व्हायरस अधिक शक्तिशाली बनला, जाणून घ्या अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे काय आणि आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या सविस्तर...

WHO ने कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीतून रेमडेसिवीरला वगळले आहे. एका क्लिनिकल चाचणीतील डेटानुसार हे औषध फारसे प्रभावी ठरले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या Solidarity Trial ने सांगितले की, पाच हजार जणांवर करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर रेमडेसिवीरचा फारसा परिणाम झाला नाही.

इतकेच नाही तर कोरोना रुग्णांसाठी वापरली जाणारी प्लाझ्मा थेरपीसुद्धा परिणामकारक नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. अलीकडेच ICMR आणि टास्क फोर्सच्या बैठकीत प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता प्रश्न असा आहे की, ही औषधे कोरोना उपचारांमध्ये प्रभावी नसली, तरीही त्याच्या वापरामुळे रुग्णांवर त्याचा काही तरी परिणाम झाला असेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही सर्व अँटी-मायक्रोबियल औषधे होती आणि त्याच्या वापरामुळे विषाणूला बळकटी मिळते तसेच औषधांचा प्रभाव कमी करतो.

डॉक्टर पूनम चंदानी यांच्याकडून समजून घेऊयात अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे काय आणि ते आपल्या आरोग्यासाठी का हिताचे नाही…

अँटी-मायक्रोबियल औषधे म्हणजे काय?

शरीरात सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ रोखण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांना अँटी मायक्रोबियल ड्रग्स म्हणतात. हे सूक्ष्मजीव व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशी किंवा प्रोटोझोआ असू शकतात. यापैकी जीवाणू नष्ट करतात अशा औषधांना अँटी-बॅक्टेरियल ड्रग्स म्हटले जाते.

डब्ल्यूएचओने यापूर्वी कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांच्या यादीतून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि अ‍ॅव्हमेक्टिन सारख्या अनेक अँटी-मायक्रोबियल औषधांना वगळले होते. यापैकी बरीच औषधे पूर्वी अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी वापरली गेली आहेत. इबोला आणि हिपॅटायटीसच्या उपचारांसाठी रेमडेसिवीर देखील वापरले गेले.

अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर) म्हणजे काय?

जेव्हा आपण या सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबविण्यासाठी अँटी-मायक्रोबियल औषधे वापरण्यास सुरुवात करतो तेव्हा या औषधांचा काही काळानंतर सूक्ष्मजीवांवर परिणाम होत नाही. दुस-या शब्दांत, हे सूक्ष्म जीव स्वतःच या औषधांविरूद्ध रेझिस्टन्स निर्माण करतात. जेव्हा या सूक्ष्मजीवांवर अस्तित्वात असलेल्या बहुतेक औषधांचा कोणताही परिणाम होत नाही, तेव्हा त्याला सुपरबग म्हणतात.

कालांतराने, विषाणू देखील स्वतः विकसित करतात. अशा परिस्थितीत, आधीपासून उपलब्ध असलेल्या औषधांचा विषाणूवर कोणताही परिणाम होत नाही.

अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर) भारतासाठी किती धोकादायक आहे?

वृत्तानुसार, जगभरात बहुतेक अँटी-मायक्रोबियल औषधे वापरली जातात. स्टेट ऑफ वर्ल्डच्या अँटीबायोटिक्स 2021 च्या अहवालानुसार, 2010 ते 2020 पर्यंत भारतात अँटी-बायोटिक औषधांच्या वापरामध्ये 47.40% वाढ झाली आहे. यासह, प्राण्यांना देण्यात आलेल्या अँटी-मायक्रोबियल औषधांचा वापरही झपाट्याने वाढला आहे. यामुळे, प्राण्यांमध्ये देखील अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स वाढू लागला आहे.

त्याचे धोके काय आहेत?
विषाणूवर औषधाचा कोणताही परिणाम होणार नाही, ज्यामुळे औषध निरुपयोगी होईल. रोग ओळखून त्यावर औषध तयार करण्यात त्रास होईल. रुग्णांना औषधांची अधिक मात्रा द्यावी लागेल, सामान्य रोगांवर उपचार करणे देखील कठीण होईल.

बराच काळ रुग्णालयात दाखल राहावे लागल्याने उपचारांचा खर्च आणि रुग्णालयांवरील ताण वाढेल. जर औषधांचा परिणाम झाला नाही तर आजारांमुळे होणा-या मृत्यूची संख्याही वाढेल.

कोरोना दरम्यान अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स कसा वाढला आहे?
कोरोना हा पूर्णपणे नवीन आजार होता. यापूर्वी डॉक्टरांकडे यावर कोणतेही उपचार नव्हते, म्हणून प्रयोग म्हणून वेगवेगळ्या औषधांचा वापर केला गेला. कधी म्हटले गेले की, कोरोना रोखण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रभावी आहे, तर कधी म्हटले गेले रेमडिसिवीर प्रभावी आहे. यामुळे या औषधांचा उपयोगही अंधाधुंदपणे करण्यात आला. कोरोना विषाणूवर त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही हे नंतर अभ्यासातून पुढे आले.

कोरोनाच्या उपचारात सर्व प्रकारच्या अँटी-मायक्रोबियल औषधे वापरली गेली आहेत. यामुळे केवळ कोरोना विषाणूमध्ये रेझिटन्स वाढला नाही तर इतर रोगांविरूद्धही रेझिटन्स वाढला. यामुळे भविष्यात इतर रोगांच्या उपचारांमध्येही त्रास होईल.

तसेच सर्वसामान्यांमध्ये कोरोनाबद्दल काहीही स्पष्ट झाले नाही. या आजाराची भीती एवढी होती की, लोकांनी सामान्य डोकेदुखीसाठीही बॅक्टेरियाविरोधी औषधांचा वापर केला. बाहेर संक्रमणाचा धोका पाहून बरेच लोक डॉक्टरकडे जाण्यास घाबरले. जवळपासच्या मेडिकल स्टोअरमधील तापासाठीची औषधे घेऊ लागले. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ताप, डोकेदुखीसाठी अँटी मलेरिया ड्रग्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला.

तर कोरोना रुग्णांवर अँटी-बायोटिक्स औषधांचा काही परिणाम झाला नाही?

हे असे नाही. वास्तविक कोरोना हा पूर्णपणे नवीन रोग आहे. कोरोनावर जोपर्यंत औषध सापडत नाही, तोपर्यंत कोणीही प्रतीक्षा करू शकत नव्हते, म्हणून डॉक्टरांनी कोरोनाची दुय्यम लक्षणे जसे की सर्दी, खोकल्यासाठी अँटी-बायोटिक औषधांद्वारे उपचार करतात. 2020 मध्ये चीनच्या वुहानमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 191 लोकांवर अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये असे आढळले आहे की, मृत्यू झालेल्या कोरोना रूग्णांपैकी 50% रुग्ण कोरोच्या सेकेंडरी इन्फेक्शनमुळे दगावले होते. म्हणूनच, कोरोना रुग्णांवर अँटी-बायोटिक औषधांचा काही परिणाम झाला नाही, हे पूर्णपणे बरोबर नाही.

अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर) बद्दल वेगवेगळा अभ्यास काय सांगतो?

जून 2020 मध्ये, डब्ल्यूएचओने 2010 कोरोना-संक्रमित लोकांचा अभ्यास केला होता. त्यात सांगण्यात आले की, केवळ 8% लोकांना बॅक्टेरियाचा संसर्ग होता, परंतु 72% लोकांनी बॅक्टेरियाविरोधी औषधे घेतली होते. डब्ल्यूएचओने चिंता व्यक्त केली होती की, जर अशीच औषधे वापरली गेली तर बरीच महागडी औषधी बेअरस होतील.

जून 2019 मध्ये आयसीएमआरने एएमआरवर एक अभ्यास देखील केला. 207 लोकांवर केलेल्या या अभ्यासात 3 पैकी 2 लोकांमध्ये अँटीबॉडीचा रेझिटन्स आढळला. हा अभ्यास इंटेस्टाइन ट्रेक्टला इन्फेक्ट करणा-या बॅक्टेरियांवर केला गेला होता. आयसीएमआरने याचे कारण साध्या सर्दी-खोकल्यात देखील अँटी-बॅक्टेरियाच्या औषधांचा वापर केला गेला होता, हे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...