आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोना महामारीने हाहाकार माजवले आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आणि अत्यावश्यक औषधींचा तुटवडा भासत आहे. कित्येक लोकांना योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांचा तडफडून मृत्यू होतोय. अशा परिस्थितीत काही लोक निस्वार्थ भावनेने काम करत आहे तर काही लोक याचा गैरफायदा उचलत आहे. सध्या सोशल मीडियावर कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून कित्येक कंपन्यांचे मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यातील काही मीम्समध्ये कापूर-लवंगच्या कळ्यापासून तर कोरोनाचे प्रतिबंध करण्यापर्यंत दावा करण्यात येत आहे. यामुळे कित्येक लोकांची प्रकृती गंभीर होत असल्याचे निर्दशनास येत आहे. पण आश्चर्यकारक बाब म्हणजे यासर्व षडयंत्रामागे सरकार, मोठे व्यापारी, मीडिया आणि नेत्यांचा हात असल्याचे समोर आले आहे.
होमिओपॅथी उपचारांमुळे कोरोना पसरत नाही- केंद्रीय आरोग्यमंत्री
भारतात कोरोना येण्यापूर्वी आयुष मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरुन एक ॲडव्हायजरी जारी केली होती. त्यामध्ये होमिओपॅथीक औषध आणि युनानी औषधांमुळे कोरोनाला रोखता येत असल्याचे म्हटले होते. युनानी औषधांमध्ये खामीरा किंवा खमीरा मारवारीड, शरबत उन्नाब, तिर्यक अरबी आणि ताराय्याक नजला यांचा समावेश असून यामुळे कोरोना थांबतो. पुढे आयुष मंत्रालयाने आपली संशोधन टीम जगभरातील कोरोना प्रकरणांवर संशोधनानंतर केल्यानंतर हे सांगत असल्याचे म्हटले होते.
ॲडव्हायजरीवर IMA कडून प्रश्न उपस्थित; म्हणाले - हे फसवणूकीसारखे आहे.
आयुष मंत्रालयाच्या ॲडव्हायजरीवर इंडियन मेडिकल कौन्सिलने प्रश्न उपस्थित केले होते. आयएमएने एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन याला त्वरित मागे घेण्यास सांगितले होते. आयएमएचे म्हणणे होते की, ही ॲडव्हायजरी अवैज्ञानिक असून यामध्ये अनेक त्रुटी आहेत. यासोबतच हे कोरोना रुग्ण आणि देशाची फसवणूक आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी किंवा आयुष मंत्रालयाने समोर येऊन या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी असे आयएमएचे म्हणणे होते.
आयुष मंत्रालयाकडून आर्सेनिक अलबम 30 चा सतत प्रचार
कोरोनाकाळात आयुष मंत्रालयाकडून होमिओपॅथी औषध आर्सेनिकम अलबम 30 सतत प्रचार केला गेला. त्यामुळे देशभरातून या औषधाची मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2020 मध्ये सरकारी रुग्णालयांत याचा तुटवडा भासत असल्याची बातमी समोर यायला लागली होती. परंतु, आयएमएने यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकार कसे लोकांचे गैरसमज करत आहे हे यावरुन लक्षात येईल.
'कोरोनिल' आणि 'क्योर' मुळे रुग्ण बरे होतात- रामदेव यांचा दावा
पंतजली आयुर्वेदने जून 2020 मध्ये 'कोरोनिल' आणि 'क्योर' या दोन औषधी लॉन्च केल्या होत्या. दरम्यान, कोरोनिल टॅब्लेट आणि इनहेलरची क्लिनिकल चाचणी झाली असून याद्वारे आतापर्यंत कोरोनाचे 280 रुग्ण बरे झाले असे पंतजलीने सांगितले होते.
रामदेव यांनी यामुळे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याचा दावा केला होता. मीडियानेदेखील हे कोरोनावरील सर्वात मोठा विजय असल्याचे वर्णन केले होते. परंतु, आयुष मंत्रालयाने यावर आम्हाला अशा कोणत्याच औषधांबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते. यावर स्पष्टीकरण देताना पंतजलीचे अध्यक्ष बाळकृष्ण यांनी 'कम्युनिकेशन गॅप'मुळे घडल्याचे म्हटले होते. पण अवघ्या चार महिन्यांत पंतजलीने 25 लाख कोरोनिल किटची विक्री करत 250 कोटी रुपये कमावले होते.
कोरोनिलच्या आठ महिन्यांनंतर पतंजलीने पुन्हा कोरोनाचे औषध आणले, डब्ल्यूएचओने ते औषध मानले नाही
पंतजलीने कोरोनिल औषधाच्या लॉन्चिगनंतर तब्बल आठ महिन्यांनी कोरोनावरचे औषध बाजारात आणले होते. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असून 'कोरोनाचे पहिले औषध पुराव्यांसह' या मथळ्याखाली ते लॉन्च करण्यात आले होते. याची पुष्ठी करताना प्रख्यात टीव्ही पत्रकार रजत शर्मा यांनी एका ट्विटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने याचा स्विकार केला असल्याचे म्हटले होते.
परंतु त्यानंतर 'कोरोनासाठी कोणत्याही देशी औषधाच्या परिणामास संस्थेने कोणतेही प्रमाणपत्र दिले नसून अशा कोणत्याही औषधाची चाचणी केली नसल्याचे डब्ल्यूएचओने ट्विट करत म्हटले होते.
डाबर च्यवनप्राशच्या जाहिरातीमध्ये कोरोना रोखण्याचा दावा; परंतु, याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रासह डाबरने च्यवनप्राशसाठी एक जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यामध्ये हे औषध कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी दररोज चमचे घ्यावे लागतील. पुढे दावा करण्यात आला आहे की, पाच केंद्रांवर केलेल्या क्लिनिकल चाचणीमध्ये हे औषध 12 पटीने संसर्ग रोखण्यास सक्षम असून यामुळे फक्त 2.38% लोक कोरोना पॉझिटिव्ह होते. तर बिगर खाणारे 28.57% पॉझिटिव्ह होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.