आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:मोठ्या प्रमाणात येत आहेत प्लाज्मा डोनेट करण्याचे मॅसेज; पण खरंच प्लाज्मा डोनेशनने कुणाचा जीव वाचू शकतो का? जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली (रवींद्र भजनी)8 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अँटीबॉडी रक्तासोबत जाऊन इन्फेक्टेड व्यक्तीची इम्यून सिस्टम मजबूत करते

कोरोना व्हायरसच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढण्यासोबतच मेडिकल रिसोर्सेसची मागणीही वाढली आहे. ऑक्सिजन सिलेंडरपासून कंसंट्रेटर आणि अँटीव्हायरस औषधांची गरज भासत आहे. सध्या सर्वच सोशल मीडियावर प्लाज्मा डोनेट करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतःच पुढे येऊन लोकांना म्हणत आहेत की, जे कोरोनातून रिकव्हर झाले आहेत, त्यांनी प्लाज्मा डोनेट करावी कारण जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला जाऊ शकेल.

पण प्लाज्मा थेरेपी खरच उपयुक्त आहे का? कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यात ही थेरेपी मदत करत आहे का?

काय आहे प्लाज्मा थेरेपी?
कॉन्वल्सेंट प्लाज्मा थेरेपी एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये इन्फेक्शनमधून रिकव्हर झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त घेतले जाते. रक्तातील पिवळा तरळ भाग काढला जातो. ते इन्फेक्टेड रुग्णाच्या शरीरामध्ये टाकले जाते. थ्योरीनुसार ज्या व्यक्तीने इन्फेक्शनशी लढा दिला आहे, त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार असतात. या अँटीबॉडी रक्तासोबत जाऊन इन्फेक्टेड व्यक्तीची इम्यून सिस्टम मजबूत करते. यामुळे इन्फेक्टेड व्यक्तीचे गंभीर लक्षण कमजोर होतात आणि रुग्णाचा जीव वाचतो.

कोरोना रुग्णांमध्ये प्लाज्मा थेरेपी फायदेशीर आहे का?
हो,मोठ्या प्रमाणात. पण याचा पुरावा मिळालेला नाही. प्लाझ्मा थेरपी ही एक वैध प्रक्रिया आहे, परंतु कोरोना रूग्णांमध्ये ती किती प्रभावी आहे? त्याबद्दल बर्‍याच गोष्टी आहेत. दिल्लीच्या HCMCT मणिपाल हॉस्पिटल द्वारकाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. देवेंद्र कुंद्रा म्हणतात जर कोरोनामुळे झालेल्या मॉडरेटमुळे सीव्हियर निमोनियाच्या सुरुवातीच्या स्टेजलाच प्लाज्मा थेरेपीचा वापर केला तर जीव वाचवण्यात मदत मिळते.

तसे, डब्ल्यूएचओच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेने या थेरपीची पुष्टी केली नाही. अमेरिकामध्ये, US-FDA नियामकांनी आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याची परवानगी दिली, परंतु परिणामांची पुष्टी झालेली नाही. म्हणजेच कोरोना रुग्णांवर हे उपचार यशस्वी होईल याची शाश्वती नाही. परंतु बर्‍याच अभ्यासाने असे सूचित केले आहे की प्लाझ्मा थेरपीद्वारे रिकव्हरी फास्ट होते. रुग्णाच्या रुग्णालयात दाखल होण्याचा कालावधीही कमी होतो.

प्लाज्मा थेरेपी कोरोनाचा मृत्यूदर कमी करु शकते?

 • हो, काही प्रमाणात. खरेतर विशेषज्ञ आणि डॉक्टर या थेरेपीचा वापर इमरजेंसी वापरासाठी करत आहेत. डॉ. कुंद्रा यांच्या म्हणण्यानुसार, ही एक जीवनदायी चिकित्सा आहे कारण मध्यम ते गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. या कारणास्तव, देशभरातील बर्‍याच रुग्णालयात याचा वापर केला जात आहे.
 • या थेरपीने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये बर्‍याच गंभीर रुग्णांवर आश्चर्यकारक परिणाम दर्शवले आहेत. जीव वाचवण्यात मदत केली आहे. यामुळे त्याची मागणी वाढली आहे. तथापि, प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते किंवा नाही यावर अजून संशोधन करणे आवश्यक आहे.
 • यापूर्वी वैद्यकीय व्यावसायिकांनी प्लाझ्मा थेरपी अप्रचलित असल्याचे म्हटले होते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)ने गेल्या वर्षीही असा दावा केला होता की प्लाझ्मा थेरपीने कोरोनाशी संबंधित मृत्यू कमी करण्यास मदत केली नाही.

प्लाज्मा कोण डोनेट करु शकतो?

 • कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने प्लाज्मा थेरेपीची परवानगी दिली आहे. जे लोक इन्फेक्शनमधून रिकव्हर झाले आहेत, ते आपला प्लाज्मा रिकव्हरीच्या 28-30 दिवसांनंतर डोनेट करु शकतात. त्यांचे वय 18 ते 60 वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे. वजनही 50 किलो किंवा जास्त असावे. प्लाज्मा डोनेशनमध्ये अशा लोकांना प्राथमिकता दिली जाते ज्यांना इन्फेक्शनदरम्यान कोणत्या न कोणत्या प्रकारचे लक्षण (जसे ताप, सर्दी, खोकला, इत्यादी) दिसले असतील. यामध्ये अँटी-कोरोना IgG अँटीबॉडीची प्रमाणा जास्त असण्याची शक्यता जास्त असते. यांच्या तुलनेत ज्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसले नाही, त्यांच्यात अँटीबॉडी कमी असते.

यामध्ये काही रिस्क आहे का?

नाही. आतापर्यंत तर प्लाज्मा थेरेपीसंबंधीत कोणतीही रिस्क समोर आलेली नाही. पण हे महत्त्वपूर्ण आहे की, या प्रक्रियेला मेडिकल प्रोफेशनलच्या उपस्थितीत केले जाते. काही रिस्क तेव्हाच असू शकते जेव्हा रिसीव्हर आणि डोनरचे योग्य मूल्यांकन केले गेले नसेल.

 • प्लाज्मा थेरेपीनंतर अॅलर्जिक रिअॅक्शन, फुफ्फुसांना नुकसान आणि श्वास घेण्यात अडचण, HIV आणि हेपेटायटिस B आणि C चे इन्फेक्शन होण्याची रिस्क असते. मात्र डोनरच्या प्लाज्माचा योग्य असेसमेंट केले असेल तर ही रिस्क कमी केली जाऊ शकते.

प्लाज्मा डोनेशनदरम्यान काय करावे आणि काय करु नये?

 • केंद्र सरकारने प्लाज्मा डोनेट करणाऱ्यांसाठी नवीन नियम बनवले आहेत की, त्यांना काय करायचे आहे आणि काय नाही...
 • डोनेशननंतर चार महिन्यांपर्यंत कोरोना निगेटिव्ह रिजल्ट (RT-PCR टेस्ट) आणि आपल्या आधार कार्ड (मागची पुढची) हार्ड कॉपी सोबत ठेवा.
 • तुमच्यात काही लक्षण नव्हते तर कोविड-19 पॉझिटिव्ह रिजल्टच्या 14 दिवसांनंतरच डोनेट करा. जर तुमच्यात लक्षण असतील तर तुम्ही लक्षण गेल्याच्या 14 दिवसांनंतर डोनेट करु शकता.
 • ज्या महिला पहिले कधी गर्भवती झालेल्या असतील त्या कोविड-19 कॉन्वलेसेंट प्लाज्मा डोनेट करु शकत नाहीत.
 • ज्या व्यक्तीने कोरोना व्हॅक्सीन घेतली आहे, ती व्यक्ती व्हॅक्सीन घेतल्याच्या 28 दिवसांपर्यंत प्लाज्मा डोनेट करु शकत नाहीत.
 • जर रक्तामध्ये पुरेशे अँटीबॉडी नसतील तर ती व्यक्ती प्लाज्मा डोनेट करु शकत नाही.
 • यासंबंधीत कोणत्याही अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही आपले डॉक्टर आणि रुग्णालयाच्या संपर्कात राहा आणि सल्ल्यानंतरच प्लाज्मा डोनेशनचा निर्णय घ्या.
बातम्या आणखी आहेत...