आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:कोरोनाच्या लक्षणांपासून ते उपचारांपर्यंत; जाणून घ्या कधी करायला हवी चाचणी, रुग्णांना कधी कोणती औषधे दिली जातात आणि कोरोनाचा प्रत्येक टप्प्याविषयी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याविषयी जाणून घ्या सविस्तर...

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने एक विचित्र रुप धारण केले आहे. गुरुवारी 2.16 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. हा आकडा जगभरात 24 तासांत आढळलेल्या एकुण रुग्णांच्या 27% टक्के आहे. गुरुवारी यंदाचे सर्वाधिक 1,181 मृत्यू झाले. तर देशात सक्रिय रुग्णांची संख्या आता 14 लाखांहून अधिक आहे. रूग्णांची वाढती संख्या, विषाणूची बदलती लक्षणे आणि नवीन स्ट्रेनवर भास्करने आपल्यासाठी आणली आहे कोविड गाइड. या माध्यमातून आम्ही तुम्हाला महामारीशी सर्व माहिती देत आहोत…

  • कोरोना विषाणूची तपासणी कधी करावी?

कोरोना विषाणू आणि सामान्य विषाणूची लक्षणे एकसारखी आहेत. अशा परिस्थितीत रुग्ण बहुतेक वेळा रुग्ण कोरोना विषाणूच्या लक्षणांकडे सामान्य फ्लूची लक्षणे असल्याचे समजून दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष नंतर एका गंभीर आजारात बदलते.

कोरोना विषाणूची पुष्टी करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्या करण्याचा मार्ग, त्याचा रिपोर्ट येण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याची विश्वासार्हता वेगवेगळी असते.

  • संसर्ग झाल्यानंतरची कोरोना स्टोज

शरीरात कोरोना विषाणूच्या प्रवेशानंतर हळूहळू त्याची लक्षणे दिसू लागतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये रुग्णांना लक्षण नसतात म्हणजे ते असिम्प्टमॅटिक असतात. अशा व्यक्तींमध्ये आजाराची लक्षणे अजिबात दिसत नाहीत. मात्र, ते पॉझिटिव्ह असतात आणि त्यांच्याकडून इतरांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.

  • कोविडच्या उपचारासाठी उपलब्ध औषधे

सध्या कोरोना विषाणूवर अचूक उपचार उपलब्ध नाहीत. जी लस सध्या दिली जात आहे, त्यापासून 100 टक्के कोरोनापासून संरक्षणाची हमी दिली गेली नाही. ही लस संसर्गानंतर केवळ रुग्णाची स्थिती गंभीर होण्यापासून रोखू शकते.

बातम्या आणखी आहेत...