आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Coronavirus Vaccination In India: Is It Enough To Have One Dose Of Vaccine If You Are A Covid 19 Survivor | US Vaccination Study | Antibody Response From Covid 19 Vaccines | Study Over Antibody Response From Covid 19 Vaccines

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:संशोधनात दावा - ज्यांनी कोरोनाला हरवले, त्यांच्यासाठी लसीचा एक डोसही पुरेसा; जाणून घ्या काय आहे याचा अर्थ

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या लाटेला घाबरत असलेल्या भारतासाठी हे संशोधन वरदान ठरु शकते.

पाश्चिमात्य देशांमध्ये झालेल्या संशोधनात दावा करण्यात आला आहे की, ज्याने एकदा कोरोना व्हायरसला हरवले आहे म्हणजेच जो इन्फेक्शनमधून रिकव्हर झाला आहे, त्याला व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा आहे. ही एक मोठी गोष्ट आहे कारण यामुळे देशांच्या व्हॅक्सीनेशनची स्ट्रॅटजी बदलू शकते. निश्चितरित्या दुसऱ्या लाटेला घाबरत असलेल्या भारतासाठी हे संशोधन वरदान ठरु शकते. जे सध्या व्हॅक्सीनच्या कमतरतेचा सामनाही करत आहेत.

चला, समजून घेऊया की, अशा प्रकारच्या संशोधनाचा उद्देश काय आहे? याचे परिणाम काय आहेत आणि यामुळे काय बदलेल?

हे संशोधन का होत आहे
यावेळी, संपूर्ण जगाला हे ठाऊक आहे की लसींच्या डोसची कमतरता आहे, तर आतापर्यंत, व्हायरस विरूद्ध शरीराच्या संघर्षाचा एक विशेष गुण वैज्ञानिक आणि संशोधकांच्या नजरेत आला आहे. जेव्हा मानवी शरीर कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढण्यास सक्षम होते तेव्हा अँटीबॉडी तयार होतात. या अँटीबॉडी दोन प्रकारच्या असतात. एक टी किलर पेशी आहेत ज्या विषाणू नष्ट करतात. तसेच एक मेमोरी B सेल्स अँटीबॉडी असते. भविष्यात व्हायरसने पुन्हा हल्ला केल्यास त्यास ओळखणे आणि रोगप्रतिकारक यंत्रणेस सतर्क करणे हे त्यांचे कार्य आहे जेणेकरून ते व्हायरस दूर करण्यासाठी किलर पेशी तयार करण्यास सुरूवात करतात.

कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव झाला आहे, तेव्हापासून संशोधन केले जात आहे की, रिकव्हर झालेल्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी किती काळपर्यंत कायम राहू शकते. हे जाणून घेणे महत्वाचे आहे कारण एखाद्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता कधीपर्यंत असते हे समजेल. काही लोकांमध्ये वर्षभर तर आणि काही लोकांमध्ये एक महिन्यापर्यंत अँटीबॉडी मिळतात. जेव्हा व्हॅक्सीन देण्यास सुरुवात झाली तेव्हा अमेरिकेत अभ्यास सुरू झाला. यात पाहिले गेले की, ज्यांना कोरोना इन्फेक्शन झाले आणि ज्यांना नाही झाले, त्यांच्यावर व्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा काय परिणाम झाला.

काय सांगतात नवीन संशोधनाचे परिणाम?
सर्वात पहिले गेल्या आठवड्यात सायन्स इम्युनोलॉजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या पेन इंस्टीट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीच्या संशोधनाविषयी बोलूया. यानुसार अमेरिकेमध्ये कोरोनावर मात केलेल्या लोकांमध्ये mRNA व्हॅक्सीनच्या पहिल्या डोजनंतर अँटीबॉडी रिस्पॉन्स खूप चांगला दिसला. पण दुसऱ्या डोसनंतर इम्यून रिस्पॉन्स तेवढा नव्हता. संशोधकांचा दावा आहे की, ज्यांना कोरोना इन्फेक्शन झाले नव्हते, त्यांच्यामध्ये अँटीबॉडी रिस्पॉन्स दुसरा डोस मिळण्याच्या काही दिवस दिसला नाही.

यूनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनियाकडून जारी निवेदनात पेन इंस्टीट्यूट ऑफ इम्युनोलॉजीचे सीनियर लेखक ई जॉन वेरी यांनी म्हटले की, संशोधनानुसार हे परिणाम शॉर्ट आणि लॉन्ग टर्म व्हॅक्सीन एफिकेसीसाठी प्रोत्साहित करणारे आहेत. ही मेमोरी B सेल्सच्या एनालिसिसिच्या माध्यमातून mRNA व्हॅक्सीन इम्यून रिस्पॉन्सला समजून घेण्यास मदत करते.

हे अशाप्रकारचे पहिले संशोधन आहे का?
नाही. असे दावे सातत्याने केले जात आहेत. इटली, इज्राइल आणि अनेक देशांमध्येही अशा प्रकारचे संशोधन झाले आहे. सिएटलमध्ये फ्रेड हचिसन कँसर रिसर्च इंस्टीट्यूटचे इम्युनोलॉजिस्ट एंड्रयू मॅकगुइरे यांनी असे संशोधन केले. सिएटल कोविड कोहर्ट संशोधनात 10 वॉलंटियरवर संशोधन केले. व्हॅक्सीनेशनच्या दोन ते तीन आठवड्यानंतर ब्लड सँपल घेतल्यावर अँटीबॉडीचा स्तर वाढलेला दिसला. दुसऱ्या डोसनंतर त्यांच्यामध्ये अँटीबॉडीच्या स्तरात एवढा बदल दिसला नाही.

रिसर्चर्सचे म्हणणे आहे की, जे इम्यून सेल व्हायरसला लक्षात ठेवतात आणि लढतात, त्यांची संख्या वाढलेली दिसली. मॅकगुइरे यांच्यानुसार हे स्पष्ट आहे की, व्हॅक्सीनचा पहिला डोस शरीरात पहिल्यापासून शरीरात असलेल्या इम्यूनिटीला वाढवते.

न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये अजून एक संशोधन झाले. जास्तीत जास्त लोक आठ किंवा नऊ महिन्यांपूर्वी कोरोना इन्फेक्ट झाले होते. व्हॅक्सीनचा पहिला डोस दिला तर त्यांच्या शरीरात अँटीबॉडी शेकडो-हजारो पटींनी वाढली होती. दुसऱ्या डोसनंतर अँटीबॉडी लेव्हल अशीच वाढली नाही. या संशोधनाचे मुख्य लेखक N.Y.U. लँगोन व्हॅक्सीन सेंटरचे डायरेक्टर डॉ. मार्क जे. मलीगन सांगतात की, हे संशोधन इम्युनॉलॉजिकल मेमोरीची ताकद दर्शवते. जी पहिला डोस मिळाल्यावर अनेक पटींनी वाढते.

असेच एक संशोधन न्यूयॉर्कच्या माउंट सिनाईमध्ये इकान स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये इम्युनॉलॉजिकल फ्लोरियन क्रॅमननेही केले. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना कोरोना होऊन गेला होता, त्यांच्यामध्ये व्हॅक्सीनच्या एका डोसनंतर साइड इफेक्ट्स दिसले. पण त्यांच्यामध्ये कोरोना इन्फेक्शन न झालेल्या लोकांपेक्षा जास्त अँटीबॉडी मिळाले. डॉ. क्रॅमर यांच्यानुसार जर तुम्ही इतर रिसर्च समोर ठेवले तर तुम्हाला कळेल की, ज्यांना इन्फेक्शन होऊन गेले आहे, त्यांना एक डोस पुरेसा असेल.

क्रॅमर आणि इतर रिसर्चर्सने आपल्या संशोधनासोबत अमेरिकेमध्ये सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशनसोबतही संपर्क साधला. जेणेकरुन जे लोक कोरोनामधून रिकव्हर झाले आहेत, त्यांना केवळ एक डोस दिला जावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हॅक्सीन पोहोचू शकेल. पण अमेरिकेमध्ये डेटाचा अभाव आहे असे म्हणून हा युक्तिवाद नाकारला गेला आहे.

अशा प्रकारच्या संशोधनाने काही बदलले आहे?
हो. खूप काही बदलले आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार फेब्रुवारीपासून फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनसारख्या काही यूरोपीय देशांनी कोरोनावर मात केलेल्या लोकांना व्हॅक्सीनच्या दोन डोसऐवजी एक डोस देण्याची स्ट्रॅटीजी बनवली आहे. व्हॅक्सीनेशनमध्ये वर्ल्ड लीडर बनलेल्या इस्रायलने फेब्रुवारीमध्येच ठरवले आहे की, ज्या लोकांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांना एकच डोस देणार.

इटलीचे संशोधन यापेक्षा पुढे आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मधील संशोधन असे सांगते आहे की जर आपल्याला संसर्ग झाला असेल आणि लसचा एक डोस घेतला असेल तर ज्यांना संसर्ग झाला नाही आणि दोन डोस घेतले आहे त्यांच्यापेक्षा जास्त अँटीबॉडी तुमच्यात तयार होतात.

मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे इम्युनोलॉजिस्ट मोहम्मद सजादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅल्कुलेट करुन सांगितले की, जर संक्रमित होऊन गेलेल्या लोकांना फक्त एक लस डोस दिला तर आपल्याला mRNA व्हॅक्सीनचे किमान 11 कोटी डोस अतिरिक्त मिळतील. सजादी यांनीही अभ्यास केला आहे आणि तो अभ्यासही अशाच दिशेने परीणाम देत आहे.

भारतात यावर काही चर्चा झाली आहे का?
भारतात 16 जानेवारीला व्हॅक्सीनेशन सुरू झाले होते. पण आतापर्यंत या संबंधी कोणतेही संशोधन झालेले नाही की, कोरोनावर मात केलेल्या लोकांना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा आहे? संशोधनाच्या अभावामुळे वैज्ञानिक काही दावा करणे टाळत आहेत. याच मुळे दोन डोस असणाऱ्या व्हॅक्सीनचे दोन डोस सर्वांना अनिवार्य करण्यात आले आहेत, मग कोरोना इन्फेक्शन झालेले असो किंवा नसो.

काही एक्सपर्ट्सनुसार, या संबंधीत भारतात मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज आहे. आमच्या येथे लोक कोरोनाने रिकव्हर झाले आहेत. जर संशोधनाच्या माध्यमातून आरोग्य मंत्रालयाने किंवा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने या दिशेने काही पाऊल उचलले तर अधिकाधिक लोक लस घेऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...