आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, जीनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष ठेवणारी समिती INSACOG ने उघड केले आहे की, देशातील दैनंदिन कोरोना प्रकरणांपैकी 38.2% प्रकरणे XBB.1.16 ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे होऊ लागले आहेत. XBB.1 आणि XBB.1.5 या आधीच्या दोन व्हेरिएंटपेक्षा XBB.1.16 हा मानवांमध्ये अतिशय वेगाने पसरत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थच्या अभ्यासकांनी दावा केला आहे की, लसीनंतर तयार झालेल्या अँटीबॉडीजवर प्रदूषणाचा नेगिटिव्ह परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे लसीचा डोस पूर्ण केलेल्या लोकांनाही पुन्हा कोरोनाची लागण होऊ लागली आहे.
पुन्हा कोरोनाची लागण होण्यामागे वायू प्रदूषण कसे जबाबदार आहे. त्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर कसा परिणाम होतो आणि यामध्ये कोणाला सतर्क राहण्याची गरज आहे, हे आपण आजच्या कामाची गोष्टमधून जाणून घेणार आहोत....
तज्ज्ञ डॉक्टरांचे पॅनल
प्रश्न : वायू प्रदूषणाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो?
उत्तरः ओझोन, धूळ आणि नायट्रोजन ऑक्साईड यांसारख्या वायु प्रदूषकांमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो आणि डोळे, नाक आणि घसा जळजळ होतो. सल्फर ऑक्साईडसारख्या वायू प्रदूषकांचा मज्जासंस्थेवर आणि श्वसनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोकेदुखी, अस्वस्थता आणि तणावासारख्या समस्याही निर्माण होतात. कणकणांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. प्रदूषित वातावरणात राहिल्याने हृदयाचेही नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डब्ल्यूएचओच्या मते, वायू प्रदूषणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका सतत वाढत आहे.
चला तर प्रत्येक आजाराविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया...
वर बातमीत पीएम हा शब्द दोन तीन वेळा वाचला असेल, नेमकं PM म्हणजे काय, चला समजून घेऊया-
पीएम म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर. हे हवेत असलेल्या द्रव आणि घन कणांचे मिश्रण आहे. ते सूक्ष्म कणांपासून धूर, काजळी आणि धूळ यासारख्या कणांपर्यंत असू शकतात. मानव त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.
ते त्याच्या आकाराच्या आधारावर 3 श्रेणींत विभागले गेले असेल
चला प्रश्नोत्तरातून जाणून घेऊया- कोरोना संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे
प्रश्न : बदलते हवामान संसर्ग वाढवण्याचे कारण आहे का?
उत्तर : डॉ. बालकृष्ण श्रीवास्तव यांच्या मते, कोरोना कोणत्याही ऋतूत पसरू शकतो. पण बदलते हवामान जसे की सकाळी ऊन, दुपारी पाऊस किंवा पुन्हा सकाळी कडक सूर्यप्रकाश आणि संध्याकाळी खूप थंड हवामान. यामध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
अशा हवामानात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांसारख्या कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक.
प्रश्न : प्रदूषण अर्थात वायू प्रदूषण म्हणजे कोरोना काय असू शकतो?
उत्तर : या अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक साथीच्या आजारापूर्वी उच्च वायू प्रदूषणात जगत होते त्यांना लसीचा डोस मिळालेल्या लोकांपेक्षा COVID-19 लसीला एंटीबॉडी प्रतिसाद कमी होता.
बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थच्या मॅनोलिस कोगेविनास यांच्या मते, वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, हृदय आणि श्वसनाचे आजार सामान्य आहेत. त्याचप्रमाणे, आम्हाला अभ्यासात आढळून आले आहे की कोविड-19 लसीच्या प्रतिपिंड प्रतिसादावर कुठेतरी वायू प्रदूषणाचा परिणाम होतो. डॉ.रवी दोशी यांचेही मत आहे की, प्रदूषणामुळे कोरोना होऊ शकतो. प्रदूषणामुळे फुफ्फुसे नक्कीच कमकुवत होऊ शकतात. असे असूनही, या अभ्यासात आणखी संशोधन आवश्यक आहे.
भारताचे वातावरण अमेरिकेपेक्षा खूप वेगळे आहे. भारतातील लोकांना मिळालेली कोविड लस अमेरिकेपेक्षा खूप वेगळी आहे. येथे लसीकरण खूप चांगले झाले आहे. अशा परिस्थितीत वायू प्रदूषणावरील संशोधन हे एक कारण मानले जाऊ शकते. परंतू 100% अचूक नाही.
प्रश्न : कोरोनाची लस मिळूनही लोकांना कोरोनाची लागण का होते ?
उत्तरः कोविडची लस घेतल्यानंतरही ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. त्यांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे.
ही लक्षणे सांगतील की तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे
प्रश्न : लसीच्या दोन्ही डोससह बूस्टर डोस घेणे किती महत्त्वाचे आहे ?
उत्तर : लसीचे तीनही डोस घेणे सुरक्षित आहे. यामध्ये लसीकरण करूनही एखाद्याला कोरोना झाला तर तो लवकर बरा होण्याची शक्यता आहे.
प्रश्न: चांगल्या अँटी-बॉडीबाबत समजून घ्या?
उत्तर : अँटीबॉडी हा शरीराचा एक घटक आहे, जो आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील विषाणूंना निष्प्रभ करण्यासाठी तयार करते. संसर्गानंतर अँटीबॉडीज तयार होण्यासाठी काहीवेळा एक आठवडा लागू शकतो, त्यामुळे आधी अँटीबॉडी चाचण्या केल्या गेल्या तर योग्य माहिती उपलब्ध होत नाही. याशिवाय, या चाचणीतून कोरोना विषाणूच्या अस्तित्वाची थेट माहिती देखील मिळत नाही. त्यामुळे रुग्णाची अँटी-बॉडी चाचणी निगेटिव्ह आली तरी रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी केली जाते.
प्रश्न : काय अॅंटि-बॉडीतून इम्यून सिस्टमचा अंदाज लावला जाऊ शकतो, आपल्या शरीरातील अँटी-बॉडीचा किती वेळ प्रभाव रागतो?
उत्तर : ऍन्टीबॉडीजवरील अनेक संशोधन असे सुचविते की, काही प्रारंभिक घट झाल्यानंतर, त्यांची पातळी किमान चार ते सात महिने राखली जाते. इम्पीरियल कॉलेज, लंडन येथील एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. पॉल इलियट यांच्या मते, केवळ अँटीबॉडीज आपल्या रोगप्रतिकारक शक्तीबद्दल सांगत नाहीत.
ऍन्टीबॉडीज हा रोगप्रतिकारक शक्तीचा फक्त एक भाग आहे जो आपण मोजू शकतो. उर्वरित रोगप्रतिकारक शक्तीचे तीन भाग देखील आहेत जे रोग दूर ठेवण्यास मदत करतात. जेव्हा एखादा जीवाणू किंवा विषाणू शरीरात प्रवेश करतो, तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती अॅंटिबॉडीज तयार करते. ती मानवी शरीरात घुसलेल्या विषाणूला शोधते. संसर्ग संपल्यानंतर त्याची पातळीही कमी होते.
प्रश्न : आपण खरच कोरोनाला घाबरण्याची गरज आहे का ?
उत्तर : घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त सतर्क राहा आणि खबरदारी घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क घाला. याच्या मदतीने प्रदूषण आणि संसर्ग दोन्ही मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.
प्रश्नः कोविड पुन्हा उद्भवल्यास ते किती धोकादायक असू शकते?
उत्तरः जर तुम्हाला आधीपासून मधुमेह, दमा, हृदयाशी संबंधित इतर कोणताही आजार नसेल आणि तुम्ही सर्व लसी योग्य वेळी घेतल्या असतील, तर कोविडचा धोका थोडा कमी आहे.
दुसऱ्यांदा कोविड संसर्गाची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलते. जर तो वृद्ध असेल, त्याला मधुमेह असेल किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा अंतर्गत कर्करोग असेल तर गंभीर संसर्ग होण्याची शक्यता असते.
कोविड आता जीवनाचा भाग बनला
सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की, कोविड आपल्या आयुष्यातील रोजच्याच गोष्टीप्रमाणे बनला आहे. सर्दी-खोकला गंभीर झाला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे. जर तुम्हाला लवकर उपचार मिळाले तर तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल.
आहाराकडे लक्ष द्या
विसरू नका, रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होताच व्हायरस तुमच्यावर हल्ला करू शकतो. या गोष्टींबरोबरच, थोडासा आजार होण्याची शक्यता असल्यास, तपासणी करून घ्या आणि संक्रमित झालेल्या व्यक्तीने वेगळे राहिले पाहिजे.
प्रश्न : प्रतिकारशक्ती कशी वाढवायची?
उत्तर : प्रदूषण टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. हंगामी फळे आणि भाज्या रोज खाव्यात. पुढील मुद्दे समजून घेऊया-
व्हिटॅमिन-ए
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन-ई
कामाची गोष्टीत वाचा या बातम्या
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.