आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coronavirus Vaccine Children Pfizer Biontech Covid 19 Vaccine Result Update; Moderna Results And Covaxin Trials Schedule

एक्सप्लेनर:लहान मुलांच्या जगातील पहिल्या व्हॅक्सिनला कॅनडात मंजुरी; अमेरिकेत फायझरच्या व्हॅक्सिनवर पुढील आठवड्यात येणार निर्णय

रवींद्र भजनी2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या लहान मुलांच्या लसीसंदर्भात जगभरात सद्यस्थिती काय आहे...

सध्या जगभरात लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यात लहान मुलांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. पण, लवकरच लहान मुलांनाही लस मिळू शकते. कॅनडाने फायझरच्या व्हॅक्सिनला लहान मुलांना देण्यासाठी परवानगी दिली आहे. अशाप्रकारे फायझरची लस मुलांसाठी मंजूर होणारी जगातील पहिली कोरोना लस बनली आहे. कॅनडाच्या ड्रग रेगुलेटर हेल्थ कॅनडाने 12 ते 15 वयोगटातील मुलांसाठी या लसीला परवानगी दिली आहे. यापूर्वी ही लस 16 पेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना दिली जात होती. अमेरिकेतही फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTecch) च्या लसीला 12 ते 15 वयोगटातील मुलांना देण्याची परवानगी लवकरच मिळू शकते.

जानेवारी ते मार्चदरम्यान फायझरच्या व्हॅक्सिनचे ट्रायल्स मुलांवर झाले होते. तेव्हा ही लस मुलांसाठी सुरक्षित असल्याचे कंपनीने सांगितले होते. ही लस 100% परिणामकारक सिद्ध झाली आहे. अमेरिकेत फायझरशिवाय मॉडर्ना आणि जॉनसन अँड जॉनसनच्या लसीचे मुलांवर ट्रायल्स केले जात आहेत. मॉडर्नाच्या लसीचे परिणाम जूनमध्ये येतील. तर, जॉनसन अँड जॉनसनच्या व्हॅक्सिनचे परिणाम त्यानंतर येतील. म्हणजेच, या वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही लस मुलांसाठी तयार होतील.

चला जाणून घेऊयात, जगभरात मुलांच्या लसीसंदर्भात कोणते काम सुरु आहे? फायझर लसीचा प्रभाव किती राहिला आहे?

कॅनडात फायझर लसीला परवानगी मिळाल्यानंतर आता पुढे काय?

 • कॅनडामध्ये हेल्थ रेगुलेटरने स्पष्ट केले आहे की, सध्या 12 ते 15 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. यापूर्वी, कंपनीने 13 एप्रिलला अमेरिकन ड्रग रेगुलेटर (US-FDA) कडून 12-15 वर्षांच्या मुलांना लस देण्याची परवानगी मागितली होती. अमेरिकन न्यूज चॅनल CNN च्या रिपोर्टनुसार, पुढच्या आठवड्यात अमेरिकेतही फायझरच्या लसीला लहान मुलांवर वापरासाठी मंजुरी मिळू शकते.
 • पुढील आठवड्यात US-FDAच्या अधिका-यांच्या बैठकीत फायझरच्या लसीवर निर्णय घेण्यात येणार आहे. लसीला मंजूरी मिळाल्यास रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (CDC) सल्लागार समितीची बैठक होईल. मुलांना ही लस कशी आणि केव्हा लागू करावी याचा निर्णय घेतला जाईल. US-FDAच्या प्रवक्त्याने वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, आम्ही फायझरच्या विनंतीचे शक्य तितक्या लवकर आणि पूर्ण पारदर्शकतेने पुनरावलोकन करू. सध्या, फायझरची लस 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जात आहे.
 • त्याचवेळी, युरोपीय संघ आणि यूकेमध्ये 12-15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही लस मंजूर केली जाऊ शकते. या देशांमध्ये 16 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना फायझरची लस दिली जात आहे. फायझरने असेही म्हटले आहे की, आता 6 महिन्यांपासून ते 11 वर्षांपर्यंतच्या मुलांवर व्हॅक्सिनचे ट्रायल्स घेण्यावर त्यांचे लक्ष आहे.
अमेरिकेतील सिनसिनाटी येथे फायझरच्या लसीच्या मुलांवर चाचण्या सुरू असताना एक आरोग्यसेविका मुलीला लस देताना दिसतेय. या अभ्यासात 2,260 मुलांना समाविष्ट करण्यात आले होते.
अमेरिकेतील सिनसिनाटी येथे फायझरच्या लसीच्या मुलांवर चाचण्या सुरू असताना एक आरोग्यसेविका मुलीला लस देताना दिसतेय. या अभ्यासात 2,260 मुलांना समाविष्ट करण्यात आले होते.

लहान मुलांवर किती परिणामकारक आहे फायजरची लस?

 • फायजरचा दावा आहे की, त्यांनी 12-15 वयोगटातील 2,260 मुलांवर लसीचे परीक्षण केले आहे. 31 मार्च 2021 च्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ही लस या वयोगटातील मुलांवर 100% इफेक्टिव सिद्ध झाली आहे. याचा अर्थ ज्यांना ही लस देण्यात आली, त्यापैकी कुणालाही संसर्ग झाला नाही.
 • ट्रायल्समध्ये 18 मुलांना कोरोनाची लागण झाली होती, पण हे सर्व प्लेसिबो ग्रुपचे होते. आता या मुलांवर पुढील दोन वर्षे लक्ष्य ठेवले जाईल. जेणेकरून त्यांच्या शरीरावर लसीचा दूरगामी परिणाम समजू शकेल. कंपनीचे म्हणणे आहे की, मुलांना लवकरात लवकर शाळेत पाठविणे आवश्यक आहे. जेणेकरून ते त्यांच्या मित्रांना भेटू शकतील. घराबाहेर मित्र आणि कुटुंबासोबत खेळू शकतील.
 • सध्या जगभरात अनेक लसींच्या मुलांवर चाचण्या घेतल्या जातात. अमेरिकेसारख्या देशात असे म्हणायला कमी नाही की जेव्हा मुलांना या विषाणूचा धोका नाही तर मग लस लावण्याची काय गरज आहे.
सध्या जगभरात अनेक लसींच्या मुलांवर चाचण्या घेतल्या जातात. अमेरिकेसारख्या देशाचे म्हणणे मात्र वेगळेच आहे, मुलांना या विषाणूचा धोका नाही तर मग लसीची गरज काय आहे, असे अमेरिका म्हणतो.
सध्या जगभरात अनेक लसींच्या मुलांवर चाचण्या घेतल्या जातात. अमेरिकेसारख्या देशाचे म्हणणे मात्र वेगळेच आहे, मुलांना या विषाणूचा धोका नाही तर मग लसीची गरज काय आहे, असे अमेरिका म्हणतो.

जगभरातील मुलांसाठी कोरोना लसीची काय स्थिती आहे?

 • फायझरची लस जवळजवळ तयार आहे. कॅनडानंतर इतर देशांमध्येही 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लस देण्यासाठी लवकरच परवानगी मिळू शकेल. औषध कंपन्यांनी मार्चमध्ये 6 महिन्यांपासून 11 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांवर क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या. या चाचण्यांचे प्रारंभिक निकाल सप्टेंबरपर्यंत येतील, अशी आशा आहे.
 • चाचणीच्या पहिल्या टप्प्यात, कंपनी तीन वयोगटातील वॉलिंटियर्सचे लसीकरण करणार. 6 महिने ते 2 वर्षे, 2 ते 5 वर्षे आणि 5 ते 11 हे तीन वयोगट त्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. सर्वप्रथम 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी डोस निश्चित केला जाईल, त्यानंतर त्या वयाखालील मुलांसाठी डोस निश्चित केला जाईल.
 • दुसरीकडे, अमेरिकेत मंजूरी मिळालेली दुसरी व्हॅक्सिन मोडर्नाने सांगितले की, त्यांच्या लसीच्याही किशोरवयीन मुले आणि लहान मुलांवर चाचण्या घेतल्या जात आहेत. प्रारंभिक निकाल जून-जुलैमध्ये येईल. अमेरिकेत मान्यता मिळालेली तिसरी व्हॅक्सिन जॉन्सन अँड जॉन्सनदेखील लहान मुलांवर चाचण्या घेण्याचे नियोजन करत आहे.
 • अमेरिकेची आणखी एक कंपनी नोव्हाव्हॅक्सनेही 12-17 वयोगटातील तीन हजार किशोरवयीन मुलांवर लसीची चाचणी सुरू केली आहे. नोव्हाव्हॅक्सची लस अद्याप कोणत्याही देशात मंजूर झालेली नाही. चाचणीत सामील होणा-या मुलांचे परीक्षण दोन वर्षे केले जाईल.

मुलांची लस भारतात कधी उपलब्ध होईल?

 • याक्षणी काहीही सांगणे कठीण आहे. फेब्रुवारीमध्ये भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन ट्रायल्समध्ये मुलांना समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. परंतु औषध नियामकांनी हा अर्ज फेटाळला होता आणि सर्वप्रथम प्रौढांवर लसीची कार्यक्षमता सिद्ध करा, असे सांगितले होते.
 • यानंतर, मार्चमध्ये असे म्हटले गेले होते की, भारत बायोटेक लवकरच त्यांच्या लसीची चाचणी मुलांवर सुरू करू शकेल. पण गेल्या महिन्यात भारत बायोटेकने फेज -3 चाचणीचा दुसरा अंतरिम निकाल जाहीर केला आणि म्हटले आहे की त्यांची लस 78% पर्यंत प्रभावी आहे. या निकालांच्या आधारावर, अशी अपेक्षा आहे की कोव्हॅक्सिनला मुलांवर चाचण्या घेण्यास परवानगी मिळू शकते. त्यानंतरच ते भारतातील मुलांमध्ये चाचणी घेऊ शकतील.
 • गेल्या महिन्यात, भारत सरकारने परदेशी लसींना मंजूरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत फायझर, मॉडर्ना तसेच जॉन्सन आणि जॉन्सनची लसदेखील भारतात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. आता अमेरिका आणि युरोपियन संघाने मंजुरी दिलेली लहान मुलांची लस खासगी बाजारात आल्यानंतर भारतात त्याला परवानगी देण्यात येते की नाही, ते पाहावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...