आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:भारतातील 1.6 कोटी लोकांनी चुकवला कोविड -19 लसीचा दुसरा डोस; तुम्हालाही दुसऱ्या डोससाठी विलंब झाला आहे का? जाणून घ्या अशा परिस्थितीत काय करावे

रवींद्र भजनी2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अजूनही 31 कोटींपेक्षा जास्त लोक असे आहेत ज्यांना लसीचा दुसरा डोस मिळाला नाही.

गुरुवारपर्यंत देशभरात कोविड -19 लसीचे 60.30 कोटी डोस देण्यात आले आहेत. यापैकी 46.73 कोटी लोकांना पहिला डोस मिळाला आहे, तर सुमारे 14.6 कोटी लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच, अजूनही 31 कोटींपेक्षा जास्त लोक असे आहेत ज्यांना लसीचा दुसरा डोस मिळाला नाही.

25 ऑगस्ट पर्यंतच्या आकड्यांचे विश्लेषण असे दर्शविते की, सुमारे 1.8 कोटी लोक असे आहेत ज्यांनी आतापर्यंत दुसरा डोस घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी दुसरा डोस घेतला नाही. देशातील 85% - 90% लोकांना कोविशिल्ड ही लस देण्यात आली आहे, यामुळे कोविशिल्डच्या दोन डोसचे अंतर म्हणजेच 12 ते 16 आठवडे या विश्लेषणात विचारात घेतले गेले आहेत. दुसरा डोस न मिळण्यामागची अनेक कारणे आहेत. कुठे लस उपलब्ध नाहीये, तर कुठे पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना संसर्ग झाला आहे. यामुळे दुसरा डोस वेळेवर दिला गेलेला नाही.

आम्ही दोन डॉ. माला कनेरिया (सल्लागार, संसर्गजयपूर येथील डॉ. प्रवीण कनोजिया (वरिष्ठ सल्लागार, इंटरनल मेडिसिन, फोर्टिस हॉस्पिटल) केला.

कोविड -19 लसीचा दुसरा डोस घेणे का आवश्यक आहे?

 • कोविड -19 लस सध्या प्रायोगिक टप्प्यात आहे. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर दोनदा बदलले गेले. यामुळे लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आदर्श परिस्थिती अशी आहे की, शेडयुल लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे आणि हेच लसीची प्रभावीता राखते.
 • कोविड -19 लसीच्या पहिल्या डोसनंतर काही दिवसांनी अँटीबॉडीज आणि इतर सेल मीडिएट इन्यून रिस्पॉन्स सुरू होतो. म्हणजेच, आपले शरीर व्हायरसच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू करते.
 • लसीच्या पहिल्या डोसमध्ये व्हायरसचा लोड खूपच कमी असतो, यामुळे अँटीबॉडी हळूहळू कमी होतात. यानंतरही, शरीरात अँटीबॉडीज मेमरी सेल्स म्हणून राहतात आणि जेव्हा दुसरा डोस दिला जातो, तेव्हा ते पुन्हा सक्रिय होतात, ज्याला बूस्टर प्रतिसाद म्हणतात. या कारणास्तव, दोन-डोस लसीच्या दुसऱ्या डोसला बूस्टर डोस देखील म्हणतात.
 • पब्लिक हेल्थ इंग्लंडने मे महिन्यात एक अभ्यास केला होता. त्यात दिसून आले की, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध एक डोस 30% ते 35% प्रभावी आहे. तुलनेत, दुहेरी डोस 80% -85% प्रभावी आहे. म्हणजेच, जर तुम्ही दुसरा डोस घेतला नसेल तर डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग होण्याचा धोका कायम आहे.

कोविड -19 लसीच्या दोन डोसमध्ये किती अंतर असावे?

 • 13 मे रोजी सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये 12-16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजेच, कोविशिल्डचे दोन डोस जास्तीत जास्त चार महिन्यांच्या फरकाने दिले जाऊ शकतात. तुलनेत, कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील फरक 4-6 आठवडे आहे. म्हणजेच, दुसरा डोस 42 दिवसांच्या आत द्यावा लागतो.
 • दोन डोसच्या लसीचा दुसरा डोस देण्यास विलंब झाला तरी त्यात कोणतीही अडचण नाही. साधारणपणे दोन आठवड्यांचा अतिरिक्त कालावधी असतो. म्हणजेच उशीर झाला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे जेव्हा दुसरा डोस घेण्याची संधी मिळेल तेव्हा आपण तो घेतला पाहिजे. हे आपले प्रोटेक्शन लेअर मजबूत करेल.
 • भारतात दिली जाणारी तिसरी लस स्पुतनिक व्हीचे दोन डोस 21 दिवसांच्या अंतराने दिले जात आहे. पण ती बनवणाऱ्या रशियन कंपनीचे म्हणणे आहे की, जरी दोन डोस दरम्यान 90 ते 180 दिवसांचे अंतर ठेवले तरी त्याचा लसीच्या रोगप्रतिकारक प्रतिसादावर परिणाम होणार नाही. याचा अर्थ असा नाही की भारतातील इतर लसींच्या दोन डोसमधील फरक 180 दिवसांचा असू शकतो.
 • याशिवाय, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस कॅडिला या लसींनाही भारतात मान्यता देण्यात आली आहे. या लसी देणे अद्याप सुरू झालेले नाही. मॉडर्नाच्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर आहे. झायडस कॅडिलाची लस तीन डोसची आहे, ज्याच्या दोन डोसमध्ये चार ते सहा आठवड्यांचे अंतर ठेवावे लागते. जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही भारतातील एकमेव सिंगल डोस व्हॅक्सिन आहे.

जर निर्धारित वेळेत दुसरा डोस दिला गेला नाही तर काय होईल?

 • घाबरण्याची गरज नाही. काही अभ्यास सांगतात की, लसीच्या दोन डोसमधील अंतर 6-8 महिने असले तरी त्याचा प्रभाव कायम राहतो. तुम्हाला दुसरा डोस मिळण्यास उशीर झाला तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला पुन्हा दोन्ही डोस घेण्याची आवश्यकता नाही.
 • दुसऱ्या डोसनंतर अँटीबॉडी झपाट्याने वाढतात आणि या कारणास्तव काही अभ्यासातून दिसून आले की, दोन्ही डोस घेणे आवश्यक आहेत. अशी भीती देखील आहे की, जर एकच डोस घेतला असेल तर तो विषाणूच्या व्हॅक्सिन-रेजिस्टेंस म्युटेशनविरुद्ध फारसा प्रभावी असू शकत नाही.
 • सहसा, रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये बूस्टर रिस्पॉन्स अँडीबॉडी आणि इतर रोगप्रतिकारक पेशींना अनेक पटीने वाढवतो. पहिल्या डोसच्या तुलनेत हा प्रतिसाद बूस्टर डोसमुळे 5-10 पट वाढू शकतो. परिणामी, रोगप्रतिकारक प्रतिसादाची बेसलाइन आणखी उच्च पातळीपर्यंत पोहोचते.
 • जर या परिस्थितीत विषाणूचा संसर्ग झाला तर रोगप्रतिकारक शक्ती अधिक वेगाने कार्य करते आणि विषाणूशी लढण्यास अधिक सक्षम होते. जर तुम्हाला दुसरा डोस मिळाला नाही तर तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळत नाही. वास्तविक विषाणूचा सामना करण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत ठरते. जर संसर्ग झाला तर गंभीर लक्षणे दिसू शकतात किंवा विषाणू जीवघेणादेखील ठरू शकतो.

दुसऱ्या डोसमध्ये विलंब झाल्यास रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो का?

 • होय. आतापर्यंतचा अभ्यास सांगतो की, जर दोन डोसचे अंतर निर्धारित वेळेपेक्षा जास्त असेल तर ते तुमच्यासाठी गंभीर व्हायरस संसर्गाचा धोका बनू शकते. दोन डोसमध्ये किती विलंब झाल्यास कार्यक्षमता कमी होते हे स्पष्ट झालेले नाही.
 • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर दोन डोसमध्ये मोठे अंतर असेल तर काही काळानंतर अँटीबॉडी प्रतिसाद कमी होऊ लागतो. जर बूस्टर डोस योग्य वेळी दिला गेला नाही तर तो रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतो.
बातम्या आणखी आहेत...