आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coronavirus Vaccine India Update: COVID 19 Vaccine For All Above 18 Years From May 1 | CoWIN Vaccine Registration Step By Step Guide

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना 1 मे पासून कोरोनाची लस मिळेल, यासंदर्भातील आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी जाणून घ्या

17 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोरोना लसीकरणासाठी कशी नोंदणी करावी यासंदर्भातील सर्व माहिती वाचा येथे...

भारतात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यात, 18 पेक्षा जास्त वयाच्या म्हणजेच 1 जानेवारी 2004 पूर्वी जन्मलेल्या सर्वांना लस देण्याची तयारी आहे. देशातील 18+ ची एकूण लोकसंख्या 58.9% आहे, म्हणजेच 59 कोटींपेक्षा जास्त. 19 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजे पर्यंत 12.38 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 10.73 कोटी पहिला डोस आहे तर 1.64 कोटी दुसरा डोस आहे. आता देशातील तरुणाईचे लसीकरण करण्याची तयारी सुरू झाली आहे.

आपणही आधीच तयारी करु ठेवा. कोरोना लसीकरणासाठी कशी नोंदणी करावी यासंदर्भातील सर्व माहिती अगोदरच गोळा करा. लसीच्या दोन डोसमध्ये किती दिवसांचा फरक असेल? लसीचा परिणाम किती दिवसांत दिसून येईल? लस घेण्याच्या आधी आणि नंतर आपल्याला काय करावे लागेल आणि काय नाही? जाणून घ्या या संदर्भातील A to Z माहिती येथे...

कोविड 19 ची लस घेण्यासाठी आपणास काय करावे लागेल?

 • नोंदणीविना लस घेता येणार नाही

आपल्याला सर्वप्रथम नोंदणी करुन अपॉइंटमेंट बुक करावी लागले. यासाठी कोरोना व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क (Co-WIN) प्लॅटफॉर्म तयार गेले आहे. या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर लसीकरणाशी संबंधित माहिती उपलब्ध आहे. काही सेंटर्सवर वॉक-इन सुविधादेखील असेल.

 • नोंदणी कशी करावी?

आरोग्य सेतू अप्लिकेशन आणि कोविच्या वेबसाइट (cowin.gov.in) वर नोंदणी करु शकता. यासाठी आपल्याला मोबाइल नंबरचा OTP व्हेरिफाय करावा लागेल. सोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड तिंवा अन्य ओळखपत्राच्या आधारे माहिती द्यावी लागेल. पिनकोड टाकून व्हॅक्सिनेशन साइट, तारीख आणि वेळ निवडावी लागेल. सोबतच एका मोबाइल नंबरहून जास्तीत जास्त चार जणांची नोंदणी करता येईल. सरकारी रुग्णालयात लस मोफत मिळेल, तर खासगी रुग्णालयात लसीसाठी 250 रुपये द्यावे लागतील.

 • वॉक इन सुविधा कुठे मिळेल?

सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर वॉक इन सुविधा आहे. कुणीही व्यक्ती आपले ओळखपत्र दाखवून ऑन द स्पॉट नोंदणी करुन लस घेऊ शकेल.

नोंदणीच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण गोष्टी

 • आपण नोंदणीसाठी सबमिट करीत असलेल्या फोटो आयडीनुसार आपली संपूर्ण माहिती भरा. जसे की नावाचे स्पेलिंग, जन्माचे वर्ष, आयडी क्रमांक, लिंग इ. (सध्या आपल्याला18+ नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. ते 1 मेपासून उघडणे अपेक्षित आहे. अधिकृत वेबसाइटवर सध्या नोंदणी होत नाहीये.) सध्या डोसची कमतरता आहे, परंतु 1 मे पर्यंत परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे
 • भारतात उपलब्ध कोविड -19 लसीसंदर्भातील महत्त्वाची माहिती
कोव्हॅक्सिनकोविशिल्ड
कुणी बनवलेICMR - भारत बायोटेकने मिळून बनवली. हैदराबाद येथे निर्मिती होत आहेऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका यांनी मिळून बनवली. पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामध्ये निर्मिती होत आहे
व्हॅक्शन टाइप काय आहे?इनएक्टिवेटेडनॉन-रेप्लिकेटिंग व्हायरल वेक्टर
प्रभावशाली किती आहे?81.3%70%
किंमतसरकारी रुग्णालयात मोफत, खासगी रुग्णालयात 250 रुपयांतसरकारी रुग्णालयात मोफत, खासगी रुग्णालयात 250 रुपयांत
साइड इफेक्ट्सइंजेक्शनच्या जागी सूज, डोकेदुखी, थकवा, गुडघेदुखी, ताप, अशक्तपणा, उल्टी

इंजेक्शनच्या जागी सूज, वेदना, डोकेदुखी, थकवा, गुडघेदुखी, ताप

सध्या लसींचा तुटवडा, पण 1 मे पर्यंत परिस्थिती सुधारणार असल्याची अपेक्षा

 • सध्या भारतात जेवढे डोस दिले गेले, त्यापैकी 90% वाटा कोविशिल्डचा आहे. ही लस जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) तयार केली आहे. आता कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे तेदेखील उत्पादन वाढवू शकत नाहीये. त्याचबरोबर भारत बायोटेकलासुद्धा अधिक उत्पादन घेण्यात अडचणी येत आहे. बायोमेडिकल रिसर्च बॉडी हॉफकिन इन्स्टिट्यूटला कोव्हॅक्सिन बनवण्यासाठी सरकारने सांगितले आहे. जेणेकरून कमतरतेवर मात करता येईल.
 • लसीच्या डोसची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने 12 एप्रिल रोजी स्पुतनिक V या रशियन लसला मान्यता दिली. त्याचबरोबर विदेशातील कंपन्यांनासुद्धा भारतात लस उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले आहे.
 • या क्षणी लसीचे डोस कमी आहेत, परंतु स्पुतनिक व्ही, फायझर, मॉडर्ना आणि जॉनसन व जॉनसनची लस लवकरच बाजारात येईल. या व्यतिरिक्त भारतात 6 लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यांच्या क्लिनिकल चाचण्यांचे निकाल काही महिन्यांत येतील. मग लसीच्या डोसची नक्कीच कमतरता भासणार नाही.
बातम्या आणखी आहेत...