आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅक्सीनेशननंतर मृत्यू:कोरोनाची लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट आणि मृत्यू होतो? आतापर्यंत 180 जणांच्या मृत्यू प्रकरणात काय होते कारण? येथे जाणून घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूंची कारणे... - Divya Marathi
लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूंची कारणे...
  • ...मग कोरोना लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूंचे काय?

भारतात 29 मार्च पर्यंत कोरोना व्हॅक्सीनेशननंतर 180 लोकांचा जीव गेला आहे. ही बाब भारताची टॉप अॅडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनाइजेशन (AEFI) समितीला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये समोर आली आहे. AEFI अर्थात अशी प्रकरणे ज्यात आजारात व्हॅक्सीन घेतल्यानंतर वैद्यकीय समस्या उद्भवतात. अशात व्हॅक्सीन लावल्यामुळेच समस्या झाली हे निश्चित नसते. अशा प्रकरणांचे आकडे भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून वेग-वेगळ्या AEFI समित्या गोळा करतात.

उल्लेखनीय बाब म्हणजे, 16 जानेवारीपासून आतापर्यंत कोरोना व्हायरस विरोधातील 9.54 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यातील 1.12 कोटी लोकांना व्हॅक्सीनचे दुसरे डोस सुद्धा देण्यात आले आहे.

एका महिन्यापासून गंभीर साइड इफेक्ट्सच्या प्रकरणांची यादीच जारी केली नाही
AEFI ची 9 एप्रिल पर्यंतची आकडेवारी अद्यावत नाही. लस दिल्यानंतर उद्भवलेल्या समस्यांची आकडेवारी केवळ 31 मार्च पर्यंतची आहे. AEFI डेटा संशोधन प्रक्रियेत सहभागी राहिलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, 'व्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर 20 हजारांपेक्षा अधिक लोकांना साइड इफेक्ट दिसून आले आहेत. कोवीशील्ड आणि कोवॅक्सिन दोन्हीचे डोस घेतल्यानंतर या समस्या उद्भवल्या. जवळपास 97% लोकांनी हलकी दुष्परिणाम जाणवल्याचे सांगितले. पण सरकारच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून लस घेतल्यानंततर गंभीर तक्रारी असलेल्यांची आकडेवारी जारी करण्यात आली नाही.

31 मार्च पर्यंत 180 लोकांचा व्हॅक्सीन घेतल्यानंतर मृत्यू
नॅशनल AEFI समितीने दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत. यात 31 मार्च पर्यंत 617 गंभीर साइड इफेक्ट्सच्या घटनांची नोंद आहे. यापैकीच 180 जणांचा मृत्यू झाला. ज्या लोकांना लस घेतल्यानंतर समस्या जाणवल्या त्यापैकी 305 रुग्णालयात दाखल झाले. त्यातील 276 लोकांना 3 दिवस रुग्णालयात राहावे लागले. 124 जणांचा मृत्यू लस घेतल्याच्या 3 दिवसांमध्ये झाल्याची नोंद आहे.

सरकारचे आवाहन- दोन्ही लस सुरक्षित लवकर घ्या
कोरोनाची लस घेतल्यानेच मृत्यू झाले हे अद्याप स्पष्ट नाही. जगभरात लस आणि औषधींवर चिता व्यक्त केली जात आहे. AEFI सर्व्हेलंस आणि इंव्हेस्टिगेशनमध्ये समोर आले आहे की काही औषधी त्यातही प्रमुख्याने खास किंवा सामान्य नागरिकांसाठी घातक ठरू शकतात. भारताच्या केंद्रीय AEFI समितीने इतर देशातील समित्यांसोबत मिळून रिव्ह्यू केले आहेत. त्यानुसार, भारतात दिल्या जाणाऱ्या कोरोना व्हॅक्सीन घातक नाहीत असे सांगण्यात आले आहे. सध्या कोवीशील्ड आणि कोवॅक्सीन याच लस प्रामुख्याने दिल्या जात आहेत. सरकार सर्वांनाच या लस लवकरात लवकर घेण्याचे आवाहन करत आहे.

मग लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूंचे काय?
राष्ट्रीय AEFI समिती गंभीर साइड इफेक्ट्स आणि मृत्यूंचा अभ्यास करत आहे. त्यानंतरच झालेल्या मृत्यूमध्ये लसचा किती दोष होता हे स्पष्ट होईल. पण, आतापर्यंतच्या 600 गंभीर प्रकरणांपैकी 236 (38.6%) प्रकरणांचीच पूर्ण माहिती मिळाली आहे. समितीने गंभीर साइड इफेक्टशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी संबंधित लोकांची मेडिकल हिस्ट्री, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ऑटोप्सी, हॉस्पिटल रिपोर्ट आणि इतर कागदपत्रांचा अभ्यास केला. यासाठी जिल्हा स्तरावर सुद्धा माहिती गोळा करण्यात आली ती अतिशय महत्वाची मानली जात आहे.

अभ्यास करताना अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागले. उदाहरणार्थ 8 गंभीर प्रकरणांपैकी AEFI च्या रिपोर्टमध्ये एका बिहारच्या व्यक्तीचा समावेश करण्यात आला. त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण दिलेल्या 5 कारणांपैकी नाही. कारण, त्या व्यक्तीच्या मृत्यूशी संबंधित माहिती खूप कमी होती. त्याच्यावर नेमके कोणते उपचार झाले याची सुद्धा माहिती उपलब्ध नाही.

बातम्या आणखी आहेत...