आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कोरोनाची लक्षणेही बदलली:तुम्ही कोरोनाची लस घेतली की नाही... आता 3 प्रकारच्या लोकांमध्ये दिसत आहेत 3 प्रकारची लक्षणे; लक्षणांचा क्रम बदलला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

कोरोना लसीकरणानुसार, सध्या जगात तीन कॅटेगरीतील लोक आहेत. प्रथम- ज्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले. दुसरे - ज्यांना फक्त एक डोस मिळाला आहे आणि तिसरे - ज्यांना अद्याप लस मिळाली नाही. एकीकडे या तीन श्रेणी आणि दुसरीकडे कोरोनाचे अनेक व्हेरिएंट, या दोन्ही प्रकारांमुळे तिन्ही कॅटेगरीतील लोकांना कोरोना झाल्यावर वेगवेगळ्या सामान्य लक्षणांचा अनुभव येत आहे.

नवीन व्हेरिएंटमुळे, कोरोनाची मुख्य लक्षणे बदलली आहेत. लसीकरण देखील या बदलांचे कारण बनले आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात लोकांना कोरडा खोकला आणि ताप ही मुख्य लक्षणे होती. नंतर पुढे पॉझिटिव्ह लोकांमध्ये तीव्र डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप यासारखी लक्षणे दिसली. काही दिवसांनंतर, चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे देखील कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये सामील झाले.

हे मोठे बदल लक्षात घेता यूकेच्या आरोग्य विज्ञान कंपनी ZOE ने किंग्ज कॉलेज लंडनच्या एका अॅपच्या माध्यमातून कोरोनाच्या नवीन लक्षणांवर ऑनलाइन अभ्यास सुरू केला. आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांच्या सहभागासह हा जगातील सर्वात मोठा ऑनलाइन अभ्यास आहे. चला तर मग जाणून घेऊयात, लसीकरणाच्या बाबतीत, जर आपल्या आजूबाजूच्या तीन कॅटेगरीतील लोकांना कोरोना झाला, तर त्यांच्यामध्ये कोणती सामान्य लक्षणे दिसतील...

1. लसीचा एकही डोस न घेतल्यास श्वास घेण्यास त्रास होणे हे आता 30 व्या क्रमांकावरील लक्षण बनले आहे

लस न घेतलेल्या लोकांमध्येसुद्धा कोरोनाची लक्षणे बदलली आहेत. डोकेदुखी, घसा खवखवणे, वाहणारे नाक, ताप आणि सतत खोकला ही या श्रेणीतील लोकांमध्ये कोरोनाची प्रथम 5 लक्षणे आहेत, परंतु वास घेण्याची क्षमता आता 9 व्या क्रमांकावर आले आहे आणि श्वसनाचा त्रास हे लक्षण 30 व्या क्रमांकावर आले आहे. पुर्वी वास घेण्याची क्षमता कमी होणे हे पहिल्या 5 मध्ये होते आणि श्वास घेण्यात अडचण पहिल्या 10 लक्षणांमध्ये होते.

2. ज्यांना लसीचा एक डोस मिळाला त्यांच्यामध्ये घसा खवखवण्याचे लक्षणे सौम्य झाले आहे

लसीचा एक डोस घेतल्यानंतरही, सतत खोकला येण्याचे लक्षण पाचव्या क्रमांकावर आहे. सतत नाक वाहणे आणि शिंका येणे अशी लक्षणे, जी आधी कोरोनाची प्राथमिक लक्षणे मानली जात नव्हती, लसीच्या एका डोसनंतर लोकांमध्ये दिसून आली आहेत.

3. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये खोकला आणि ताप येण्याची लक्षणे आता खालच्या क्रमांकावर गेली आहेत

अभ्यासानुसार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये डोकेदुखी, घसा खवखवणे, शिंका येणे, नाक वाहणे, वास कमी होणे ही टॉप 5 लक्षणे आहेत. सतत खोकल्याचे लक्षण 8 व्या क्रमांकावर आहे, ताप 12 व्या क्रमांकावर आहे आणि श्वसनाचा त्रास 29 व्या क्रमांकावर आहे. लसीकरण झालेल्या लोकांना सतत शिंका येत असतील तर तो कोरोना संसर्ग असू शकतो. म्हणून, लसीकरण केलेल्या लोकांना सतत शिंका येत असतील तर कोविड चाचणी केली पाहिजे.

लसीकरण केलेल्या लोकांना गंभीर लक्षणे नाहीत
ताज्या संशोधनातील आकडेवारी देखील याची पुष्टी करते की, या लोकांना सहसा सौम्य लक्षणे असतात. त्यामुळे लसीकरण केलेल्या लोकांना गंभीर संसर्गाचा धोका कमी असतो. लक्षणांमध्ये बदल डेल्टा प्रकारामुळे होऊ शकतो, जे यूकेमध्ये आतापर्यंत 99% संक्रमणास कारणीभूत आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाही संसर्ग होऊ शकतो
अहवालानुसार, ऑनलाईन अ‍ॅपवर ज्यांना लस दिली गेली होती आणि ज्यांचे लसीकरण झाले नव्हते, अशा लोकांमध्ये कोविड 19ची सारखी लक्षणे आढळली आहेत. पण, ज्यांनी लस घेतली होती, त्यांना कमी कालावधीत सौम्य लक्षणे दिसली. याचा अर्थ असा की आता लसीकरण केलेल्या लोकांना देखील कोरोना विषाणूची लागण होऊ शकते.

कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, चाचणी नक्की करुन घ्या
न्यूयॉर्कमधील बेल्यूव हॉस्पिटल सेंटरमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. सेलीन गाऊंडर सांगतात की, जर तुम्ही लस घेतली असेल कर तुम्ही सुरक्षित आहात. पण लस घेतलेल्या व्यक्तीला संसर्ग झाला तरी त्यांच्यावर विषाणू जास्त प्रभाव दाखवू शकणार नाही. पण लसीकरणे झालेले लोक व्हायरसचे कॅरिअर बनू शकतात. ते इतरांना संक्रमित करण्याचे मुख्य कारण असू शकतात. म्हणूनच, जर कुणालाही कोविडची सौम्य लक्षणे दिसली तरी त्यांनी तातडीने चाचणी करुन घ्यायला हवी.

बदलत्या लक्षणांमुळे तरुणाई अधिक प्रभावित
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोविडच्या बदललेल्या लक्षणांमुळे, विशेषत: तरुण लोकांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणूनच जरी आपणास गंभीर लक्षणे जाणवत नसली तरी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. मेंज विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या गुटेनबर्ग कोविड - 19 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोरोनामुळे संक्रमित झालेल्या 40% पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या कोविड संसर्गाची माहिती नव्हती.

बातम्या आणखी आहेत...