आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:देशात बनावट लसीकरणाला उत; जाणून घ्या कसा करता येईल बनावट लसीकरणापासून स्वतःचा बचाव, ख-या आणि बनावट लसीची कशी कराल ओळख

आबिद खानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कसा सुरु आहे बनावट लसीकरणाचा खेळ? यासह जाणून घ्या बरंच काही...

जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू आहे. 21 जूनपासून सरकारने नवीन लसीकरण धोरण राबविले आहे, तेव्हापासून लसीकरणाला वेग आला आहे. आतापर्यंत 32 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत, परंतु याबरोबरच बनावट लसीकरणालाही देशात उत आला आहे.

महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही बनावट लसीकरणाच्या घटना समोर आल्या आहेत. टीएमसीच्या खासदार मिमी चक्रवर्ती अशाच लसीकरण शिबिरात बनावट लस घेतल्याने आजारी पडल्या.

खरी आणि बनावट लस यातील फरक कसा ओळखता येईल? लसीकरण प्रमाणपत्र कसे तपासायचे? जगभरात लसीकरणाच्या नावाखाली कशाप्रकारे फसवणूक होत आहे? जाणून घेऊया... चला आपण समजू या ...

सर्वप्रथम जाणून घेऊयात की, आतापर्यंत देशात बनावट लसीकरणाच्या किती घटना समोर आल्या आहेत?
मुंबईत अशा प्रकारची पहिली मोठी घटना समोर आली होती. 30 मे रोजी मुंबईच्या कांदिवली भागात हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 390 लोकांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर कुणालाही लसीकरणानंतरची लक्षणे दिसली नाहीत तेव्हा ही फसवणूक असल्याचे उघडकीस आले.

लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाल्यावर लोकांचा संशय अधिकच बळावला. प्रमाणपत्रात ज्या रुग्णालयाची नावे नमूद होती, तेथे जेव्हा सोसायटीच्या लोकांनी चौकशी केली तेव्हा या रुग्णालयांच्या वतीने अशाप्रकारची कोणतीही शिबिरे आयोजित करण्यात आली नव्हती, असा खुलासा झाला.

पश्चिम बंगालमध्येही अशी घटना समोर आली होती. येथे एका व्यक्तीने आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून लसीकरण शिबिरांचे आयोजन केले होते. कसबा केंद्रात किमान 250 जणांना लस टोचण्यात आली आहे, असे पोलिसांच्या चौकशीदरम्यान समोर आले. आयएएस अधिकारी असल्याचे सांगणारा आरोपी देबांजन देब याने उत्तर व मध्य कोलकाता येथे बनावट लसीकरण शिबिरांचे आयोजन केले होते. यातील एक उत्तर कोलकाता येथील सिटी कॉलेजमध्ये आणि 3 जून रोजी सोनारपूर येथे एक शिबिराचे आयोजन केले होते. चौकशी दरम्यान देब याने पोलिसांना सांगितले की, त्याने लस बगडी मार्केट व स्वास्थ्य भवनाबाहेरून घेतली होती. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री खासदार मिमीचक्रवर्ती या बनावट लसीकरणाला बळी पडल्या होत्या. त्यांना आरोपी देबांजनने लसीकरण शिबिरात पाहुण्या म्हणून आमंत्रित केले होते. या शिबिरात त्यांनाही लस देण्यात आली होती. चौकशीदरम्यान लोकांना कोरोना लसीऐवजी अँटीबायोटिकचा डोस देण्यात आल्याचे समोर आले होते.

जगातील इतर देशांमध्ये बनावट लसीकरणाची प्रकरणे समोर आली आहेत का?
होय. अनेक देशांमध्ये बनावट लसीकरणापासून ते बनावट प्रमाणपत्रांचे प्रकार घडले आहेत. यूएसमध्ये लसीकरणानंतर एक कार्ड दिले जाते जे आपल्यास लस दिल्याचा पुरावा असतो. तेथे अशा बनावट लसीकरणाच्या कार्डची ईबे, शॉपिफाय आणि इतर ई-कॉमर्स साइटवर विक्री होऊ लागली आहे. एप्रिलमध्ये, मॅक्सिकोमध्ये 80 लोकांना बनावट फायझरची लस दिल्याची घटना उघडकीस आली होती. कुपीची पॅकिंग आणि बॅच क्रमांक पाहून हे उघड झाले. त्याचप्रमाणे पोलंडमध्ये फायझर लस सांगून लोकांना सुरकुत्या दूर करणारे औषध देण्यात आले होते.

कसा सुरु आहे बनावट लसीकरणाचा खेळ?
देशात बनावट लसीकरणाला उत आला आहे. मुंबईत जेथे लोकांना बनावट लस दिल्या गेल्या आहेत, तिथे एसपी इव्हेंट्स नावाच्या कंपनीशी संबंधित दोन व्यक्तींनी सोसायटीच्या सदस्यांशी संपर्क साधला आणि सोसायटीमध्येच लसीकरण शिबिर आयोजित करण्यास सांगितले. 30 मे रोजी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि त्यात 390 लोकांना लस दिली गेली. एका डोससाठी लोकांकडून 1260 रुपये घेण्यात आले. यावेळी कोणालाही लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही.

कोलकातामध्ये, तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री खासदार मिमी चक्रवर्ती देखील बनावट लसीकरणाला बळी पडल्या. कोलकाता येथे कसबा परिसरातील लसीकरण शिबिरात गेलेल्या मिमी यांना कोविशिल्डची बनावट लस देण्यात आली. एका व्यक्तीने स्वतःची आयएएस अधिकारी म्हणून ओळख करुन देत ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग लोकांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात लोकांना मोफत लस देण्यात आल्या. या व्यक्तीने मिमी चक्रवर्ती यांना मुख्य अतिथी म्हणून शिबिरासाठी आमंत्रित केले आणि त्यांनाही लसी दिली गेली.

टीएमसीच्या खासदार मिमी म्हणाल्या, “एका व्यक्तीने मला आयएएस अधिकारी सांगत तो ट्रान्सजेंडर्स आणि दिव्यांग व्यक्तींसाठी एक विशेष लसीकरण मोहीम चालवित असल्याचे सांगितले. या बरोबर त्या व्यक्तीने मला लसीकरण शिबिरात येण्याची विनंती केली. लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी मला कोविशिल्डची लस देखील देण्यात आली. पण कोविन अ‍ॅपवर मला लस घेतल्याचा मेसेज आला नव्हता. त्यानंतर मी कोलकाता पोलिसात तक्रार केली. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली.”

काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी भास्करने डॉ. पूनम चंदानी यांच्याशी बातचीत केली. डॉ. पूनम चंदानी सध्या भोपाळच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात कोरोना रूग्णांच्या सँपलींगचे काम बघत आहेत...

लस घेतल्यानंतर मेसेज व प्रमाणपत्र कधीपर्यंत येते?
लस घेतल्यानंतर 5 मिनिटांतच आपल्याला कन्फर्मेशन मेसेज येतो आणि एका तासाच्या आत प्रमाणपत्रही कोविन पोर्टलवर येते. म्हणजेच, जर कोणी तुम्हाला नंतर प्रमाणपत्र दिले जाईल, असे सांगत असेल तर तुम्ही त्यामागचे कारण जाणून घेऊ शकता.

मुंबईतील ज्या लसीकरण केंद्रात लोकांची फसवणूक झाली तेथे सर्व प्रमाणपत्रे नंतर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तर प्रत्यक्षात प्रमाणपत्र एका तासाच्या आतच येते.

लस नोंदणी दरम्यान कोणती खबरदारी घ्यावी?
लस नोंदणीच्या बहाण्याने फसवणुकीचीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. लोकांना लस नोंदणीसाठी मेसेज पाठवला गेला, ज्यात एक लिंक होती. या लिंकवर क्लिक करून, आपल्या फोनमध्ये आणखी एक अ‍ॅप डाउनलोड होते. या अ‍ॅपचा वापर आपली माहिती चोरण्यासाठी केला जात आहे.

येथे आम्ही तुम्हाला नोंदणी करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी सांगत आहोत.

  • केवळ कोविन अ‍ॅप किंवा पोर्टलद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करा. भारत सरकारने लसीकरणासाठी कोविनवर सर्व सुविधा दिल्या आहेत. इतर कोणतेही अ‍ॅप किंवा वेबसाइट उघडू नका किंवा आपली कोणतीही माहिती देऊ नका.
  • कोविन पोर्टलची लिंक -
  • कोविन अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठीची लिंक -
  • नोंदणीच्या वेळी आपला मोबाइल नंबर एंटर करा. जर आपल्याला कोविनशी संबंधित कोणतेही ओटीपी आल्यास ते कोणासोबतही शेअर करू नका.
  • नोंदणी केल्यानंतर जेव्हा आपण स्लॉट बुक कराल तेव्हा देखील आपल्याला ओटीपी मिळेल. हा ओटीपी लस घेण्यापूर्वी आरोग्य कर्मचार्‍यांना सांगावा लागेल.
  • आपण कोविन पोर्टलवर एका मोबाइल नंबरवरुन 4 लोकांची नोंदणी करू शकता. हे लक्षात ठेवा की आपल्या मोबाइलवरुन ओळखीच्या लोकांचीच नोंदणी करा.

लस प्रमाणपत्र कसे तपासायचे?

  • लसीकरणाच्या प्रमाणपत्रात एक क्यूआर कोड असतो, ते स्कॅन करून आपण प्रमाणपत्र खरे आहे की बनावट आहे ते तपासू शकता.
  • यासह, प्रमाणपत्रावर आपले नाव, वय, लसीकरणाची तारीख आणि वेळ, लसीकरण केंद्राचे नाव आणि ज्या आरोग्य कर्मचा-याने आपल्याला लस दिली त्याचे नाव अशी संपूर्ण माहिती असते. या माहितीमध्ये काही चूक किंवा त्रुटी असल्यास त्वरित तक्रार करा.

जर आपल्याला बनावट लस दिली गेली, तर त्याचा परिणाम काय होतो?
जर आपल्याला बनावट लस दिली गेली असेल, तर आपल्याला लसीकरणानंतरची कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत. जसे हात दुखणे, सौम्य ताप किंवा थकवा. साधारण ही लक्षणे लस घेतल्यानंतर 80% लोकांमध्ये दिसून येतात. मात्र, हे आपल्या प्रतिकारशक्ती आणि लसीच्या प्रकारावर देखील अवलंबून असते.

तर लस खरी किंवा बनावट आहे हे जाणून घेण्याचा एक निश्चित मार्ग काय आहे?
लसीकरणासाठी फक्त सरकारी लसीकरण केंद्रावरच जा. जर आपण एखाद्या खासगी केंद्रात जात असाल तर प्रथम ते अधिकृत आहे की नाही ते शोधा. कोविन पोर्टलवर खासगी लस केंद्रे देखील आहेत. आपण कोविन पोर्टल किंवा अ‍ॅपमधूनच खासगी केंद्रांवर स्लॉट बुक करू शकता.

लस घेतल्यानंतर महिनाभरात अँटीबॉडीची तपासणीदेखील करता येते. या चाचणीद्वारे आपल्या शरीरातील अँटीबॉडीज आढळतात. जर आपल्याला योग्य लस मिळाली असेल तर आपल्या शरीरात अँटीबॉडीज नक्कीच तयार होतील.

सामान्य व्यक्ती बॅच नंबरद्वारे कुपी ट्रेस करू शकतो का?
नाही. आपण त्या कुपीच्या बॅच क्रमांकावरून ते ट्रेस करु शकत नाही. काही गडबड होण्याची शक्यता असल्यास केवळ सरकारी कर्मचारी लस कंपनीकडून बॅच क्रमांकाची माहिती घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...