आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coveshield Booster Dose; UK Latest Study On Antibody Levels After AstraZeneca Vaccine And Pfizer Other Doses

एक्सप्लेनर:कोरोना लस घेतल्याच्या 10 आठवड्यांतच निम्म्याने कमी होतात अँटीबॉडी, संशोधनातील निष्कर्ष! अर्थातच बूस्टर डोस ठरू शकतो गरजेचा

रवींद्र भजनी3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या सविस्तर..

युनायटेड किंगडम (यूके) मध्ये झालेल्या नवीन अभ्यासाचे निकाल समोर आले आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इन्फॉर्मेटिक्सच्या शास्त्रज्ञांना असे आढळले की, 10 आठवड्यांनंतर लसीमुळे कोविड -19 च्या विरूद्ध तयार झालेल्या अँटीबॉडीज कमी होण्यास सुरुवात झाली. यामुळे बरेच प्रश्न उपस्थित होतात. कोविड -19 पासून लस किती काळ संरक्षण देईल? असे सर्वच लसींच्या बाबतीत होत आहे का? या अभ्यासाच्या निकालानंतर आता खरोखरच बूस्टर डोस घेण्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…

यूके मधील नवीन अभ्यास काय सांगतो?

 • युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या व्हायरस वॉचच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, फायझर आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या लसींपासून तयार झालेल्या अँटीबॉडी सहाआठवड्यांनंतर कमी होऊ लागतात. 10 आठवड्यांनंतर त्या केवळ 50% राहतात.
 • यूसीएलच्या टीमने 50-70 वर्षे वयोगटातील लसीकरण झालेल्या 605 लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण केले आहे. त्यांना आढळले की सर्व व्यक्तींमध्ये अँटीबॉडीची पातळी वेगळी असते. परंतु फायझरच्या लसीने एस्ट्राजेनेकाच्या लसीपेक्षा जास्त अँटीबॉडी तयार केल्या.
 • फायझरच्या लसीच्या दुस-या डोसच्या सहा आठवड्यांनंतर अँटीबॉडीची पातळी प्रती मिली 7500 युनिट्स होते, परंतु 10 आठवड्यांनंतर त्यात घट होऊन ते 3320 वर आले. त्याच वेळी, एस्ट्राजेनेका लसीमुळे अँटीबॉडीची पातळी 10 आठवड्यांत प्रति मिली 1,200 युनिट्सवरून प्रति मिली 190 युनिट्सवर गेली. द लँसेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात संशोधकांनी दावा केला की, त्यांना साडेचार हजार सहभागींवर केलेल्या अभ्यासात हा कल दिसला आहे.

कोविड -19 विरुद्ध लढ्यात अँटीबॉडीजची पातळी कमी होण्याचे काय महत्त्व आहे?

 • शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लसीकरणाच्या काही आठवड्यांनंतर अँटीबॉडीच्या पातळीत घट होत असल्याने चिंता करण्याची गरज नाही. परंतु संशोधकांचे म्हणणे आहे की, कुठेतरी हे लसीची प्रभावीता कमी करू शकते. याचा अर्थ असा नाही की, लोक यामुळे ब्रेकथ्रू इन्फेक्सनला बळी पडत आहेत. ब्रेकथ्रू इन्फेक्शन म्हणजे लसीकरणानंतरही कोविड - 19 चा संसर्ग होणे.
 • कोविड -19 पासून संरक्षणासाठी अँटीबॉडीची पातळी महत्त्वपूर्ण आहे, परंतु रोगप्रतिकारक यंत्रणेत संक्रमणाशी लढा देण्यासाठी इतर शस्त्रे आहेत. मेमरी बी सेल्स विषाणूला लक्षात ठेवतात आणि जेव्हा एखादा संसर्ग होतो तेव्हा ते ताबडतोब अँटीबॉडी बनविण्यास सुरुवात करतात. टी किलर सेल्स संक्रमित पेशींना लक्ष्य करतात आणि त्यांना ठार करतात.
 • भारतातील साथीच्या रोगांशी संबंधित विषयांचे तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया सांगतात की, केवळ अँटीबॉडीच्या पातळीचा संरक्षण म्हणून विचार करणे योग्य ठरणार नाही. आपल्याला बर्‍याच पातळ्यांवर संरक्षण मिळते आणि ते किती काळ उपलब्ध असेल, याबद्दल अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.

तर बूस्टर डोसची आवश्यकता पडू शकते का?

 • होय. फायझर आणि अ‍ॅस्ट्राजेनेका लसींच्या परिणामकारकतेचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. ते म्हणतात की, अभ्यासावरुन ज्यांचे अगदी सुरुवातीला लसीकरण करण्यात आले आणि ज्यांना एस्ट्राजेनेकाची लस देण्यात आली, त्यांना काही महिन्यांनंतर बूस्टर डोस द्यावा लागेल.
 • युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील प्रोफेसर रॉब अ‍ॅलड्रिज म्हणाले की, सुरुवातीला अँटीबॉडी जास्त असतात आणि काही काळानंतर त्या कमी होऊ लागतात, हे आपल्याला माहित आहे. काळजी या गोष्टीची आहे की, जर या दराने अँटीबॉडीची पातळी कमी होत राहिली तर लसीचे संरक्षण देखील कमी होऊ लागेल. आता मोठा प्रश्न असा आहे की हे कधीहोईल?
 • अ‍ॅलड्रिज म्हणतात की, अँटीबॉडीज हाच जोखीम मोजण्यासाठीचा योग्य मार्ग नाही. जेव्हा संसर्ग किंवा रुग्णालयात जाण्याचा धोका कमी होईल, त्याचा मॅचिक नंबर काय आहे, हेकुणालाही ठाऊक नाही. हा मॅजिक नंबर शोधणे आवश्यक आहे.

बूस्टर डोससंदर्भात वेगवेगळ्या देशांमध्ये काय होत आहे?

 • फायझरने ब्रेकथ्रू इन्फेक्शन समोर आल्यानंतर बूस्टर म्हणजेच तिसरा डोस आवश्यक असल्याचे सांगितले होते. यानंतर, इस्त्राइलसह बर्‍याच देशांनी हाय रिस्क गटासाठी अर्थात गंभीर आजार असलेल्या लोकांना बुस्टर डोस देण्यास सुरवात केली आहे.
 • बूस्टर डोसच्या आवश्यकतेमागील तर्क डेल्टा व्हेरिएंट आहे. सध्या हा व्हेरिएंट 125 पेक्षा जास्त देशांमध्ये सक्रिय आहे. भारतात, नवीन प्रकरणांपैकी 86% प्रकरणे डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. ब्रेकथ्रू संक्रमण येथे दिसून आले आहे. ज्यावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) देखील अभ्यास केला आहे.
 • अमेरिकेनेदेखील लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता असू शकते, असे म्हटले आहे. परंतु या संदर्भात अधिक संशोधन केले जात आहे. लसीच्या मिक्स अँड मॅच स्ट्रॅटेजीवरही विचार केला जात आहे. संशोधनाच्या निकालानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.
 • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, लसीचा बूस्टर डोस किती महत्त्वाचा आहे याबद्दल शास्त्रीय पुष्टी झालेली नाही. या संघटनेने असेही म्हटले आहे की,विकसित देशांना लसीचा बूस्टर डोस देण्याऐवजी ज्या देशांमध्ये लसीची कमतरता आहे अशा देशांना लस देण्यात यावी.
 • जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. त्यानंतर, संशोधनाच्या निकालांच्या आधारे, आवश्यकतेनुसार लसीच्या बूस्टर डोसवर निर्णय घेण्यात येईल.

लस वेगवेगळ्या व्हेरिएंटरवर प्रभावी नाही का?

 • लस सर्व व्हेरिएंटविरूद्ध अँटीबॉडी बनवत आहे. यूकेमध्ये फायझर आणि मॉडर्ना लसींच्या परिणामकारकतेवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, फायझर या लसीचे दोन्ही डोस डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलायझेशनपासून वाचवण्यात 96% प्रभावी आहे.
 • भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या फेज -3 चाचणी डेटामध्ये डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध लसीची परिणामकारकता 65% नोंदविली आहे. डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध रशियन लस स्पुतनिक व्ही90% प्रभावी आहे. तर, मुळ विषाणूवर स्पुतनिक 92% प्रभावी आहे.
 • डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध चीनी लस सिनोव्हॅकची परिणामकारकता कमी झाली आहे. यानंतर थायलंडने जाहीर केले आहे की, चीनी लस घेणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना एस्ट्राजेनेकाचा तिसरा डोस दिला जाईल.
 • आखाती देशांनीदेखील त्यांच्या नागरिकांना चिनी लस दिली होती आणि जर तेथे केसेसचे प्रमाण वाढले तर फायझरचा तिसरा डोस बूस्टर डोस म्हणून वापरला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...