आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Covid Swadhyayamala Started By Vasantpur Of Akkalkot; Useful To 325 Teachers In The State With 20,000 Students

दिव्य मराठी विशेष:अक्कलकोटच्या वसंतपुरेंनी सुरू केली कोविड स्वाध्यायमाला; 20 हजार विद्यार्थ्यांसह राज्यातील 325 शिक्षकांना उपयुक्त

रमेश पवार | सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालभारती, गणित विषयांचा अभ्यास; विद्यार्थ्यांना देतात दररोज एक छापील पान

ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या इंटरनेट-मोबाइलच्या अडचणींवर अक्कलकोटच्या विजय वसंतपुरेंनी सुरू केलेली कोविड स्वाध्यायमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही लोकप्रिय होते आहे. जिल्हा परिषद शिक्षक असलेले वसंतपुरे यांनी शोधलेल्या या पर्यायाचा लाभ राज्यातील २० हजार विद्यार्थी आणि ३२५ शिक्षकांना होत आहे. जिथे मोबाइल, इंटरनेट पोहोचत नाही तिथेही या कोविड स्वाध्यायमाला खात्रीशीर पोहोचत आहेत.

कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत, पण शिक्षण सुरू झालेय. अशा वेळी विद्यार्थ्यांना हे सुकर व्हावे या उद्देशाने वसंतपुरे यांनी ही स्वाध्यायमाला तयार केली. ते अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी (बु.) जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ही मालिका सुरू केली. वार्षिक नियोजनाचा अभ्यास करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दररोजसाठी एक छापील पान अशी याची आखणी केली. अतिशय सुलभ असा बालभारती आणि गणित या दोन विषयांचा अभ्यास यात देण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकाचे वाचन करून विद्यार्थी हे स्वाध्याय सहजपणे सोडवू शकतात. अभ्यासमाला तयार करताना पारंपरिक सराव पद्धत व आधुनिक ज्ञानरचनावाद यांचा मेळ साधण्यात आला आहे.

रोजचा अभ्यास आणि आठवड्यातील तपासणी

आधी सोलापूरचे सर फाउंडेशन आणि शाळेचे मुख्याध्यापक अभिजित सुर्डीकर यांच्या सहयोगातून आम्ही १२५ विद्यार्थ्यांना ही स्वाध्यायमाला छापील स्वरूपात मोफत दिली. आठ दिवसांनंतर तो स्वाध्याय शिक्षक तपासून पुन्हा विद्यार्थ्यांच्या सुपूर्द करतात. यामुळे नियमित शाळा सुरु होईपर्यंत या स्वाध्यायमाला आम्ही विद्यार्थ्यांना मोफत देणार आहोत. - विजयकुमार वसंतपुरे, जि. प. शिक्षक

सोलापूरहून सुरुवात, राज्यभर प्रसार

सुरुवातीला येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी ही स्वाध्यायमाला आता राज्यातील १५ जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते आहे. काही शाळांनी प्रत्यक्ष प्रिंट देऊन तर काही शाळा व्हाॅट्सअॅप ग्रुपवर स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.