आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस व्हॅक्सिनमुळे होत आहेत रक्ताच्या गाठी, जूनपर्यंत टळू शकते भारतातील अप्रूव्हल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामधील व्हॅक्सिन डोसची कमतरता दूर करण्यासाठी विदेशी व्हॅक्सिनला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे परंतु याचा लाभ जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस व्हॅक्सिनला कदाचित मिळणार नाही. मे महिन्यात भारतात ही व्हॅक्सिन येईल अशी आशा होती. परंतु शरीरात रक्ताच्या गुठळ्या (Blood clots) होत असल्यामुळे अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत या व्हॅक्सिनवर बंदी घालण्यात आली आहे. युरोपमध्येही या व्हॅक्सिनचा वापर टाळण्यात आला आहे. इतर देशातही या व्हॅक्सिनवर परीक्षण सुरु आहे. यामुळे आता भारतातसुद्धा ही व्हॅक्सिन येईल की नाही यावर शंका आहे. जूनपर्यंत ही व्हॅक्सिन भारतात आता येऊ शकणार नाही.

येथे जाणून घ्या, काय झाले होत या व्हॅक्सिनसोबत, ज्यामुळे अमेरिका आणि दक्षिण कोरियात याचा वापर थांबवण्यात आला...
अमेरिकेने केव्हा आणि का थांबवला या व्हॅक्सिनचा वापर

अमेरिकेने 13 एप्रिलला जॉन्सन आणि जॉन्सन व्हॅक्सिनचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत अमेरिकेत सध्या 68 लाख लोकांना हा डोस देण्यात आला होता. 6 लोकांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या तक्रारी समोर आल्या, यातील एकाच मृत्यूही झाला. या रक्तातील गुठळ्यांची तपासणी होईपर्यंत व्हॅक्सिन न वापरण्याचा अमेरिकेने निर्णय घेतला. यापूर्वी ब्रिटिश फर्म ॲस्ट्राझेनेका व्हॅक्सिनच्या डोसमुळे असामान्य गुठळ्या दिसून आल्यानंतर युरोपच्या काही देशांमध्ये याचा वापर थांबवण्यात आला होता.

युरोपीय अधिकाऱ्यांनुसार ॲस्ट्राझेनेकाच्या व्हॅक्सिनमुळेही अशाप्रकारच्या रक्ताच्या गुठळ्या होण्याचे रिपोर्ट समोर आले होते. या व्हॅक्सिनला आतापर्यंत अमेरिकेत अप्रूव्हल मिळालेले नाही. काही देशांमध्ये हे व्हॅक्सिन काही ठराविक वयोमर्यादेपर्यंतच देण्याची परवानगी दिली आहे.

हे ब्लड क्लॉट कशाप्रकारे वेगळे आहेत?
1.
हे शरीराच्या असामान्य भागात तयार होत आहेत, उदा. मेंदूमध्ये रक्त पोहोचवणाऱ्या नसांमध्ये.

2. ज्या लोकांच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी असेल त्यांच्या शरीरात हे ब्लड क्लास तयार होत आहेत.प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर ब्लड क्लॉट होत नाहीत परंतु सध्या क्लॉट निर्माण होत असल्यामुळे हे थोडे विचित्र वाटत आहे.

अमेरिकेचे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (US-FDA)चे व्हॅक्सिन चीफ जॉय पीटर मार्क्स यांच्यानुसार नॉर्वे आणि जर्मनीच्या वैज्ञानिकांनी शक्यता वर्तवली होती की, ॲस्ट्राझेनेका व्हॅक्सिनमुळे होणाऱ्या इम्यून रिस्पॉन्समुळे कदाचित रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. म्हणजेच या व्हॅक्सिनमुळे शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडी प्लेटलेट्सवर हल्ला करत आहेत. या एका थेअरीवर आता अमेरिका जॉन्सन अँड जॉन्सन व्हॅक्सिनवर काम करत आहे.

इम्यून रिस्पॉन्सवर संशय का आहे?
हॅपरीन नावाच्या एका ब्लड थिनर (रक्त पातळ करणारा)नेही याच प्रकारचे साईडइफेक्ट्स होतात. काही प्रकरणात हॅपरीन दिलेल्यांमध्ये अँटीबॉडी तयार होतात आणि ज्या प्लेटलेट्सवर हल्ला करतात आणि तयारही करतात. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचे क्लॉट एक्स्पर्ट डॉ. जेफरी बार्न्स यांच्यानुसार हॅपरीन ब्लीडींग आणि क्लॉटिंग दोन्ही प्रकारे प्रभाव दाखवते. अमेरिकेत जवळपास प्रत्येक हॉस्पिटलमध्ये याचा वापर होतो आणि याच्या साईडइफेक्ट्सचा अभ्यास करून त्यावर उपचार केले जातात.

अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यानुसार जॉन्सन अँड जॉन्सनच्या व्हॅक्सिनचा वापर थांबवण्यामागचे एक कारण हेसुद्धा आहे की डॉक्टरांना या विचित्र परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने मंगळवारी क्लॉट कसे ओळखावेत आणि त्यावर कशाप्रकारे उपचार करावा हे सांगितले आहे.

आतापर्यंत यासंदर्भात झालेला रिसर्च काय सांगतो ?
मागील आठवड्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये छापून आलेल्या दोन स्टडीमध्ये नॉर्वे आणि जर्मनीच्या रिसर्च टीमला ॲस्ट्राझेनेकाची व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांच्या शरीरातील प्लेटलेट्सवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडी दिसून आल्या आहेत. या अँटीबॉडीस हॅपरीनचे साईडइफेक्ट असलेल्या रुग्णांमध्येही आढळून आल्या आहेत.

भारतासाठी चिंतेची बाब काय आहे ?
ॲस्ट्राझेनेकाची व्हॅक्सिन भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत आहे आणि कोविशील्ड नावाने ही व्हॅक्सिन दिली जात आहे. आतापर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की, जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस व्हॅक्सिनसोबत याची काय लिंक आहे. परंतु या दोन्ही व्हॅक्सिन एकाच प्लॅटफॉर्मवर तयार झाल्या आहेत, म्हणजेच व्हायरल-व्हेक्टर प्लॅटफॉर्मवर.

रशियाची कोविड -19 व्हॅक्सिन स्पुतनिक V आणि एक चिनी व्हॅक्सिनसुद्धा याच टेक्नॉलॉजीवर तयार झाली आहे. ही व्हॅक्सिन शरीराच्या इम्यून सिस्टीमला कोरोना व्हायरसचे स्पाइक प्रोटीन ओळखण्यासाठी तयार करते. असे करण्यासाठी व्हॅक्सिनमध्ये सर्दीच्या व्हायरस-एडेनोव्हायरसचा वापर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...