आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोजची कोरोना प्रकरणे जवळपास 40 हजारांवर आली आहेत. जूनपासून लसीकरणाची गती देखील वाढली आहे, परंतु अद्याप बरेच लोक असे आहेत जे कोरोनाची दुसरी लाट ओसरताच लसीकरण टाळत आहेत. तर बरेच असेही लोक आहेत जे लसीचा एक डोस घेतल्यानंतर निष्काळजीपणे वागत आहेत.
काही लोक म्हणतात की, मला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मी लसीचा एक डोस घेतला. आता मला दुसर्या डोसची गरज नाही. हे किती प्रमाणात योग्य आहे?
दुसरा डोस का आवश्यक आहे? दोन्ही डोस घेतल्यानंतर आपल्याला कोरोनापासून किती काळ संरक्षण मिळेल? यूकेप्रमाणे भारतालादेखील कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करायला हवे का? दोन डोस नंतर तिसरा डोस आवश्यक असेल का? या सर्व प्रश्नांवर आम्ही महामारी रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्याशी बातचीत केली. त्यांच्याकडून जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरे....
लसीचा दुसरा डोस का आवश्यक आहे?
दुसर्या लाटेत आपण सर्वांनी कोरोनाची भीषणता पाहिली. महामारी किती प्राणघातक असू शकते याचा अंदाज बांधणे कठीण आहे, हे यावरुन सिद्ध झाले आहे. परंतु यासोबतच तिस-या लाटेचा सामना कसा करता येईल, याचा मार्ग देखील दाखवला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. त्यातही लसीचा दुसरा डोस सर्वात महत्वाचा आहे. जोपर्यंत आपण दोन्ही डोस घेत नाही, तोपर्यंत संसर्गाची जोखीम आहेच.
जर आपण भारताबद्दल बोललो तर देशातील कोरोनाच्या तिन्ही लसी या डबल डोस व्हॅक्सिन आहेत. अशा परिस्थितीत, जर आपण लसीचा एक डोस घेतला असेल तर नक्कीच दुसरा डोस घ्या. कोविशिल्डचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 12 आठवड्यांनी दिला जाईल. जर आपण कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल, तर त्याचा दुसरा डोस 4 ते 6 आठवड्यांच्या दरम्यान घेता येतो.
मला कोरोना झाला आहे, लसीचा पहिला डोसही घेतला आहे, तरीही मला दुस-या डोसची गरज आहे का?
डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर आपल्या शरीरात बनवलेल्या अँटीबॉडीज किती काळ राहतील याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून घ्यावे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण एका डोसपासून पूर्णपणे सुरक्षित असाल. आतापर्यंतच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध बहुतांश लसीचा एक डोस 30 ते 35% प्रभावी आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर हा प्रभाव 80 ते 90% पर्यंत वाढतो. अशा परिस्थितीत, दोन्ही डोस घेतल्याने आपण अधिक सुरक्षित असाल.
संसर्ग झालेल्या लोकांसाठी एक डोस पुरेसा आहे, परंतु हे वेगवेगळ्या लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर देखील अवलंबून असते. उदाहरणार्थ, ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळतात ते देखील 80% पर्यंत संरक्षित आहेत. म्हणजेच त्यांना 20% संसर्ग होण्याचा धोका देखील आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची हमी कुणीही देऊ शकत नाही. आणि जर नवीन व्हेरिएंटमुळे कोरोना झाला तर त्याबद्दलही कोणीही काहीही सांगू शकत नाही.
दुसर्या डोसानंतर मी पूर्णपणे सुरक्षित राहू शकेल का?
तुम्हाला कोरोना संसर्ग होऊन गेला आहे आणि तुम्हाला लसीचे दोन्ही डोसही मिळाले आहेत. त्यानंतरही, प्रत्येकाने कोविड प्रोटोकॉलचे पालन करायलाच हवे. कारण संपूर्ण लसीकरणानंतरही लस घेतीलेली व्यक्ती सुरक्षित राहते, परंतु ती व्यक्ती लस न घेतलेल्या लोकांप्रमाणेच संसर्ग पसरवू शकते. म्हणूनच, समाजासाठी जबाबदार व्यक्ती राहून, दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्क घालणे, सॅनिटाययर्स इत्यादींचा वापर थांबवू नका.
दोन्ही डोसानंतर मला कोरोनापासून किती काळ संरक्षण मिळू शकते?
सध्या असे मानले जाते की, दोन्ही डोस घेतल्यानंतर 80% लोक 6 ते 11 महिन्यांपर्यंत संरक्षित असतात. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर जरी कोरोनाची लागण झाली तरीही एकतर लक्षणे नसतात किंवा अगदी सौम्य लक्षणे असतात. लसीचा एक डोस आपल्याला संसर्गापासून वाचवतो, परंतु त्याची कार्यक्षमता कमी असते. जेव्हा दोन्ही डोस घेतले असतात तेव्हा ही लस अधिक प्रभावी होते.
यूकेच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना संरक्षण मिळाले होते, तर दुसरीतडे ज्यांना लसीचा एकच डोस मिळाला त्यांना डेल्टा व्हेरियंटपासून कमी संरक्षण मिळाले आहे. अमेरिकेत, सीडीसीने देखील संपूर्ण लसीकरण केलेल्या लोकांना पब्लिक गॅदरिंग आणि मास्क मुक्त राहण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच जितक्या लवकर आपण व्हॅक्सिनेटेड होऊ तितक्याच लवकर आपल्या देशातही अशी परिस्थिती तयार होऊ शकते.
फ्लूच्या लसीप्रमाणे ठराविक अंतराने कोरोनाची लस घ्यावी लागेल का? हे कधीपर्यंत आणि किती काळ करावे लागेल?
सध्या याबद्दल काहीही सांगणे कठीण आहे. काही नवीन पुरावे येत आहेत. विशेषत: mRNA आधारित लसींमध्ये... यात प्रतिकारशक्ती जास्त काळ टिकू शकते हे समोर आले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जे क्लिनिकल चाचण्यांमध्ये सहभागी होते. त्यांच्यात अजूनही अँटीबॉडीज कायम आहेत. अशा परिस्थितीत बूस्टर डोस दोन वर्षांतून एकदा किंवा एका वर्षातून एकदा द्यावा लागू शकतो. परंतु सध्या याबद्दल काहीही सांगणे कठीण आहे.
या प्रकारच्या व्हायरसमध्ये बदल होत असतात. अशा व्हायरस विरूद्ध बूस्टर डोस आवश्यक आहे. नवीन व्हेरिएंटविरुद्ध न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडीची आवश्यकता जास्त आहे. अशात देखील बूस्टर डोस आवश्यक असेल. मात्र, लसीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे दिसून येत नाही.
तिसरी लाट लवकर येऊ नये यासाठी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करणे हे एक चांगले पाऊल नाही का?
ब्रिटनने मे मध्ये कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यास सुरुवात केली, तोपर्यंत त्यांच्या लोकसंख्येच्या 50% पेक्षा जास्त लोकांना एक डोस मिळाला होता. यातही हे 50 वर्षांवरील लोकांसाठी केले गेले. अधिक लोकसंख्या असलेल्या देशांसाठी सिंगल डोस कव्हरेज झाल्यानंतर असे करता येऊ शकते..
भारताची सध्याची रणनीती अगदी बरोबर आहे. जोपर्यंत जास्तीत जास्त लोकसंख्येचे एक डोस कव्हरेज होत नाही तोपर्यंत असे करु नये. तशीही एका डोसचा प्रभाव देखील 71% आहे. म्हणजेच, अशा परिस्थितीत लोकांना गंभीर लक्षणांपासून संरक्षण मिळू शकेल. जेव्हा डोसची व्याप्ती वाढेल तेव्हा नक्कीच दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
इस्त्रायलमध्ये लसीचा तिसरा डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे, त्याचे काय?
कोरोना लसीचा तिसरा डोस देणारा इस्रायल पहिला देश आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. येथील रुग्णालयांमध्ये कोरोनाचे 81 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 58% लोकांना कोरोनावर लस देण्यात आली आहे.
तिसरा डोस कोणाला आणि कधी दिला जाऊ शकतो?
फायझर-बायोनएनटेक या लस कंपनीचा दावा आहे की, लसीचा तिसरा डोस डेल्टा व्हेरियंटविरूद्ध अधिक प्रभावी होईल. मात्र, तिसरा डोस केवळ कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाच दिला जाईल. विशेषतः ते लोक जे हृदय, फुफ्फुस किंवा कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त आहेत.
फायझरच्या मते, तिसरा डोस दुसर्या डोसच्या सहा महिन्यांनंतर दिला जाऊ शकतो. हा डोस दुसर्या डोसनंतर सहा ते 12 महिन्यांच्या आत द्यावा.
तज्ज्ञ देखील कंपनीच्या दाव्यांशी सहमत आहेत का?
अमेरिकेच्या आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तिस-या डोसबद्दल फायझरचा दावा हा संधीसाधू आणि बेजबाबदार आहे. तिसर्या डोसची उपयुक्तता इतक्या लवकर सिद्ध होऊ शकत नाही. यासाठी कित्येक महिन्यांच्या डेटा स्टडीची आवश्यकता असेल.
तज्ज्ञ म्हणतात की, तिसरा डोस घेणे आवश्यक नाही. विशेष म्हणजे अशा परिस्थिती जेव्हा जगातील ब-याच देशांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच लसींचा पुरवठादेखील मर्यादित आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.