आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Covishield Covaxin Vaccine Mixing Results Explained; Effectiveness Against Variants And Antibody Immunity Level

एक्सप्लेनर:सरकारने कोव्हॅक्सिन-कोविशिल्डच्या मिश्र चाचणीला दिली मंजुरी; जाणून घ्या रोगप्रतिकारक शत्ती वाढवण्यासह व्हेरिएंटविरुद्ध लढण्यासाठी किती प्रभावी आहे लसींचे मिश्रण

रविंद्र भजनी4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या सविस्तर..

भारताच्या औषधी महानियंत्रकांनी (डीसीजीआय) कोरोना विषाणूच्या विरोधात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रमुख लसींच्या मिश्रणाच्या अभ्यासाला मंजुरी दिली आहे. हा अभ्यास वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजद्वारे केला जाईल. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) 29 जुलैला वैद्यकीय चाचणीची शिफारस केली होती. या चाचणीत 300 निरोगी व्यक्तींना सहभागी करून घेतले जाईल. लसीकरण पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसी दिल्या जाऊ शकतात का, याचा अभ्यास यात केला जाईल.

गेल्याच आठवड्यात, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने कोविड -19 लसीच्या मिश्र चाचणीच्या अभ्यासाचे निकाल जाहीर केले होते. या अभ्यासात 98 जणांचा समावेश करण्यात आला होता. कोव्हिशिल्डचा पहिला डोस आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिल्यास काय होईल? कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनच्या च्या दोन्ही डोसच्या तुलनेत लसीच्या मिश्रणाचे परिणाम किती वेगळे आहेत? या प्रश्नांची उत्तरे या अभ्यासाद्वारे देण्यात आली आहेत.

ICMR चा अभ्यास हेल्थ सायन्सेसचा MedRxiv या प्रि-प्रिंट सर्व्हरवर प्रकाशित झाला आहे. त्याचे परिणाम सांगतात की, कोविड -19 लसीचे मिश्रण केवळ रोग प्रतिकारशक्ती आणि अँटीबॉडीज वाढवत नाही तर व्हेरिएंटविरूद्धच्या लढ्यात अधिक प्रभावी आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले असतील, तर त्याच्या तुलनेत दोन्ही लसींचा एक-एक डोस तुम्हाला कोविड -19 पासून जास्त संरक्षण देतो.

कोविड -19 लसीचे मिश्रण काय आहे ते जाणून घेऊया? ICMR ने हा अभ्यास कसा केला आणि त्याचे परिणाम कसे आले? याचा पुढे लसीकरण कार्यक्रमावर कसा परिणाम होऊ शकतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

कोविड -19 लसीचे मिश्रण म्हणजे काय?
ही अनेक दशकांपासून सुरु असलेली स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. इबोला, रोटा सारख्या व्हायरसवर लसींचे मिक्सअप करण्यात आले होते. पण अधिक कॉम्बिनेशन समान तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या लसींचे
होते. कोविड -19 लस कमीतकमी 6 वेगवेगळ्या तंत्रज्ञानापासून बनवली गेली आहे, जसे की इनअॅक्टिव्हेटेड, व्हायरस वेक्टर, mRNA, DNA इत्यादी.

कोविड -19 लसींच्या मिश्रणावर चाचण्या गेल्या वर्षीच सुरू झाल्या. प्रभाव वाढवण्यासाठी, ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी फाइझरच्या लसीचे एस्ट्राजेनेकाच्या लसीमध्ये मिश्रण करण्यावर अभ्यास केला. त्याचे परिणाम चांगले होते. तेव्हापासून, अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या कॉम्बिनेशनवर अभ्यास करण्यात आले किंवा चालू आहेत.

लसींच्या मिश्रणाची चार उद्दिष्टे आहेत-

 1. पुरवठ्यातील कमतरता हाताळणे: भारतात, सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, दोन्ही डोस एकाच लसीचे घ्यावे लागतील. जर पुरवठ्याची कमतरता असेल आणि दुसऱ्या डोससाठी लस उपलब्ध नसेल तर दुसरी लस दिली जाऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर लसींचे मिश्रण देऊ शकते.
 2. विविध व्हेरिएंटवर परिणाम: कोविड -19 चा डेल्टा व्हेरिएंट भारतासह 140 हून अधिक देशांसाठी डोकेदुखी ठरल आहे. डेल्टा आणि इतर व्हेरिएंटवर लसीचा प्रभाव मूळ व्हायरसपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत, लसीचा प्रभाव वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे लसीचे मिश्रण.
 3. रोगप्रतिकार शक्ती वाढवणे: सध्या उपलब्ध असलेल्या लसींची प्रभावीता 50% ते 95% आहे. त्यांच्या चाचण्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत, लसींचे मिश्रण रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक पर्याय म्हणून उदयास आले आहे.
 4. अँटीबॉडीची पातळी वाढवणे: भारतासह अनेक देशांमधील अभ्यास दर्शवतात की, कोविड -19 लस व्हायरसपासून अल्टिमेट प्रोटेक्शन देत नाही. लसीकरणानंतरही संसर्ग होऊ शकतो. या कारणास्तव, वेगवेगळ्या लसींचे कॉम्बिनेशनमुळे अँटीबॉडीची पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मध्य पूर्वच्या अनेक देशांमध्ये चिनी लसीचे दोन्ही डोस दिल्यानंतर फायझरची लस बूस्टर डोस म्हणून वापरली जात आहे.

भारतात लसीच्या मिश्र चाचणीवर अभ्यास का केला गेला?

 • खरं तर, हा अभ्यास एका चुकीने सुरू झाला होता. कोविड -19 लसीकरणादरम्यान, मे महिन्यात उत्तर प्रदेशात एक गोंधळ उडाला होता. 20 लोकांना पहिला डोस कोविशिल्डचा देण्यात आला होता. दुसरा डोस कोव्हॅक्शनचा दिला गेला होता. या चुकीवर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) लसीच्या मिश्र चाचणीचा अभ्यास केला. वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये असाच अभ्यास सुरू आहे.
 • आयसीएमआरने मिश्र लसी घेतलेल्या लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले. 20 पैकी फक्त 18 लोकांनी अभ्यासात भाग घेतला. त्यांना पहिला डोस कोविशिल्डचा तर दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा दिला गेला होता. या अभ्यासात, कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचे दोन-दोन डोस घेणा-या 40-40 लोकांचे दोन स्वतंत्र गट बनवण्यात आले होतेय अशाप्रकारे, हा अभ्यास 98 लोकांवर करण्यात आला.
 • जगभरात एडिनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्मसह इनअॅक्टिव्हेटेड व्हायरस लसीच्या मिश्रणावर हा पहिला अभ्यास आहे. यापूर्वी, mRNA सह व्हायरस वेक्टर किंवा व्हायरस वेक्टरसह व्हायरस वेक्टरचा अभ्यास केला गेला आहे.

ICMR अभ्यासाचे निकाल काय सांगतात?
आपण हा निकाल पाच भागांमध्ये विभागू शकतो-

 1. सुरक्षितता: कोव्हॅक्सिनचे कोव्हशिल्डसोबत मिक्सिंग सुरक्षित आहे. अभ्यासात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला डोस दिल्यानंतर 30 मिनिटांच्या आत कोणतीही गंभीर लक्षणे दिसली नाहीत.
 2. रोग प्रतिकारशक्ती: कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिक्सिंगने SARS-CoV-2 विषाणूविरूद्ध मजबूत प्रतिकारशक्ती दर्शवली आहे. हा प्रतिसाद कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनच्या दोन्ही डोसपेक्षा जास्त आहे.
 3. व्हेरिएंट्स: मिक्सिंगमुळे कोरोना विषाणूच्या अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध चांगले परिणाम मिळाले आहेत. इम्यूनोजेनेसिटीच्या अभ्यासात हे उघड झाले आहे.
 4. अँटीबॉडीज: लस मिक्सिंग केल्याने अँटीबॉडीज अधिक तयार होतात आणि दीर्घकाळ टिकतात.
 5. दुष्परिणाम: लस मिक्सिंग आणि एकाच लसीचे दोन्ही डोस घेतल्याने सौम्य दुष्परिणाम दिसले. फक्त सूज, वेदना यासारखी लक्षणे दिसली.

भारतासाठी मिक्स अँड मॅच रणनीती का आवश्यक आहे?

 • सध्या भारतात 5 लसींना इमजरन्सी अप्रुव्हल मिळाले आहे. ती लसी उपलब्ध आहेत. येत्या काही महिन्यांत सात ते आठ कोविड लसी उपलब्ध होतील, अशी सरकारला आशा आहे. यामध्ये व्हायरल mRNA, DNA आणि रिकॉम्बिनेंट प्रोटीन प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या लसींचा समावेश आहे.
 • जेव्हा लसीचे पर्याय वाढतील तेव्हा समान लसींचे दोन डोस ठेवणे एक मोठे आव्हान असेल. विशेषत: ग्रामीण भागात आजही मोठ्या संख्येने लोक अशिक्षित आहेत. त्यांच्यासाठी लसींची नावे लक्षात ठेवणे सोपे नाही.
 • अशा परिस्थितीत भारताला अशा अनेक कॉम्बिनेशनवर काम करण्याची संधी मिळेल, जी जगात अन्य कोणत्याही देशात नाही. काही लस फारच स्वस्त असतात आणि मोठ्या प्रमाणात बनविल्या जाऊ शकतात. जर या जोड्या यशस्वी झाल्या तर गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी या लसी अत्यंत प्रभावी ठरतील. ते पुरवठा वाढविण्यात देखील मदत करतील.

आतापर्यंत या देशांनी मिक्स अँड मॅचला दिली परवानगी

 • अमेरिकाः 1 जून रोजी जाहीर केले की, पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रौढांना लसीच्या मिक्सिंगचा बूस्टर शॉट दिला जाईल. या अभ्यासाचे निकाल सप्टेंबरपर्यंत येतील.
 • कॅनडाः 1 जून रोजी निर्णय घेतला गेला की, ज्यांना अ‍ॅस्ट्राजेनेका लसीचा पहिली डोस मिळाला आहे, ते फायझर किंवा मॉडर्ना लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात.
 • यूके: जानेवारी महिन्यात निर्णय घेतला गेला की, ज्यांना पहिला डोस कोणत्या लसीचा घेतला किंवा दुसरा डोस उपलब्ध नसल्यास ते उपलब्ध असलेल्या लसीचा डोस घेऊ शकतील. फेब्रुवारीमध्ये​​​​​​​ फायझर आणि अ‍ॅस्ट्राजेनेका व्हॅक्सिनच्या मिक्सिंग चाचण्यांचे निकाल जाहीर केले. डोस मिसळल्याने चांगले परिणाम दिसून आले आहेत. फायझर आणि मॉडर्ना या लसींना देखील परस्पर वापरास​​​​​​​ परवानगी देण्यात आली आहे.
 • बहरीनः 4 जूनला सिनोफार्म व्हॅक्सिनने व्हॅक्सिनेट झालेल्या लोकांना फायझरच्या बूस्टर शॉटची परवानगी दिली. युएईनेही अशीच एक प्रणाली लागू केली आहे.
 • फिनलँडः 14 एप्रिलला 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना अॅस्ट्राजेनेकाच्या पहिल्या डोसनंतर इतर कोणत्याही लसीचा दुसरा डोस घेण्यास परवानगी देण्यात आली.
 • फ्रान्सः एप्रिलमध्ये 55 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना अॅस्ट्राजेनेकाच्या पहिल्या डोसनंतर फायझर किंवा मॉडर्ना लसीचा दुसरा डोस घेण्यास परवानगी देण्यात आली.
 • नॉर्वेः 23 एप्रिलला अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या पहिल्या डोसनंतर फायझर किंवा मोडर्ना लसीच्या दुस-या डोसला परवानगी दिली.
 • दक्षिण कोरियाः 20 मे रोजी जाहिर केले की, अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या डोससह फायझर किंवा इतर कोणत्याही लसीच्या डोस मिक्सअप बाबत ट्रायल्स घेण्यात येतील.
 • स्पेनः 9 मे रोजी फायझरने 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या पहिल्या डोसनंतर फायझरच्या दुस-या डोसची परवानगी दिली. कार्लोस III आरोग्य संस्थेत झालेल्या प्राथमिक​​​​​​​ अभ्यासानंतर हा निर्णय घेण्यात आला.
 • स्वीडनः 20 एप्रिल रोजी 65 वर्षाखालील कोणालाही अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या पहिल्या डोसनंतर इतर लसीचा दुसरा डोस घेण्याची परवानगी देण्यात आली.
 • चीनः एप्रिलमध्ये कॅनसिनो बायोलॉजिक्स आणि चोंगकिंग जिफई जैविक उत्पादनांनी लस मिश्रणावर चाचण्या सुरू केल्या.
 • रशिया: 4 जून रोजी अरब देशांनी चीनी लसमध्ये स्पुतनिक व्हीच्या मिक्सिंगचे ट्रायल्स घेणार असल्याचे सांगितले होते.
बातम्या आणखी आहेत...