आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Covishield Vaccine Dose Gap Explained; Covishield Efficiacy And Immunity Level, Indian Council Medical Research (ICMR)

एक्सप्लेनर:कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतराबाबत एवढा गोंधळ का? जाणून घ्या हे अंतर वारंवार बदलण्यामागचे विज्ञान नेमके काय आहे

रविंद्र भजनी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

भारतात कोरोना लसीकरणाला जेव्हापासून सुरुवात झाली आहे, तेव्हापासून कोविड 19 लसीच्या दोन डोसमधील अंतरावरुन बरीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीचे दोन डोसचे अंतर पुन्हा वाढवले आहे. हे नियम दोनदा बदलले आहेत. 22 मार्च रोजी, दोन डोसमधील अंतर 4-6 आठवड्यांवरुन 6-8 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आले. 13 मे रोजी हे अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवले गेले. परंतु कोव्हॅक्सिनच्या डोसच्या अंतरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ही नवीन गाइडलाइन नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनाइजेशन (NTAGI) च्या शिफारशीवरुन जारी करण्यात आली आहे. त्याचे दोन फायदे आहेत - 1. जास्तीत जास्त लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी लसीचा एक डोस दिला जाऊ शकतो आणि 2. लसीची कार्यक्षमता देखील वाढेल. परंतु दोन डोसमधील अंतर वाढविणे आपल्यासाठी सुरक्षित आहे का? जर आपल्याला दोन डोस 6 आठवड्यांत दिले गेले तर तुम्हाला काळजी करायची गरज आहे का? त्यामागील विज्ञान काय आहे, ते जाणून घ्या...

या निर्णयामागील सरकारचे तर्क काय आहे?

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितल्यानुसार, दोन डोसमधील अंतर केवळ कोविशिल्डसाठी वाढवण्यात आलेले आहे. कोव्हॅक्सिनच्या डोसच्या अंतरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लसीच्या पहिल्या डोसच्या प्रभावीतेच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ते सांगतात की, कोविशिल्डच्या पहिल्या डोसचा प्रभाव आधिक आहे. चाचण्यांमध्येही असे आढळले आहे की, ते 12 आठवड्यांपर्यंत त्याचा प्रभाव राहतो. त्यामुळे, या लसीचा दुसरा डोस उशीरा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हॅक्सिनसंदर्भात असा कोणताही अभ्यास केला गेला नाही, त्यामुळे त्याच्या दोन डोसमधील अंतर बदलले नाही.

डॉ. भार्गव सांगतात, कोविड - 19 ची पहिली लस 15 डिसेंबर रोजी आली होती. तेव्हापासून आतापर्यंत कोविड - 19 या लसीसंदर्भात विज्ञान उत्क्रांती होत आहे. आम्हाला नवीन गोष्टी कळत आहेत आणि त्यानुसार आम्ही आमच्या लसीकरण मोहिमेत बदल करीत आहोत. यातच आता कोविशिल्डच्या पहिल्या डोसचा प्रभाव 12 आठवड्यांपर्यंत राहतो, हे आम्हाला कळले आहे, त्यामुळे याच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे, ज्यामुळे लसीची कार्यक्षमता वाढवली जाऊ शकते.

जर एकच डोस प्रभावी असेल तर मग दुसरा डोस घेण्याची काय गरज आहे?

सरकारच्या युक्तिवादानुसार, एकच डोस आपल्याला कमीतकमी तीन महिन्यांसाठी संरक्षण देतो, असे दिसून येते. मग दुसर्‍या डोसची काय गरज आहे? यावर, लस शास्त्रज्ञ म्हणतात की, सर्व लसींची रचना एका विशेष पद्धतीने केली गेली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन आणि स्पुतनिक लाइट व्हॅक्सीनचा एक डोस शरीरात पुरेसे संरक्षण विकसित करतो. परंतु उर्वरित लसींची कार्यक्षमता अशी नाही. त्याच्या प्रभावीतेसाठी त्याचे दोन डोस दिले जातात.

दोन डोसच्या लसींमधील पहिला डोस शरीरातील अँटीबॉडी रिस्पॉन्स जागृत करतो. याचा अर्थ असा की, शरीराला विषाणू किंवा रोगजनक ओळखण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्याचे प्रशिक्षण मिळते. त्याच वेळी, दुसरा डोस इम्यून रिस्पॉन्सला बळकट करून अँटीबॉडी अनेक पटीने वाढवतो. या कारणास्तव, सल्ला दिला जातो की जर लस दोन डोसनुसार बनविली गेली असेल तर दोन डोस घेणे आवश्यक आहे.

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यामागील विज्ञान काय आहे?

मार्गदर्शक सूचनांमधील बदल कोविशिल्ड संबंधित अनेक केस स्टडीज आणि क्लिनिकल डेटाच्या आधारे करण्यात आला आहे. पहिल्या डोसच्या काही आठवड्यांनंतर जर दुसरा डोस घेतला तर लसची कार्यक्षमता लक्षणीय वाढते, हे यात सांगण्यात आले आहे.

सुरुवातीच्या शिफारशींमध्ये कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये 4-6 आठवड्यांचे अंतर ठेवले पाहिले, असे सांगितले गेले होते. त्यानंतर ते 6-8 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आले. पण, क्लिनिकल रिसर्च असे सांगते की, 8 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीत दोन डोस दिले गेले तर त्याची प्रभावीता 80% - 90% वाढते.

द लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, लसीची प्रभावीता आणि शरीराची इम्यून रिस्पॉन्स देखील दोन डोसच्या विलंबामुळे वाढते. अभ्यासातून हे समोर आले आहे की, कोविशिल्डच्या बाबतीत दोन डोसमधील अंतर जितके जास्त असेल तितकी त्याची परिणामकारकता जास्त असेल. जेव्हा दोन डोस 6 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत दिले गेले तेव्हा त्याची प्रभावीता 50-60% होती, आणि जेव्हा हे अंतर वाढवून 12-16 आठवडे करण्यात आले तेव्हा त्याचा प्रभाव 81.3% पर्यंत वाढला.

दोन डोसमधील अंतर फक्त भारतात वाढविण्यात आले आहे का?

  • नाही. भारतापूर्वी ब्रिटन आणि स्पेनमध्येही अ‍ॅस्ट्राजेनेका लसीचे दोन डोसमधील अंतर 12 आठवडे करण्यात आले आहे. तिथेही, क्लिनिकल स्टडीजमध्ये जेव्हा अंतर वाढवण्याविषयीचा प्रतिसाद चांगला आहे हे दिसून आले, तेव्हा हा निर्णय घेण्यात आला.
  • दोन डोसमधील अंतर वाढल्यास कोरोना व्हायरस विरूद्ध iG अँटीबॉडी प्रतिसाद दुप्पट होऊ शकतो, असे डॉक्टरदेखील सांगत आहेत.
बातम्या आणखी आहेत...