आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • CSDS Youth Survey | Marathi News | These Are The Thoughts Of The Youth Of India About Marriage, Career And Worship ...

सीएसडीएस यूथ सर्व्हे:लग्न, करिअर व पूजाअर्चेबाबत भारतातील तरुणाईचे असे आहेत विचार...

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह; ३८% अविवाहित तरुण ‘अरेंज्ड मॅरेज’लाच पसंती देतील
39% लव्ह मॅरेजला प्राधान्य देणाऱ्या तरुणांना वाटते वैवाहिक आयुष्य ठीक नसेल तर विभक्त राहावे
- २००७ मध्ये १५ ते ३४ वर्षांचे ५५% तरुण विवाहित होते. २०१६ मध्ये ही संख्या घटून ४७%, तर २०२१ मध्ये ४२% वरच आली आहे. म्हणजेच, अवघ्या १० वर्षांतच त्यात १३% ची घट नोंदवण्यात आली आहे.
- २५-२९ वयोगटातील ४० % तरुण अविवाहित आहेत. १८ ते २४ गटात ७६% पर्यंत आहेत. ३०-३४ वर्षांचे १२% तरुणच अविवाहित आहेत.
- उशिरा लग्न करणाऱ्यांत ६१% ग्रॅज्युएट वा जास्त शिकलेले आहेत. निरक्षरांची संख्या १९% आहे.
- ८०% पेक्षा जास्त तरुण एकच जात, एकच राज्य आणि एकाच धर्मात लग्न करतात.
- ३३% ग्रॅज्युएट वा त्यापेक्षा उच्चशिक्षित लोकांचे मत आहे की, वैवाहित आयुष्यात त्रस्त असाल तर घटस्फोट घेतला पाहिजे. मात्र केवळ ११% निरक्षरांनीच या पर्यायाला पसंती दिली.
- ७५% विवाहित तरुण आणि ३८% अविवाहित अरेंेज्ड मॅरेजचे समर्थक.

धार्मिक; ३६% तरुण रोज पूजा करतात, मात्र ९% कधीच नाही
45% मुस्लिम रोज उपासना करतात, तर ३४% हिंदू, ५३% ख्रिश्चन आणि ३२% शीख असे करतात
- ३६% तरुणच नियमित पूजा करतात. ३४% कधीकधी, १८% फक्त सणवार आणि ९% लोक पूजा करत नाहीत.
- १२% नियमित व्रत ठेवतात, ३१% कधीकधी, ३४% सणासुदीला, १९% लोक कधीच व्रत करत नाहीत.
- १७% तरुणच नियमित घराच्या मंदिरात जातात, ३९% कधीकधी, २९% फक्त सणवाराला आणि ११% कधीच मंदिरात जात नाहीत.
- कधीच पूजा न करणाऱ्यांत सर्वाधिक १४% शीख, ९% हिंदू, ८% मुस्लिम, ७% ख्रिश्चन आहेत.
- ८३% पुरुषांच्या तुलनेत ९१% महिला पूजा करतात. ६९% पुुुरुषच व्रत ठेवतात, मात्र ८५% महिला असे करतात. ८२% पुरुष धार्मिकस्थळी जातात, अशा महिलांची संख्या ८९% इतकी आहे.
- ७९% तरुणच लग्नाची तारीख धर्मगुरूंना विचारतात. २०१५ मध्ये हे प्रमाण ८२% होते. २९% तरुण प्राॅपर्टी घेण्याआधी सल्ला घेतात.

रोजगार; ५५% ना सरकारी नोकरी हवीय, ५ टक्के लोकांनाच मिळते
20% तरुण व्यवसाय करतात, १७% प्रोफेशनल (डाॅक्टर, इंजि.आदी) आहेत, १३% कृषीमध्ये
- 55% सरकारी नोकरी हवी आहे तर 24% तरुणांना व्यवसाय आवडतो. खासगी नोकरीची इच्छा फक्त 9% आहे. पण 5% लोकांनाच सरकारी नोकरी मिळतेय.
- 45% तरुण बेरोजगारी, 14% गरिबी, 7% महागाई, 5% भ्रष्टाचार 6% ऑनलाइन शिक्षणाला देशाची सर्वात मोठी समस्या मानतात.
- 41 टक्के तरुणांचे म्हणणे आहे की त्यांच्या राज्यात रोजगाराची शक्यता कमीच आहे.

विश्वास; ६५%ना तणावात कुटुंबाचा माेठा आधार वाटताे
56% ग्रॅज्युएट किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेले लोक आपल्या नोकरीबाबत सर्वाधिक चिंतेत
- 61% तरुणांसाठी कुटुंबाची आर्थिक सुरक्षा, 60% तरुणांसाठी वैयक्तिक आरोग्य, 56% साठी नोकरी, 54% साठी स्वत:चा
लूक, 49% साठी कौटुंबिक वाद, 42% साठी घरगुती हिंसाचार आणि 32% साठी आपले लग्न सर्वात मोठी चिंता आहे.
- 65% तरुणांच्या मते मानसिक तणावाच्या स्थितीत ते कुटुंबाजवळच (माता-पिता, पत्नी आदी)जातील.
- 15% तरुण म्हणतात, मानसिक तणावात ते मित्रांचा आधार घेतील.
- 60% फेसबुक, 63% मौज/चिंगारी, 62% इन्स्टाग्राम युजर्स व सेल्फीवाले 61% लोक लूकविषयी अधिक चिंतातुर आहेत.
- सरकारी नोकरीला महत्त्व देणारे 63% लोक त्रस्त राहतात.
- 51% पुरुष आपल्या लूकविषयी चिंतातुर आहेत तर असे करणाऱ्या महिला 57% आहेत. म्हणजे ते कशी दिसते, यावर जास्त भर देतात.

बातम्या आणखी आहेत...