आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी देशभरात निधी उभारण्याचे अभियान जोरात सुरू आहे. आतापर्यंत १५९० कोटी रुपयांहून जास्त निधी संकलित करण्यात आला आहे. परंतु अभियानात निधी संकलन अतिशय कौशल्याने केले जात आहे. त्यासाठी देशभरातील ६५० जिल्ह्यांतील ५ लाखांहून जास्त कार्यकर्ते सक्रिय आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या सुमारे २ लाखांहून जास्त टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर निगराणीसाठी एक मोठी टीमही आहे. ही टीम पैशाच्या हिशेबापासून व्यवस्थापन व आगामी योजना तयार करत आहे. त्यात सायबर तज्ञ, सीए, एमबीए उत्तीर्ण तरुणांची फौज आहे. रामजींच्या कार्यात श्रीराम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात आहे. जिल्हास्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तेथे विविध पाळ्यांमध्ये चोवीस तास कोणता ना कोणता कार्यकर्ता उपलब्ध असतो. येथे वायफाय, लॅपटॉप, प्रिंटर, वेबकॅम इत्यादी तंत्रज्ञानाची व्यवस्थाही आहे. त्याद्वारे निगराणी व ऑनलाइन बैठकांचे सत्र सुरू असते. तज्ञांची टीम सर्व सेंटरहून २४ तास व सात दिवस डेटा कलेक्शनदेखील करत आहे. एवढेच नव्हे तर अभियानावर केंद्रीय पातळीवरदेखील निगराणी करणारा एक अॅपदेखील आहे. हे अॅप जिल्हा, प्रांत स्तरावरील अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर डाऊनलोड करण्यात आले आहे. डिपॉझिटर अॅपमध्ये हा संग्रह केला जातो. त्याद्वारे रोजचा निधी बँकेत जमा होतो. या अभियानादरम्यान दररोज ग्रामस्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांचा संवाद होतो.
बँकांत निगराणी, अॅपमध्येही स्वतंत्र नोंद
सीए जे.पी. गुप्ता म्हणाले, अभियानादरम्यान संकलित रक्कम किंवा धनादेश एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनबीमध्ये जमा केली जात आहे. तेथे अधिकारी त्यावर निगराणीचे काम करत आहेत. अॅपमध्येही धनादेश, कूपन, रोकड रकमेची नोंद केली जात आहे. त्यात पॅन, मोबाइल क्रमांक पत्ताही नोंदवला जातो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.