आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Cyber Attack On Food Companies : Hackers Demand Ransom By Leaking Data On Food Companies During Festivals; By Buying This Data, Competing Brands Increase Their Consumption

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सणासुदीत फूड कंपन्यांच्या डाटावर डल्ला मारून हॅकर्स मागतात खंडणी; हा डाटा विकत घेऊन प्रतिस्पर्धी ब्रँड वाढवतात आपला खप

शरद पांडेय | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खरेदीसंबंधी सर्व नोंदी ठेवतात फूड कंपन्या, त्यावरच होते सणोत्सवाचे नियोजन
  • लॉकडाऊननंतर 50 पेक्षा जास्त फूड कंपन्यांवर सायबर हल्ले

सायबर हॅकर वर्षभर सर्व कंपन्या व बँकांचा डाटा चोरी करत असतात. परंतु, सणासुदीच्या काळात एक वेगळा ट्रेंड दिसून येत आहे. आता हॅकर्सचे लक्ष फूड कंपन्या आणि मिठाई दुकानांच्या डाटावर आहे. स्पर्धक कंपन्या स्टोअर्सचा डाटा विकत घेऊन आपली व्यूहरचना करतात व आपले उत्पादन बाजारात आणतात. नुकताच हॅकर्सनी हल्दीराम व मिठास या देशातील दोन बड्या ब्रँडसह अनेक नामवंत व्यवसायांच्या डाटाकडे आपला माेहरा वळवला होता. दोन्ही समूहांनी उत्तर प्रदेशातील नोएडात दहा दिवसांच्या आत तक्रारी दिल्या आहेत. सायबर एक्स्पर्ट कंपन्यांकडे आलेल्या तक्रारींनुसार देशभरात लॉकडाऊननंतर ५० हून अधिक लहान-मोठ्या फूड आणि मिठाईच्या कंपन्यांवर सायबर हल्ले झाले आहेत. सर्व नामवंत फूड ब्रँडचा देशभरातील व्यवसाय ऑनलाइन आहे. रिटेल काउंटरवर ग्राहकांच्या बिलिंगपासून उत्पादने व ब्रँडिंगही सर्व ऑनलाइन जोडलेले आहे.

सायबर क्रिमिनल्स ग्रुपने करतात हल्ले, मोठ्या रकमेत विकतात डाटा

हल्दीरामच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, हॅकरने मेल पाठवून चॅट करण्यास सांगितले. दरम्यान, त्याने खूप मोठ्या रकमेची मागणी केली. दुसरी फूड कंपनी मिठासच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हरमध्ये रॅनसमवेअरच्या विषाणूंचा हल्ला झाला. यामुळे कंपनीचे काम बंद पडले. ५ वर्षांचा डाटा हॅक झाला. उत्तर प्रदेशच्या सायबर सेलचे प्रभारी आयपीएस अधिकारी त्रिवेणी सिंह यांनी सांगितले, सायबर गुन्हेगार गरजेनुसार ग्रुपने हल्ला करतात. अशा प्रकारच्या दहा ते १२ टक्के प्रकरणांची नोंद होते. आता फेस्टिव्हल सीझन आहे. म्हणून मिठाई व फूड कंपन्यांचा डाटा हॅक होतोय.

काय सांगतात तज्ज्ञ - अमित दुबे, आयआयटी खरगपूर व कनिष्क गौड, इंडिया फ्यूचर फाउंडेशन

> हॅकर्स कंपन्यांच्या अॅडमिन वा आयटीच्या मेल आयडीवरून कर्मचाऱ्यांना मेल पाठवतात. मेल उघडताच संगणक हॅक होतो.

> सुरक्षा यंत्रणा अपडेट न केल्याने सर्व्हर हॅक केले जाते. आक्षेपार्ह छायाचित्र दाखवून डाटा हॅक करतात.

> सिक्युरिटी व सॉफ्टवेअर अपडेट करत राहा. कंपन्यांना सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट ठेवणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी स्पॅम मेलच्या अटॅचमेंट डाऊनलोड करू नयेत.

> महत्त्वाचा डाटा ऑफलाइन ठेवा.