आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकबोर्डडाकू सलीम गुर्जरचे गाव मीठ-मिरचीसाठी तरसले:150 घरांना कुलूप, आजारी पडल्यास तापाच्या गोळ्याही मिळत नाहीत

चंबळमधील बिहड येथून मनीषा भल्ला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील चंबळमधील बिहड गाव. आजूबाजूला उंच-उंच पर्वत रांगा, घनदाड जंगल आणि नद्या, ओढे यांनी वेढलेला प्रदेश. दिवसा उजेडातही भितीदायक अंधार. सुनसान आणि निर्जन रस्ते. दूरपर्यंत कोणतीच हालचाल नाही. थोडासा आवाजही मनाचा थरकाप उडवतो. येथे 250 घरे आहेत. यातील 150 घरांना मात्र, कुलूप लटकले दिसते. दोन घरे सोडली तर बाकीची सर्व घरे कच्ची व जीर्ण अवस्थेत आहेत.

बिहडचा दरोडेखोर म्हणून ओळख असलेल्या सलीम गुर्जर याचे हे गाव आहे. सलीमची सुमारे 100 जणांची टोळी होती. यामध्ये 15-20 महिला. म्हणजे गावातील 80% लोक हे दरोडेखोर आहेत आणि सर्वाधिक महिला डाकू असलेली ही टोळी आहे. 15 वर्षे या लोकांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. अगणित खून केले, लुटमार केली. गावकऱ्यांना भरपूर पैसे वाटून दिले, पण आज हे गाव मिठ आणि मिरचीसाठी देखील तरसत आहे.

मी यूपीच्या उरई जिल्ह्यात या मार्गांवरून 110 किलोमीटरचा प्रवास करून बिहड गावात पोहोचले. सलीम गुर्जर मारला गेलाय मात्र, त्याच्या नावाची भीती अजूनही लोकांच्या मनात आहे.
मी यूपीच्या उरई जिल्ह्यात या मार्गांवरून 110 किलोमीटरचा प्रवास करून बिहड गावात पोहोचले. सलीम गुर्जर मारला गेलाय मात्र, त्याच्या नावाची भीती अजूनही लोकांच्या मनात आहे.

गावात शाळा आहे, पण शिक्षक नाही. पान-गुटख्याचे दुकान तर आहे, पण साध्या सर्दीसाठीही औषध घ्यायचे असेल किंवा मीठ-मिरचीसाठी देखील नदी ओलांडून 12 किलोमीटर दूर दुसऱ्या गावात जावे लागते. पुरुष कसेही नदी पार करतात, पण स्त्रिया देवावर अवलंबून असतात. जर गंभीर आजार असेल तर त्यातून सुटणे अशक्य आहे.

उरई जिल्हा मुख्यालयापासून 110 किलोमीटरचा प्रवास करून मी जालौन, इटावा आणि भिंडच्या सीमेवर असलेल्या बिहड गावात पोहोचले.

संध्याकाळचे 5 वाजले होते. काही लोक घरासमोर जमलेले दिसले. लोक म्हणजे केवळ पुरुष, इथे स्त्रिया पुरुषांसमोर येत नाहीत. रात्रीच्या अंधारात कोणाचाही चेहरा नीट ओळखताही येत नाही. वीज आहे, पण बहुतांश लोकांकडे कनेक्शन नाहीत. काही मोजक्या घरांतील मिनमिनते बल्ब सोडले तर सूर्यास्त होताच गाव अंधारात बुडालेले असते.

गावात वीज असली तरी एवढा अंधार आहे की, लोकांचे चेहरे पाहण्यासाठी मला मोबाईलची टॉर्च लावावी लागली.
गावात वीज असली तरी एवढा अंधार आहे की, लोकांचे चेहरे पाहण्यासाठी मला मोबाईलची टॉर्च लावावी लागली.

मी विचारले या गावाची अशी अवस्था का? उत्तर आले- सलीम गुर्जरमुळे.

कोण होता सलीम गुर्जर, त्याच्यामुळे या गावाला शिक्षा का भोगावी लागली?

अकबर सिंह कुशवाह यांनी सलीमची कहाणी सांगितली...

सलीमला 6 भाऊ होते. सर्व उंच, चांगले मजबूत शरीर बांधा असलेले. त्यांचे वडील प्रसिद्ध पैलवान होते. फक्त एका भावाने लग्न केले आणि त्यालाही एकुलता एक मुलगा होता. सलीम बेहड येथील प्रसिद्ध डाकू निर्भय गुर्जर आणि रज्जन गुर्जर यांच्यासोबत राहत होता. निर्भय गुर्जर हा अनेकदा सलीमच्या घरी येत असे. त्यामुळे गावात सलीमची दादागिरी सुरू असायची.

गावातील एका दबंग चौहान कुटुंबाला ही गोष्ट आवडत नव्हती. याच कुटुंबातील हरचंद चौहान पंचायत निवडणुकीत उभे राहिले आणि निवडणुकीत पराभूत झाले. तुम्ही मतदान केले असते तर मी जिंकलो असतो, अशी शिवीगाळ त्यांनी सलीम गुर्जर याच्या कुटुंबीयांना केली.

हळूहळू या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा प्रकार निर्भय गुर्जरला समजताच त्याने गावात येऊन चौहान कुटुंबाच्या घराला रात्रभर घेराव घातला. सलीमकडे कोणी डोळे मोठे करुनही पाहिले तर तर त्याचा नाश करू, अशी धमकी त्याने संपूर्ण गावाला दिली.

दुसऱ्या दिवशी भीतीपोटी हरचंद चौहानचे संपूर्ण कुटुंब गाव सोडून भिंडला गेले. त्यानंतर काही दिवसांनी सलीम गुर्जर यांच्या एकुलत्या एक पुतण्याची हत्या झाली. हा आरोप चौहान कुटुंबावर लावण्यात आला होता. येथूनच सलीम गुर्जरची दरोडेखोर बनण्याची कहाणी सुरू झाली.

पूर्वी सलीम निर्भय गुर्जरला छुप्या पद्धतीने मदत करायचा, पण आता त्याने बंदूक हाती घेतली. त्याच्या डोक्यात संताप होता. काही दिवसांनी सलीमने चौहान कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांची गोळ्या झाडून हत्या केली.

यानंतर या परिसरात त्याची भीती वाढत गेली. त्याच्या नावाने लोक थरथर कापू लागले. पोलिसही इथे यायला घाबरत होते. सलीमने बेहड परिसरावर सुमारे 15 वर्षे राज्य केले. 2006 मध्ये पोलिस चकमकीत तो मारला गेला. त्याचे दोन भाऊ अजूनही जिवंत आहेत, पण ते कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही.

अकबर सांगतात की, 'सलीम गावाबाहेर तंबूत राहायचा. तेथे त्याने स्वतःसाठी एक ओटाही बांधला होता, जो आजही आहे. तो गावकऱ्यांना भरपूर पैसे वाटायचा. याच कारणामुळे स्वत: गरिबीने हैराण झालेल्या तरुणी त्याच्या टोळीत सामील होत असत. इतकंच नाही तर तो मुलींना पळवून आणायचा आणि नंतर जबरदस्तीने त्यांच्याशी लग्न करायचा.

तो फक्त गावातील लोकांकडूनच त्याला लागणार्‍या वस्तू घ्यायचा आणि उरलेले पैसे कधीच परत मागत नव्हता.

इतकंच नाही तर गावात कुणाचं लग्न झालं, कुणी आजारी असेल किंवा कुणाच्या घरी कुणी मरण पावलं असेल, तर सलीम स्वत: त्याच्या घरी येऊन त्याला मदत करायचा. तो न मागता भरपूर पैसे द्यायचा. त्यामुळे गावातील लोक त्याला आपला मसिहा मानत होते. त्याबदल्यात सलीम गावकऱ्यांकडून खाण्यासाठी पोळ्या मागत होता.

सलीम गुर्जरच्या गुन्ह्यांची शिक्षा गावातील मुलांनाही भोगावी लागत आहे. त्यांच्यासाठी शाळा आहे, पण शिक्षक नाहीत.
सलीम गुर्जरच्या गुन्ह्यांची शिक्षा गावातील मुलांनाही भोगावी लागत आहे. त्यांच्यासाठी शाळा आहे, पण शिक्षक नाहीत.

इथून थोडं पुढे गेल्यावर मला सद्दिक अली भेटतो. सद्दिक हा लोकगायक आहे. तो सलीम गँगचे मनोरंजन करायचा. 1990 ची घटना आहे. एकदा सलीमने गावात यज्ञ केला. त्यात मलाही बोलावले होते. नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.

सलीमच्या मागे 5-6 महिला बंदुका घेऊन उभ्या होत्या. त्या रात्री सलीमने सगळ्यांसोबत मनसोक्त डान्स केला. निघताना मला 2600 रुपये दिले. त्या काळी 2600 रुपये खूप होते.

या गावातील राम खिलावन सिंह चौहान सांगतात की, 'हे गाव चारही बाजूंनी डोंगर आणि जंगलांनी वेढलेले आहे. जवळच सिंधू नदी आहे. हे गाव दरोडेखोरांना लपण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी सर्व प्रकारे योग्य होते.

डाकू मलखान सिंह, फुलन देवी, घनश्याम बाबा, मुस्तकीम बाबा, पुतलीबाई यांसारखे अनेक बडे दरोडेखोर इथे बराच काळ तळ ठोकून आहेत. त्यामुळे गाव बदनाम झाले.

ते म्हणतात, 'जोपर्यंत हा डाकू जिवंत होता तोपर्यंत गावातील लोकांना कोणतीही अडचण आली नाही, पण त्यानंतर या गावाला मरगळ लागली. आज स्थिती अशी आहे की, अर्ध्याहून अधिक घरांना कुलूप आहेत.

गावातील पुरुष आणि पोरं कमवायला सुरत-दिल्लीला गेली आहेत. अशी अनेक घरे आहेत जिथे फक्त स्त्रीया राहत आहेत. डाकू जिवंत असताना पोलिस गावात यायचे. माहिती देण्याच्या संशयावरून ते गावातील लोकांना मारहाण करायचे. पण आता ना पोलिस येतात ना प्रशासन.

या गावातील बहुतांश घरे कच्ची आहेत. काही मातीचे तर काही झोपड्या आहेत. मोजता येतील अशी दोनच घरे पक्की आहेत.
या गावातील बहुतांश घरे कच्ची आहेत. काही मातीचे तर काही झोपड्या आहेत. मोजता येतील अशी दोनच घरे पक्की आहेत.
गावात 250 घरे आहेत. यापैकी सुमारे दीडशे घरांना कुलूप आहेत. अनेकांनी सुविधांअभावी तर काहींनी भीतीपोटी गाव सोडले आहे.
गावात 250 घरे आहेत. यापैकी सुमारे दीडशे घरांना कुलूप आहेत. अनेकांनी सुविधांअभावी तर काहींनी भीतीपोटी गाव सोडले आहे.

यानंतर मला गावातील मुलादेवी भेटल्या. त्यांचा मुलगा हैदराबादमध्ये बत्ताशे विकतो. त्या सांगतात की, 'मुलगा कधी एक हजार तर कधी दोन हजार रुपये घरी पाठवतो, आणि कधी तेही पाठवू शकत नाही.

आता नदी ओलांडणे माझ्या कडून होत नाही आणि नदीपलीकडे जाऊन सामान आणणारे घरात दुसरे कोणीही नाही. सलीम जिवंत होता तो पर्यंत आम्हाला कशाचीच अडचण आली नाही.

पावसात गावाचे बेट होते, नदीवर ना पूल ना बोट

गंगाजली यांची दोन मुले गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करतात. त्या सांगतात की, 'पाऊस पडला की गाव एक बेट बनते, पूर्णपणे अलिप्त. जो आजारी पडातो त्याची काळजी घ्यायला कोणी नसते. गावात तापाच्या गोळ्याही मिळत नाहीत. पुरुष पोहून कसेही गावाबाहेर जातात, पण आम्ही महिलांनी काय करायचे? आमच्यासाठी एकही बोट नाही.

रामपुरा शहर या गावापासून नदीने 12 किमी अंतरावर आणि रस्त्याने 26 किमी अंतरावर आहे. सरकारी रेशन तेथेच मिळते. तेथेच छोटी दुकाने आहेत जिथे रोजच्या वस्तू मिळतात.

ज्यांच्याकडे दुचाकी आहे, ते सामान आणण्यासाठी 26 किलोमीटर जातात, मात्र पावसाळ्याच्या दिवसात त्यांचीही अडचण होते. रस्त्यावर पाणी तुंबलेले असते. गावात फक्त दोन ते तीन लोकांकडे दुचाकी आहे.

गावात रस्त्याच्या नावावर हा रस्ता आहे. 26 किलोमीटर गेल्यावर रामपुरा शहर लागते. पाऊस पडला की हा रस्ताही बंद होतो.
गावात रस्त्याच्या नावावर हा रस्ता आहे. 26 किलोमीटर गेल्यावर रामपुरा शहर लागते. पाऊस पडला की हा रस्ताही बंद होतो.

साप चावल्याने अनेकांचा मृत्यू , उपचार 110 किमी दूर

गंगाजली देवी सांगतात की, 'गावातील अनेकांना आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. दोन महिन्यांपूर्वी एका महिलेला साप चावला होता. नदी ओलांडून आम्ही तीला घेऊन जाऊ शकलो नाही. वाहनाची व्यवस्था करून नंतर उरई पर्यंत नेण्यात बराच वेळ गेला. दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टर म्हणाले की, आता जीवच नाही तर उपचार काय करणार?

जंगल आणि नदी-नाल्यांमुळे या गावात साप मोठ्या प्रमाणात येतात. दरवर्षी काही लोकांचा मृत्यूही होतो. सर्पदंशाच्या उपचारासाठी आजूबाजूला कोणतीही व्यवस्था नाही. त्यासाठी उरई येथेच जावे लागते. उरई येथून 110 किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत तेथे पोहोचण्यापूर्वीच लोकांचा मृत्यू होतो.

सलीमचे लोक बोट चालवण्याच्या नावाखाली कमिशन मागतात

अनेक दिवसांपासून नदीवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे, मात्र आजतागायत काम पूर्ण झालेले नाही, असे गावातील ज्येष्ठ सांगतात. प्रशासनाला यात रस नाही. एक-दोनदा गावातील लोकांनी बोट चालवण्यासाठी पुढाकार घेतला, मात्र सलीम गुर्जरशी संबंधित लोकांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. बोटीच्या कमाईत आमचाही वाटा असेल, असे ते सांगू लागले. तेव्हापासून बोट चालवण्याबाबत कोणीच बोलत नाही.

ही सिंधू नदी आहे. रामपुरा गावात जाण्यासाठी ही नदी पार करावी लागते. पलीकडे जाण्यासाठी बोटीची सोय नाही.
ही सिंधू नदी आहे. रामपुरा गावात जाण्यासाठी ही नदी पार करावी लागते. पलीकडे जाण्यासाठी बोटीची सोय नाही.

प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांनी फोन कट केला

नदीवर अद्याप पूल का बांधला नाही? शेवटी गावकऱ्यांना बोट का मिळत नाही? हा प्रश्न मी जालौनचे मुख्य विकास अधिकारी डॉ. अभय कुमार श्रीवास्तव यांना विचारला. त्यांनी माझे पूर्ण ऐकून घेतले आणि नंतर फोन कट केला. यानंतर मी अनेकवेळा फोन केला, पण त्यांनी उत्तर दिले नाही.

चंबळच्या डाकूंचे दस्तऐवजीकरण करणारे आणि चंबळ विद्यापीठाचे अध्यक्ष शाह आलम राणा सांगतात की, या गावावर कायम डाकूंचे राज्य राहिले आहे. गाव उध्वस्त झाले आहे. बहुतेक लोक स्थलांतरित झाले आहेत. ज्यांना ते जमले नाही, त्यांची मुले गाव सोडून गेली आहेत. रोजगारासाठी येथे काहीही नाही.

बातम्या आणखी आहेत...