आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Dainik Bhaskar Ground Reort : Hundreds Of Afghan People Gathered Outside The UNHCR Office, Demanding Refugee Cards So That They Could Get Citizenship Of Other Countries; News And Live Updates

भारताच्या अफगाण निर्वासितांची भीती:CAA लागू झाल्यास वास्तव्य करणे होणार कठीण; निर्वासित कार्ड मिळाल्यास चांगल्या देशात घेता येणार आसरा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: वैभव पलनीटकर
  • कॉपी लिंक
  • निर्वासितांच्या प्रश्नावर भारताची भूमिका काय आहे?

तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर ताबा मिळवताच देशात हाहाकार माजला आहे. तालिबान्यांच्या या भीतीमुळे भारतात राहणारे अफगाणी चिंतेत आहेत. कारण अफगाणिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याने ते आपल्या देशात परत जाऊ शकत नाही. तर दुसरीकडे, भारत देशात सीएए कायदा लागू झाल्यास त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. ही सर्वात मोठी चिंता संध्या भारतातील अफगाणी निर्वासितांना सतावत आहे. त्यामुळे ते सर्वजण या दुहेरी संकटातून जात आहे.

भारतात आजघडीला 21 हजारांपेक्षा जास्त अफगाणी निर्वासित आहेत. सोमवारी शेकडो अफगाणांनी दिल्लीतील संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्चायुक्त (UNHCR) कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान, या निदर्शनात अफगाणी निर्वासितांनी इतर देशांचे नागरिकत्व मिळावे म्हणून निर्वासित कार्डची मागणी केली.

काबुलची बिहिस्ता गेल्या 5 वर्षांपासून भारतात राहत आहेत. निर्वासित कार्ड नसल्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश मिळत नाहीये.
काबुलची बिहिस्ता गेल्या 5 वर्षांपासून भारतात राहत आहेत. निर्वासित कार्ड नसल्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश मिळत नाहीये.

अफगाणिस्तानात परतण्याच्या सर्व आशा संपल्या
अफगाणिस्तानमधील काबुलचे रहिवासी असलेले बेहिश्ता गेल्या 5 वर्षांपासून भारतात वास्तव करत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे बेहिश्ताच्या आई-वडीलांना वयाच्या 7 व्या वर्षी भारतात यावे लागले होते. ते सध्या दिल्लीतील अफगाण बस्तीमध्ये राहत असून त्याचे वडील भंगाराचे दुकान चालवतात. दरम्यान, त्यांच्याकडे भारत देशाचे निर्वासित कार्ड नसल्यामुळे कोणत्याच शाळेत प्रवेश मिळत नाहीये. 'वुई वॉन्ट फ्यूचर, वुई वॉन्ट लाइफ' असे म्हणत बेहिश्ता यूएनएचसीआर कार्यालयासमोर निदर्शन करत होती. आम्ही यासंदर्भात यूएनएचसीआरला अनेक ई-मेल पाठवले असून त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप बेहिश्ताने यावेळी केला.

9 वर्षीय मोहम्मद खालिद बोलता बोलता रडू लागला. त्याच्या वडिलांना काम मिळत नसल्याने संध्याकाळी काय खावे? असा प्रश्न पडत असल्याचे तो म्हणाला.
9 वर्षीय मोहम्मद खालिद बोलता बोलता रडू लागला. त्याच्या वडिलांना काम मिळत नसल्याने संध्याकाळी काय खावे? असा प्रश्न पडत असल्याचे तो म्हणाला.

संध्याकाळी काय खावे याची चिंता
यूएनएचसीआर कार्यालयासमोरील निदर्शनात 9 वर्षीय मोहम्मद खालिद रडत होता. तो दुसऱ्या वर्गात शिकत असून त्याला कसेतरी शाळेत प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, त्यांच्या वडीलाच्या हाताला अनेक दिवसांपासून काम नाहीये. त्यामुळे ते घरीच असून आम्हाला संध्याकाळी काय खावे याची चिंता असल्याचे मोहम्मद खालिद रडत म्हणाला. आम्हाला निर्वासित कार्ड देत एका चांगल्या देशात स्थायिक करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

केवळ 7 हजार लोक UNHCR कार्डधारक
भारत देशात अफगाण निर्वासितांची संख्या 21 हजार असल्याचे अफगाण शरणार्थी संघटनेचे भारताचे प्रमुख अहमद झिया गनी यांनी सांगितले आहे. यातील जास्तीत जास्त लोक राजधानी दिल्लीत राहतात. यावितिरिक्त हैदराबाद आणि पुण्यातही अफगाण निर्वासितांची संख्या चांगली असल्याची ते म्हणाले. देशातील 21 हजार निर्वासितांपैकी केवळ 7 हजार लोकांजवळ यूएनएचसीआर कार्डधारक आहेत. इतर लोकांजवळ निळे कार्ड असून ते एवढे काही महत्वाचे नसल्याचे गनी यांनी सांगितले.

अफगाणिस्तान शरणार्थी संघटनेचे (भारत) प्रमुख अहमद झिया गनी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
अफगाणिस्तान शरणार्थी संघटनेचे (भारत) प्रमुख अहमद झिया गनी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

अडचणीत आहेत अफगाण शरणार्थी
मानवतावादी आणि आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख सुधांशु शेखर सिंह म्हणतात की, सर्व अफगाणिस्तानातील निर्वासितांना UNHCR कार्ड मिळाले नाहीत. ज्यांना कार्ड मिळाले आहेत, त्यांना निर्वासित म्हणून ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या मिळत नसल्याची खंत शेखर सिंह यांनी व्यक्त केली. अनेक अफगाण निर्वासितांना नोकऱ्या मिळत नाहीये. जॉब मार्केटमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले जात आहे. महिलांना वेश्या व्यवसायात येण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला आहे.

अफगाणांच्या या निदर्शनात मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलेही सहभागी झाले होते.
अफगाणांच्या या निदर्शनात मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलेही सहभागी झाले होते.

निर्वासितांच्या प्रश्नावर भारताची भूमिका काय आहे?
एका अंदाजानुसार, भारतात आजघडीला सुमारे 3 लाख निर्वासित राहत आहेत. विशेष म्हणजे भारत देश 1951 च्या संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन आणि 1967 च्या निर्वासित प्रोटोकॉलचा भाग नाही. तर दुसरीकडे, भारतात निर्वासितांबाबत स्वतःचे कोणतेही धोरण किंवा कायदा नाही आहे. त्यामुळे भारत सरकार कोणत्याही वेळी निर्वासितांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून घोषित करू शकते. सरकार अशा लोकांवर परदेशी कायदा किंवा भारतीय पासपोर्ट कायदा अंतर्गत कारवाई करू शकते आणि अतिक्रमणकारी म्हणून घोषित करु शकते.

केंद्र सरकारने नुकतेच निर्वासितांच्या बाबतीत सीएए कायदा तयार केला आहे. जो अद्याप अधिसूचित करण्यात आलेला नाही. सीएए कायद्यामध्ये नागरिकत्व देताना धर्माला आधार बनवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या बिगर मुस्लिम लोकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकते. परंतु, मुस्लिम निर्वासितांना याची अपेक्षा करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...