आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Dainik Bhaskar Ground Report From Hathras: 135 CRPF Personnel Are Deployed In The Security Of 9 People Of The Victim's Family, Both Brothers Have Lost Their Jobs

हाथरस सामूहिक बलात्काराला एक वर्ष पूर्ण:पीडित कुटुंबातील 9 सदस्यांच्या सुरक्षेसाठी CRPF चे 135 जवान तैनात; कोणत्याही सदस्याला सुरक्षेशिवाय घराबाहेर निघण्याची परवानगी नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावातील लोकांच्या दृष्टीने आरोपी निर्दोष आहेत.

हाथरस सामूहिक बलात्काराला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी यूपी पोलिसांनी पीडितेचे पार्थिव कुटुंबाच्या संमतीशिवाय जाळले होते. या घटनेनंतर देशभरात निदर्शने झाली. देश-विदेशातील माध्यमांनी या घटनेचे वृत्तांकन केले होते. दैनिक भास्करच्या पत्रकार पूनम कौशल यांनी राजधानी दिल्लीपासून सुमारे 200 किमी अंतरावर पीडितेच्या गावी पोहोचून या घटनेचे वृत्तांकन केले होते. आता एक वर्षानंतर त्यांनी पुन्हा या गावाला भेट दिली. पीडितेच्या कुटुंबाशी आणि गावातील लोकांशी त्यांनी बातचीत केली. एक वर्षानंतर पीडित कुटुंब कसे जगत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वाचा हा खास ग्राउंड रिपोर्ट ...

मृत तरुणीचे कुटुंबीय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहे. दरवाजावर मेटल डिटेक्टर बसवले आहेत, 100 पेक्षा जास्त सीआरपीएफ जवान तैनात आहेत. ही प्रचंड व्यवस्था बघून हे एखाद्या व्हीआयपीचे घर असावे असे वाटते, पण पुढच्याच क्षणी तुमचा हा भ्रम तुटतो. येथे शेण, चिखल आणि घाण सर्वत्र पसरली आहे. पावसामुळे येथे पाणी तुंबले आहे, मेटल डिटेक्टर पार करत एका चिखलमय रस्त्यावरून मी पीडितेच्या घरात प्रवेश करते. तेव्हा एक सीआरपीएफ जवान विनवणीच्या स्वरात म्हणतो, 'मॅडम, शक्य असल्यास या घाणीबद्दलही लिहा, इतकी दुर्गंधी येते की इथे उभे राहणेही आम्हाला शक्य नसते.'

हे चित्र पीडितेच्या घराबाहेरचे आहे. पावसाच्या पाण्यामुळे येथे प्रचंड चिखल आणि घाण पसरली आहे. कुटुंबाला या घाणीतच राहावे लागत आहे.
हे चित्र पीडितेच्या घराबाहेरचे आहे. पावसाच्या पाण्यामुळे येथे प्रचंड चिखल आणि घाण पसरली आहे. कुटुंबाला या घाणीतच राहावे लागत आहे.

या गावात फक्त 4 घरे दलितांची आहेत. जिथे या दलित कुटुंबांची घरे आहेत, तो गावाचा अस्पृश्य कोपरा आहे. संपूर्ण गावात पक्का रस्ता आहे, पण तो इथे नाही. संपूर्ण गावाची घाण येथे फेकली जाते. या कुटुंबांना या घाणीत राहण्याची सवय आहे. सीआरपीएफ जवान म्हणतात, 'आम्ही एका वर्षापासून या घाणीत राहत आहोत. लोकांनी येथे कचरा टाकणे बंद केले नाही किंवा कोणीही त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही.'

पीडितेचा भाऊ म्हणतो, 'उच्च जातीचे लोक आम्हाला कचरा समजतात. त्यामुळेच आपल्या घरांभोवती कचरा आहे. सामूहिक बलात्काराची घटना आणि पीडितेच्या मृत्यूनंतर, जिल्ह्यातील उच्च सरकारी अधिकारी, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटी झाल्या, परंतु ही घाण स्वच्छ करण्याचा कोणी विचार केला नाही.'

या गावात आमच्यासाठी भेदभावाशिवाय काहीच नाही

पीडितेची आई सांगते की, काही दिवसांपूर्वी जेव्हा पाऊस पडत होता आणि गल्लीतून बाहेर पडणे कठीण झाले होते. तेव्हा सीआरपीएफचे काही जवान कथित उच्च जातीच्या लोकांच्या घराच्या छताखालून बाहेर गेले. त्यावेळी त्या घरातील स्त्रियांनी त्या अस्पृश्यांच्या घरातून का बाहेर आलात, असा टोमणा मारला होता. यानंतरच सीआरपीएफच्या जवानांनी येथे पक्का रस्ता बांधण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पीडित कुटुंबाच्या दारापर्यंत रस्ता बांधण्याचे काम केले जात आहे, परंतु पीडित कुटुंब या नवीन रस्त्याबद्दल फारसे उत्साहित नाहीत.

पीडितेच्या आईने सांगितल्यानुसार, गावातील उच्च जातीचे लोक आमच्याशी भेदभाव करतात. ते आम्हाला अस्पृश्य म्हणतात आणि आमची चेष्टा करत राहतात.
पीडितेच्या आईने सांगितल्यानुसार, गावातील उच्च जातीचे लोक आमच्याशी भेदभाव करतात. ते आम्हाला अस्पृश्य म्हणतात आणि आमची चेष्टा करत राहतात.

मृत तरुणीची वहिनी म्हणते, 'आजही येथे नाले नाहीत. भांडी धुतल्यानंतर, आम्ही खड्ड्यातील पाणी गोळा करतो आणि नंतर ते बादलीत भरून बाहेर फेकतो. या गावात आमच्यासाठी कधीच काही नव्हते. केवळ भेदभावच होता आणि आजही आहे.'

ती पुढे म्हणते, 'आता रस्त्याचे काम सुरु आहे. आम्हाला आनंद झाला पाहिजे की, आमच्या दारासमोर रस्ता येत आहे, पण आम्हाला आता काही फरक पडत नाही. आम्ही आता फक्त या गावात आपले दिवस मोजत आहोत. न्यायालयातून निकाल येताच आम्ही येथून निघून जाऊ. हे गाव आमच्यासाठी नरक आहे. आमच्यासाठी येथे काहीही बदलणार नाही.'

पीडित कुटुंबाला सीआरपीएफचे संरक्षण
सीआरपीएफची 135 जवानांची एक तुकडी पीडित कुटुंबाच्या संरक्षणासाठी तैनात आहे. कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्यांना तपासणीनंतर मेटल डिटेक्टरमधून जावे लागते. याठिकाणी जवान नेहमी सज्ज दिसतात. संरक्षणासाठीच्या प्रोटोकॉलमुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सुरक्षेशिवाय घराबाहेर निघण्याची परवानगी नाही. हे जवान तीन शिफ्टमध्ये घराची सुरक्षा करतात. सशस्त्र सैनिक घराच्या छतावर, दरवाजावर आणि बाहेर नेहमीच तैनात असतात. सुरक्षिततेच्या प्रश्नावर मृत तरुणीची वहिनी म्हणते, 'आम्हाला अजूनही धोका आहे. जेव्हा मी माझ्या तीन मुलींना पाहतो तेव्हा मला हे संरक्षण आवश्यक वाटते. हे लोक आहेत, म्हणून आम्ही येथे आहोत, अन्यथा आम्ही येथून निघून गेलो असतो.'

पीडित कुटुंबातील कोणताही सदस्य एकटा घराबाहेर जाऊ शकत नाही. गावातील दुकानात कोणी गेले तरी जवान त्यांच्यासोबतच राहतात. मृत तरुणीचा लहान भाऊ म्हणतो, 'सुरक्षेमुळे मला नोकरी सोडावी लागली. मी संपूर्ण वेळ घरातच राहतो. मी कोणत्याही मित्रांना भेटू शकत नाही किंवा मी घराबाहेर जाऊ शकत नाही.'

ही प्रचंड सुरक्षा व्यवस्था पाहून प्रश्न मनात येतो की, एका कुटुंबाच्या सुरक्षेत एवढ्या मोठ्या संख्येने जवान का तैनात केले जातात, पण गावातील लोकांशी बोलल्यानंतर याचे उत्तर सापडते. संपूर्ण गाव पीडित कुटुंबाच्या विरोधात दिसत आहे. गावातील लोकांना असे वाटते की, पीडित कुटुंब खोटे किस्से रचून सरकारी पैशांवर मजा करत आहे.

गावातील कोणीही आमची विचारपूस केली नाही

पीडितेचे वडील म्हणतात, “गावातील उच्चवर्णीय लोकांशी आमचे संबंध पुर्वीपासूनच बरोबरीचे नव्हते. या घटनेनंतर बाहेरचे बरेच लोक आमच्या घरी आले, पण गावातील लोक आले नाहीत. कुणी साधी विचारपूसदेखील केली नाही. याचे कारण जात आहे. "जरी आम्ही या लोकांना स्पर्श जेरी केला तरी आम्हाला अंघोळ करावी लागेल आणि गंगाजल शिंपडावे लागेल," असे ठाकूर जातीतील एक गावकरी सांगतो. दुसरीकडे, पीडितेचा धाकटा भाऊ म्हणतो, 'गावातील लोकांचे आमच्या घरी येणेजाणे पूर्वीच मर्यादित होते. या घटनेनंतर ते पूर्णपणे बंद झाले आले. आम्ही संपूर्ण कुटुंब या दोन खोल्यांच्या घरात राहतो.'

पीडितेची वहिनी या घटनेनंतर खूप खंबीरपणे उभी राहिली. घटनेच्या काही दिवसांपूर्वीच पीडितेच्या वहिनीने तिसऱ्या मुलीला जन्म दिला होता. ती आता एका वर्षाची झाली असून, चालायला लागली आहे. "ती असती तर हिच्या जन्माने किती आनंदी झाली असती. तिने हिला मांडीवर खेळवले असते." असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित केले. तो काळ आठवल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रूदेखील आले.

पीडितेचे कुटुंब दोन खोल्यांच्या घरात राहते. स्वयंपाकघराचीही सोय नाही. एक वर्षापासून घरातील एकही सदस्य कमावण्यासाठी बाहेर गेला नाही.
पीडितेचे कुटुंब दोन खोल्यांच्या घरात राहते. स्वयंपाकघराचीही सोय नाही. एक वर्षापासून घरातील एकही सदस्य कमावण्यासाठी बाहेर गेला नाही.

पीडितेची वहिनी निर्भिडपणे म्हणाली, 'ज्या दिवशी तिचे मृत शरीर जबरदस्तीने जाळण्यात आले त्याच दिवशी आमची भीती संपली. त्यापेक्षा वाईट आमचे काय होईल? सर्वात वाईट घडून गेले आहे. आता घाबरण्यासारखे काहीच उरले नाही. आता आम्हाला फक्त न्यायासाठी लढायचे आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. आपले हात दाखवताना ती म्हणते, 'जेव्हापासून दीदी गेली तेव्हापासून मी माझ्या हातावर मेहंदी लावली नाही, नटले नाही. तीच मला तयार करायची.'

25 लाख रुपयांची मदत मिळाली, नोकरी आणि घराच्या प्रतीक्षेत
या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. गेल्या एक वर्षापासून, पीडित कुटुंब या पैशातून घरखर्च चालवत आहे, घरातील सदस्यांपैकी कुणीही काम करु शकत नाहीये. दोन्ही भावांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सरकारने कुटुंबाला सरकारी घर आणि भावाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, जे अद्याप पूर्ण झालेले नाही." सरकारने त्यावेळी 25 लाखांची आर्थिक मदत केली होती. त्यावरच आमचा खर्च भागत आहे. पण नोकरी आणि घर देण्याचे वचन अद्याप पूर्ण झालेले नाही. या दिशेने काही कामही झालेले नाही," असे मृत तरुणीच्या भावाने म्हटले.

आरोपीचे कुटुंबीय मीडियावर नाराज आहेत
गावातील ब-याच लोकांनी पीडितेच्या कुटुंबाबद्दल तिरकसपणे म्हटले की, 'सरकारी पैशांवर ते खूप मजा करत आहेत'. बरेच लोक कोणताही संकोच न करता जातीसूचक शब्दांचा वापर करतात. तर काही लोक ठामपणे सांगतात की, मुख्य आरोपी संदीपच असू शकतो, तर रामू, रवी आणि लवकुश निर्दोष आहेत.

पीडित कुटुंबाची सुरक्षा कडक आहे. आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीआरपीएफचे जवान तीन शिफ्टमध्ये आपली ड्युटी देतात.
पीडित कुटुंबाची सुरक्षा कडक आहे. आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीआरपीएफचे जवान तीन शिफ्टमध्ये आपली ड्युटी देतात.

जेव्हा मी एका आरोपीच्या घरात शिरले, तेव्हा मला थांबवले गेले. आरोपीचे वडील चिडून म्हणाले, 'आता तू इथे कशासाठी आली आहेस? एक वर्ष झाले, माध्यमांनी या गावात येणे थांबवले नाही. जर मीडिया मागे नसता तर आमची मुलं तुरुंगात नव्हे तर घरीच असती. ते म्हणाले, “मीडिया हेच न्यायालय झाले आहे. भारताची माध्यमे हाय-हाय करत, उलट्या बातम्या छापून न्यायालयाची दिशाभूल करत आहेत. मीडिया काहीही होऊ देणार नाही. संपूर्ण देशात हेच एकमेव प्रकरण आहे का? यामागे का लागला आहात?

गावातील लोकांच्या दृष्टीने आरोपी निर्दोष आहेत.

सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना चार आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचे आरोप निश्चित केले होते. या प्रकरणाची सुनावणी हाथरसच्याच एससी-एसटी न्यायालयात सुरू आहे. शेवटची सुनावणी 23 सप्टेंबर रोजी होती आणि आता पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी आहे. पीडितेच्या मोठ्या भावाच्या म्हणण्यानुसार, सध्या त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याच्या आईचे म्हणणे पुढील सुनावणीत नोंदवले जाईल. त्यानंतर साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाईल. पीडितेच्या कुटुंबाला आशा आहे की, आरोपीला न्यायालय दोषी ठरवेल. त्याचवेळी, गावातील लोक म्हणतात की, न्यायालय काय निर्णय घेईल यामुळे फारसा फरक पडत नाही. ग्रामस्थांच्या दृष्टीने आरोपी निर्दोष आहेत.

बातम्या आणखी आहेत...