आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Dainik Bhaskar Interview : Taliban Executed Photojournalist Danish Siddiqui After Verifying His Identity

भास्कर एक्सक्लूझिव्ह:गोळीबारात जखमी दानिशला उपचारांसाठी मशिदीत नेण्यात आले, पण तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला करून त्यांचे डोके ठेचले: अमेरिकेचे संरक्षण तज्ज्ञ

पूनम कौशल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा ही खास मुलाखत...

अमेरिकन संरक्षण तज्ज्ञ, पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्र्यांचे माजी सल्लागार मायकल रुबिन यांनी दावा केला आहे की, तालिबानने भारताचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना जिवंत पकडल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केली. तत्पूर्वी, दैनिक भास्करसोबतच्या विशेष संभाषणात तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी दानिश यांच्या मृत्यूबद्दल माफी मागण्यास नकार देत म्हटले होते की, दानिश आमच्या परवानगीशिवाय युद्धक्षेत्रात आले होते आणि ते कोणाच्या गोळीने मारले गेले, हे आम्हाला माहित नाही.

दैनिक भास्करने रुबिन यांचा दावा तालिबान्यांसमोर ठेवला तेव्हा तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एका संदेशाद्वारे फक्त सांगितले की, 'ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या सत्य नाहीत. दानिश युद्धात मारले गेले.'

दैनिक भास्करशी झालेल्या बातचीतदरम्यान तालिबान्यांनी सांगितले होते की, ते संपूर्ण प्रकरण स्पष्ट करण्यासाठी दानिश सिद्दीकीशी संबंधित छायाचित्रे आम्हाला पाठवली जातील, परंतु अद्याप तालिबान्यांनी ही छायाचित्रे आमच्याकडे पाठवली नाहीत. जेव्हा आम्ही जबीउल्लाह मुजाहिद यांना आठवण करून दिली की त्यांनी छायाचित्रे पाठवण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते, तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पण अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे माजी सल्लागार मायकल रुबिन यांनी दावा केला आहे की, भारतीय आणि अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या काही छायाचित्रांवरुन दानिश यांना तालिबान्यांनी जिवंत पकडले आणि नंतर ठार केले, हे दिसून येते. हे संपूर्ण प्रकरण तपशीलवार समजून घेण्यासाठी दैनिक भास्करने मायकल रुबिन यांच्याशी खास बातचीत केली.

दानिश सिद्दीकी आपल्या फोटो जर्नालिझमसाठी जगात प्रसिद्ध होते. त्यांना पुलित्झर पारितोषिकही मिळाले होते. अफगाणिस्तानात कव्हरेज दरम्यान तालिबान्यांनी 16 जून रोजी त्यांची हत्या केली होती.
दानिश सिद्दीकी आपल्या फोटो जर्नालिझमसाठी जगात प्रसिद्ध होते. त्यांना पुलित्झर पारितोषिकही मिळाले होते. अफगाणिस्तानात कव्हरेज दरम्यान तालिबान्यांनी 16 जून रोजी त्यांची हत्या केली होती.
  • प्रश्न: तुम्ही दावा केला आहे की तालिबानने दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले. नंतर त्याची ओळख पटवली आणि ठार केले. आपण छायाचित्रांच्या आधारे असे म्हणत आहात की आपण अफगाणिस्तानात घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांशी बातचीत केली?

उत्तरः दानिश सिद्दीकी हे अफगाणिस्तानच्या सैन्यासमवेत होते, जे स्पिन बोल्दाकमध्ये तालिबानांवर हल्ला करायला निघाले होते. सीमा सुरक्षा चौकीजवळ या सैन्याच्या तुकडीवर तालिबान्यांनी हल्ला केला आणि ही टुकडी दोन भागात विभागली गेली. दानिश सिद्दीकी सोबत तीन अफगाण सैनिक होते, तर कमांडर आणि इतर सैनिक वेगळे झाले होते.

तालिबानच्या हल्ल्यात दानिश सिद्दीकी जखमी झाले. त्यांना छर्रे लागले होते. त्यांना स्थानिक मशिदीत उपचारासाठी नेण्यात आले. जेव्हा तालिबानला मशिदीत त्यांच्या उपस्थितीबद्दल कळले, तेव्हा मशिदीवर हल्ला करण्यात आला. स्थानिक अधिका-यांशी झालेल्या संभाषणाच्या आधारे मला हे समजले की दानिश मशिदीत होते, केवळ या कारणामुळे तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला केला होता.

दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले गेले आणि नंतर त्यांची ओळख पटवून तालिबान्यांनी त्यांना ठार केले. दानिशसोबत पकडलेल्या सैनिकांनाही ठार मारण्यात आले. भारतीय अधिका-यांनी मला उपलब्ध करुन दिलेल्या छायाचित्रांच्या आधारावर मी हा दावा करीत आहे. मी अफगाणिस्तानमध्ये या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिका-यांशीदेखील बातचीत केली आणि या घटनाक्रमाची पुष्टी केली आहे. तालिबानने दानिश सिद्दीकीवर असंख्य गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यांचे डोके ठेचले होते.

माझ्या माहितीनुसार, ही छायाचित्रे इतर कोणीही पाहिली नाहीत आणि ती सार्वजनिक केली गेली नाहीत. मी देखील ही छायाचित्रे इतर कुणासोबतही शेअर करणार नाही, या अटीवर मला ती बघता आली.

  • प्रश्न: तालिबान दानिशला ठार मारल्याचे नाकारत आहे असे तुम्हाला का वाटते?

उत्तर: सत्य बोलण्यात तालिबानचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. सप्टेंबर 2011 च्या हल्ल्यापूर्वी तालिबान खोटे बोलला होता. तेव्हा त्याने सांगितले होते की, सर्व दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे बंद केली गेली. बिन लादेनबाबतही तालिबानने खोटे सांगितले होते.

तालिबानने 29 फेब्रुवारी 2020 रोजी अमेरिकेशी करार केल्यानंतरही अल कायदाशी संबंध तोडले असल्याचे खोटे सांगितले होते. तालिबान वारंवार खोटे बोलत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये ज्याप्रकारे दानिश यांच्या मृत्यूची बातमी प्रकाशित झाली, कदाचित तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या मोहिमेने काय केले याबद्दल आता लाज वाटत असावी, परंतु त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवता येणार नाही.

  • प्रश्न: तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर कब्जा केल्याबद्दल तुमचे काय मत आहे? तालिबान पुर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली झाला आहे का?

उत्तरः यासाठी बरेच लोक जबाबदार आहेत, परंतु ट्रम्प आणि बायडेन प्रशासनाने केलेल्या कृतीची मला लाज वाटते. अफगाणिस्तानातून परतण्याचा निर्णय राजकीय आहे. मुळ सत्यता पडताळून न पाहता वॉशिंग्टनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. हे ठीक आहे असे जरी म्हटले तरी अफगाणिस्तानातून परतण्याचा आमचा हेतू होता तर मग गोंधळलेला शांतता करार का स्वीकारला गेला, जो अफगाणिस्तानच्या निवडलेल्या सरकारला कमजोर करतो.

खरं तर अफगाणिस्तानातून बाहेर पडताना अमेरिकेने काबुल सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. याला फक्त आपणच जबाबदार नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील अफगाणिस्तान समस्येचे सलोख्याचे विशेष दूत जलमे खलीलजाद या कथेत खलनायक आहेत.

त्यांनी वारंवार अप्रामाणिकपणा दाखवला. अफगाणिस्तान सरकारने त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवला नाही. अफगाण सरकारने त्यांना अशा व्यक्तीच्या रुपात पाहिले, ज्याची दुहेरी महत्वाकांक्षा आहे आणि ज्याचा विशेष दूत म्हणून त्याच्या भूमिकेशी काही संबंध नाही, परंतु प्रश्न असा आहे की भारत यात कोठे होता?

खलीलजाद यांनी कित्येक महिने भारत सरकारला जाणीवपूर्वक तालिबानसोबतच्या आपल्या शांतता प्रस्ताव आणि बातचीतपासून दूर ठेवले. आणि हेदेखील तेव्हा जेव्हा त्याच्या थेट परिणाम सुरक्षेवर होणार होता. शेवटी परराष्ट्र मंत्रालयाला मध्यस्थी करावी लागली, पण ते खूप उशिरा बोलले. हे सर्व सांगितल्यानंतर, एक तथ्य देखील आहे की, आता तालिबानची एक एजन्सी आहे. तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. आणि आता त्यांच्याकडे वेग आहे, अफगाणिस्तानात वेग नेहमीच मुख्य असतो.

  • प्रश्नः अफगाणिस्तानाशी भारताचे हितसंबंध आहेत, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यास भारत आपल्या हितसंबंधांचे संरक्षण करु शकेल असे तुम्हाला वाटते का?

उत्तर: भारत आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. परंतु तालिबानच्या उदयाने भारताला सामरिक तोट्यात टाकले आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानकडे सामरिक शक्ती म्हणून पाहतो. अफगाणिस्तान सहजपणे भारतविरोधी दहशतवादी कारवायांचे अड्डे बनू शकतो. 9/11 च्या आधी अफगाणिस्तानमध्ये हरक-उल-मुजाहिदीन सारख्या संघटनांचे अड्डे होते. चाबहार बंदरातून संभाव्यपणे प्रवेश करता येणार्‍या पश्चिम अफगाणिस्तानातील काही भाग तालिबान त्यांच्या ताब्यात ठेवण्यास सक्षम असतील की नाही हा मोठा प्रश्न आहे.

  • प्रश्न: अमेरिका आणि भारत सरकारने दानिश सिद्दीकीच्या मृत्यूबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, असे तुम्हाला वाटते का?

उत्तर: मी भारताबद्दल काहीही सांगू शकत नाही, पण अमेरिका नेहमीच स्वतःचे हित पाहते. विशेषत: आता अमेरिकेला आपल्या राजकीय निर्णयाच्या परिणामांकडे दुर्लक्ष करायचे आहे. आपण अशा एका कल्पनारम्य जगात जगत आहोत, जिथे तालिबान जे करत आहे, त्या सत्याकडे आपण पाठ फिरवित आहोत.

बातम्या आणखी आहेत...