आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Data Mafia |Your Credit Card Is Also Unsecured, Aadhar Card And PAN Card Data Can Be Sold For Only 6 Paise

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक !:तुमचे क्रेडिट कार्डही असुरक्षित, आधार कार्ड व पॅन कार्डच्या डाटाची फक्त ६ पैशांत विक्री

सुरत (गौरव तिवारी)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘भास्कर'ने 15 दिवस प्रयत्न करून डाटा माफियाकडून एक लाख लोकांची माहिती केली गोळा
  • डाटा माफिया विकतात तुमची प्रत्येक संवेदनशील माहिती
  • कोणताही डीलर थेट डील करत नाही, विकणाऱ्यांचा वेगळा प्लॅटफाॅर्म

माझा फोन लॉक ठेवतो, माझा संगणक सुरक्षित आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. तुमची लहानसहान सगळी माहिती बाजारात उपलब्ध आहे. तीसुद्धा जनरल स्टोअरमधील किराणा सामान विकत घेण्यापेक्षाही खूप सोपी. तुमचे नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल, घरचा पत्ता, फ्लॅट क्रमांक, कॉलनीचे नाव फक्त ६ पैशांत विकले जाते.

दैनिक भास्करने एक स्टिंग ऑपरेशन केले. याद्वारे तुमची खासगी व गोपनीय बातमी कशा प्रकारे उपलब्ध आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. १६ दिवस सुरू असलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये रिपोर्टरने इंटरनेटच्या गुन्हेगारी जगताशी संपर्क साधला. तुमचा डाटा फेसबुक व टि्वटरसारख्या कंपन्यांपेक्षाही तुमच्या शहरातील संस्था विकत आहेत. यामध्ये बँकेचे फिजिकल व्हेरिफिकेशन करणारे एजंट्स सर्वाधिक सक्रिय असतात. नगरपालिका, वाहतूक कार्यालये, बिल्डर्स, मोबाइल विक्रेते व सिम देण्यापूर्वी व्हेरिफिकेशन करणारे एजंट्सही तुमची माहिती विकत आहेत.

‘भास्कर’कडे ५५० पेक्षाही जास्त पेज, एक लाख लोकांचा डाटा

दैनिक भास्कर टीमने स्टिंग ऑपरेशनमध्ये गुजरात व विविध शहरातील सुमारे ५५० पेजचा डाटा विकत घेतला. तुमची डाटा घेण्याची क्षमता किती यावर ते ठरते. तुमच्या क्रेडिट कार्डचा डाटा विकला जातो. फक्त किंमत बिटकॉइनने द्यावी लागेल. J-stashbazar.com, Bigfat.cc, Cc-shop.su आणि Cardsdumps.com वेबसाइटवर भारतातील ग्राहकांच्या क्रेडिट कार्डाची इतकी डिटेल माहिती उपलब्ध तेवढी देशातील कोणत्याही बँकेकडे उपलब्ध नसेल. क्रेडिट कार्ड क्रमांक, ग्राहकाचे नाव, कोणते कार्ड आहे(व्हिसा, मास्टर कार्ड अथवा मेस्ट्रो)कार्डाची एक्स्पायरी डेट व जास्त पैसे दिल्यास सीव्हीव्ही क्रमांकही देण्यात आला. यासाठी किंमत थाेडी जास्त आहे. ७० डॉलर म्हणजे ५ हजार रुपयांत तुम्हाला तीन बँकांपैकी कोणत्याही एका बँकेतील चार कार्डाचे डिटेल्स मिळतात.

नोकरी, पगाराची माहिती माफियाकडे उपलब्ध

तुमचा मोबाइल क्रमांक, नाव, घराचा पत्ता, जन्म तारीख, कोणत्या कंपनीत कोणत्या पदावर काम करता, तुमच्या संस्थेची सगळी माहिती, बँकेच्या खात्याची माहिती डाटा माफियाकडे असते. भारतात डाटा संरक्षण कायदा आहे. तुमच्या डाटाचा वापर करणारी संस्था तुमच्या परवानगीनेच ती गोळा करू शकते, अशी तरतूद आहे. परंतु ती माहिती कोणालाही विकता येत नाही अथवा देताही येत नाही, अशी कायद्यात तरतूद आहे.

व्हॉट्सअॅपवर १०० लोकांचा डाटा देतात सॅम्पल

डेटा माफिया थेट कोणालाही माहिती विकत नाहीत. विकणाऱ्यांचा वेगळा प्लॅटफाॅर्म असतो. हे लोक ई-मेल, वेब, फोन कॉल अथवा व्हॉट्सअॅपवर डील करतात. १००-१५० लोकांचा डाटा सॅम्पल म्हणून देतात. नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता व ओळखपत्र ही माहिती फक्त ५ पैशांत मिळते. तर क्रेडिट कार्डाचा डाटा एका व्यक्तीचा ३५ डाॅलरमध्ये (सुमारे २६०० रुपयात)विकला जातो. विकत घेणाऱ्यास ३ क्रेडिट कार्डांचा डाटा घ्यावा लागतो.

आधार व पॅन कार्डचाही डाटा मिळतो बाजारात

दैनिक भास्करकडे असलेला डाटा इतका संवेदनशील आहे की, यामुळे तुमचे बँकेचे खाते रिकामे होऊ शकते. क्रेडिट कार्ड, बँक खात्याशिवाय लोकांचे आधार व पॅनचाही डाटा बाजारात सहज मिळतो. आयटी एक्स्पर्टच्या मते, या माहितीद्वारे हॅकर्स तुमच्या बँक खात्याला सुरुंग लावू शकतात. मागील काळापासून बँक खात्यातील आॅनलाइन फसवणुकीची प्रकरणे याच डाटा चोरीमुळे होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...