आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Db Original Explainer Divyamarathi Coronavirus Vaccine Tracker: Latest Coronavirus Vaccine India China Russia USA UK News And Updates | Trump Says Vaccine Will Be Available In October Dr Reddy's Laboratories Zydus Cadilla Healthcare

कोविड-19 व्हॅक्सीन ट्रॅकर:रशियन व्हॅक्सीनची डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनंतर आता कॅडिला हेल्थकेअरसोबत चर्चा, जाणून घ्या भारतात कधी मिळेल लस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियन मंत्रीचा दावा- 14% रुग्णांमध्ये दिसले साइड इफेक्ट्स, वेदना आणि अशक्तपणा जाणवला
  • पुढील महिन्यात लस उपलब्ध होईल- ट्रम्प; शास्त्रज्ञ, कंपन्या आणि अधिकारी ट्रम्प यांच्या मताशी असहमत

भारतातील फार्मास्यूटिकल्स कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डीआरएल) ने 16 सप्टेंबरला घोषणा केली की, कोविड-19 ला रोखण्यासाठी रशियात तयार झालेली आणि मंजूरी मिळालेल्या SPUTNIK V चे 10 कोटींपेक्षा जास्त डोज भारतात तयार केले जातील. यापूर्वी आवश्यक असलेले रेगुलेटरी क्लीयरेंस घेऊन फेज-3 चे ह्यूमन ट्रायल्स सुरू केले जातील. परवानगी मिळाल्यानंतर आता ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेकाच्या कोवीशील्डसोबतच SPUTNIK V च्या शेवटच्या फेजचे ट्रायल्सदेखील भारतात सुरू होतील. पण, आता अशी माहिती समोर आली आहे की, डॉ. रेड्डीजसोबतच गुजराती कंपनी कॅडिला हेल्थकेअरदेखील रशियन कंपनीसोबत चर्चा करत आहे. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, कोरोना व्हायरसपासून आपल्याला कधी सुटका मिळे आणि याची लस कधी भारतात तयार होईल ?

...तर मग रशियन व्हॅक्सीन आपल्याला कोविड-19 पासून वाचवेल ?

डॉ. रेड्डीजने रशियन व्हॅख्सीन SPUTNIK V साठी रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडसोबत डील केली आहे. यासोबतच लवकरात लवकर ते याच्या फेज-3 ट्रायल्ससाठी अर्ज करणार आहेत. त्यामुळे ही व्हॅक्सीन आपल्याला कधी मिळेल, हे सांगणे अद्याप अवघड आहे.

सध्या ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेकाच्या कोवीशील्डचेही फेज-2 आणि फेज-3 ट्रायल्स भारतात सुरू आहेत. या व्हॅक्सीनचे सुरुवाती परिणाम एक-दोन महिन्यात कळू शकतात. त्या आधारेच भारतीय ड्रग रेगुलेटर एखादा निर्णय घेईल. या वर्षीच्या अखेरपर्यंत निर्णय होऊ शकतो.

अशी माहिती आहे की, रशियन संघटना आरडीआयएफ कमीत कमी चार भारतीय ड्रग मेकरशी करार करू इच्छिते. डॉ. रेड्डीजनंतर त्यांची चर्चा अहमदाबादच्या जायडस कॅडिलासोबतही होत आहे. यामागे व्हॅक्सीनचे उत्पाहन वाढवण्याचा उद्देश आहे. गुजरातच्या कंपनीची चर्चा अॅडव्हान्स स्टेजवर असल्याची माहिती आहे.

या डील्स आणि बातम्यांचा अर्थ हा आहे की, रशियन व्हॅक्सीनचे उत्पाहन भारतात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आयसीएमआरने यापूर्वीच संकेत दिले आहे की, हाय-रिस्क ग्रुप्स आणि फ्रंटलाइन वर्कर्ससाठी लवकर व्हॅक्सीनला अप्रुव्हल दिले जाईल. व्हॅक्सीन कधी उपलब्ध होईल, हे व्हॅक्सीनच्या अप्रुव्हलवर अवलंबून आहे.

आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी संसदेत म्हटले आहे की, सर्व पर्याय भारतासाठी खुले आहेत. भारतात पुढील वर्षाच्या सुरुवातीला व्हॅक्सीन उपलब्ध होईल. एक्सपर्ट ग्रुपने डिस्ट्रीब्यूशनसाठी अॅडव्हान्स प्लॅनिंग केली आहे.

रशियन व्हॅक्सीनवर विश्वास ठेवता येईल का ?

जोपर्यंत रशियन व्हॅक्सीनच्या फेज-3 च्या चाचण्यांचा डेटा समोर येत नाही, तोपर्यंत याबाबत काहीच सांगणे योग्य नाही. ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेकाला आतापर्यंत सुरक्षित म्हटले जात आहे. परंतू, ब्रिटेनमध्ये एका महिलेची तब्येत खराब झाल्यामुळे या व्हॅक्सीनवरही संशयाने पाहिले जात आहे.

रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी सांगितले की, रशियामध्ये दर सातपैकी एका रुग्णामध्ये म्हणजेच 14% कोविड व्हॅक्सीन वॉलेंटियरमध्ये साइड इफेक्ट्स दिसले आहेत. त्यांना अशक्तपणा आणि मसल पेन सुरू झाले आहेत.

लँसेटमध्ये प्रकाशित प्राथमिक माहितीनुसार, व्हॅक्सीनचे काही सकारात्मक प्रभावही आहेत. सर्वात जास्त 58% वॉलेंटियरने इंजेक्शन साइटवर वेदना, 50% नी ताप, 28% नी अशक्तपणा आणि 24% नी मसल पेनची समस्या सांगितली आहे.

ट्रम्प म्हणाले- ऑक्टोबरपर्यंत व्हॅक्सीन उपलब्ध होईल

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेत ऑक्टोबरपर्यंत व्हॅक्सीन उपलब्ध होईल. 2020 च्या अखेरपर्यंत 10 कोटी डोज डिस्ट्रिब्यूट केले जातील. यासाठी ड्रग रेगुलेटरच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहणे आहे. तसेच, डेमोक्रेट्सचा आरोप आहे की, ट्रम्प ड्रग रेगुलेटरवर दबाव टाकत आहेत.

डब्ल्यूएचओ व्हॅक्सीन लँडस्केप काय सांगतो...

  • 182 व्हॅक्सीनवर जगभरात काम सुरू आहे.
  • 36 व्हॅक्सीन क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत.
  • 9 व्हॅक्सीन फेज-3 म्हणजेच अखेरच्या ट्रायलमध्ये आहेत. यातील चार व्हॅक्सीन चीनमध्ये आहेत.
  • 146 व्हॅक्सीन प्री-क्लिनिकल ट्रायल्सच्या फेजमध्ये आहेत.

(नोटः 17 सप्टेंबरपर्यंतचा अपडेट)