आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी Zomato डिलिव्हरी बॉय आहे. 31 डिसेंबरच्या रात्रीचे सुमारे 2 वाजले असतील, मी कांझावाला रस्त्यावरून येत होतो, मला अग्रसेन रस्त्याकडे पार्सल पोहोचवायचे होते. तेवढ्यात पोलिस चौकी पाहून एक गाडी वेगाने मागे वळली. माझी दुचाकी त्या कारला धडकण्यापासून वाचली.
मला गाडीखाली मुलीचे डोके दिसले, तिचे संपूर्ण शरीर गाडीखाली ओढले जात होते. मी घाबरलो. मी पोलिसांना सांगितल्यावर ते म्हणाले- 'जा तुझे काम कर.'
कांझावाला घटनेच्या प्रत्यक्षदर्शींमध्ये विकास मेहरा व्यतिरिक्त एक दूध विक्रेता देखील आहे, ज्याने पूजा (नाव बदलले आहे) हिला गाडीखाली ओढताना पाहिले. विकास सांगतो- 'ती गाडी मलाही धडकणार होती. गाडी माझ्या मागे होती आणि वेगाने ती मला मागे टाकून पुढे निघून गेली.
गाडीत म्युझिक वाजत नव्हते, मुलगी खाली आहे, त्यांना का कळले नाही
विकास पुढे सांगतो- 'मुलगी गाडीखाली कशी अडकली हे मला समजले नाही. अपघातानंतरही कोणी गाडीत अडकले तर तो काही वेळात बाहेर पडतो, पण ती काशी अडकली, हे समजत नाही. एखादी दोरही नव्हती, ज्यामुळे मुलीला बांधले गेले असेल.
कारमधील ड्रायव्हर सीटच्या बाजूला असलेली काच अर्धी उघडी होती आणि कारमध्ये म्युझिक वाजत नव्हते. मग, त्यांना कसे कळले नाही, मुलगी गाडीखाली आहे.
पोलिसांना सांगावे असे वाटले. पोलिस चौकीत गेलो असता तेथे एकही पोलिस कर्मचारी नव्हता. यानंतर दोन पोलिस सेक्टर-24 च्या दिशेने दुचाकीवरून गस्त घालताना दिसले. मी त्यांना संपूर्ण घटना आणि प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. ते मला म्हणाले, ‘तुझे तो ना लगी ना, तो जा यहां से। हम देख लेवेंगे, जा अपना काम कर।’
माझे कुटुंब घाबरलेले आहे, त्यांना माझी काळजी वाटतेय
विकासने सांगितले- '1 जानेवारीला संध्याकाळी मला मित्रांनी सांगितले की, दिल्लीत एक अपघात झाला आहे. मी म्हणालो की, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. यानंतर मी स्वतः पोलिसांकडे जाऊन सर्व प्रकार सांगितला.
मात्र, विकासचे वडील रोहतास वेगळीच घटना सांगतात. पोलिसांनी त्यांना मीडियाशी न बोलण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केसबद्दल कोणाला काही सांगू नका. विकासला हे विचारल्यावर तो म्हणतो- 'पापा माझ्या सुरक्षेची काळजी करतात. मला कोर्टातही साक्ष द्यावी लागेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पीडितेची आई म्हणाली - आमच्याकडे अंतिम संस्कारासाठीही पैसे नाहीत
'ती 31 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडली. घरात ती एकटीच कमावते, मी तिला भाजी आणायला सांगितली होती. मग रात्री 8 च्या सुमारास माझे पुन्हा बोलणे झाले, मी विचारले होते की, तू कधी येणार आहेस? तर ती म्हणाली की आता काम आहे, परत यायला पहाटे 4 वाजतील. त्यानंतर तिच्या अपघाताची बातमी मिळाली. अंत्यसंस्कार व्यवस्थित पार पाडण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसेही नाहीत.
एका आईची ही कथा आहे जिच्या मुलीला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी दिल्लीच्या रस्त्यावर 12 किलोमीटर तुडवले गेले. बराच वेळ विरोध झाल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईला बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांना घरी सोडण्यासाठी पोलिसांचे वाहन पोहोचले.
'पोलिसांनी मला तासनतास फिरवलं, माझ्या मुलीचा चेहराही दाखवला नाही'
पूजाची आई सांगते- '1 तारखेला सकाळी 8 च्या सुमारास पोलिसांनी मला फोन केला आणि तुमची स्कूटी कुठे आहे असे विचारले, नंतर सांगितले की, तिचा अपघात झाला आहे, तुम्ही या. यानंतर कांजावाला येथे घेऊन गेले फिरवत राहिले. त्यानंतर सुलतानपुरी पोलिस ठाण्यात आणून बसवले.
माझ्या मुलीचे काय झाले याबद्दल अनेक तास मला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मी एसएचओला माझ्या मुलीचा चेहरा दाखवण्यास सांगितले, पण ते काही बोलले नाही. पोलिस काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्यावर मी माझ्या भावाला फोन केला.
'मुलगी वेलकम गर्ल म्हणून काम करायची'
पीडितेच्या आईचे म्हणणे आहे की, मुलगी इव्हेंट्सच्या क्षेत्रात काम करायची. ती म्हणते- 'लग्नात स्वागतासाठी साडी नेसून उभ्या राहणाऱ्या मुलींसोबत ती काम करायची. एकावेळी 500-1000 रुपये मिळायचे. ती 2 वर्षांपासून हे काम करत होती. 8 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांची हत्या झाली होती. मोठ्या आणि लहान बहिणीचे लग्न झाले होते, पण मी लग्न करणार नाही असे ती म्हणायची.
पूर्वी मी जवळच्या शाळेत मावशीबाई म्हणून काम करायचे, पण कोरोनाच्या काळात माझी किडनी खराब झाली आणि आता दोन्ही किडनीमध्ये समस्या आहे. मी स्वतः काम करू शकत नाही. मला 6 मुले झाली, 2 मुलींची मोठ्या कष्टाने लग्न केली.
म्हणायची, आई मला निवडणूक लढवायची आहे, लोकांनाही ती आवडायची
पूजाची आई पुढे सांगते की, 'तिने 9वी नंतर अभ्यास सोडला होता आणि ती मेकअपचे काम शिकू लागली. तिला इन्स्टाग्रामवर रील बनवण्याची खूप आवड होती, अनेकवेळा ती लग्नात मेकअपचे कामही करायची.
पुढील नगरसेवकाची निवडणूक मीही लढवणार, असे ती आईला म्हणायची. आमच्या घरासमोरील नाली बांधली जात नव्हती, तर तिने फोन करून तक्रार केली आणि भांडण करून नाली बनवून घेतली. आजूबाजूचे लोक तिचा खूप आदर करायचे. मी नालीसाठी पुन्हा जाऊन अर्ज करणार असल्याची ती म्हणायची. दुरुस्त झाल्यावरच मी शांत बसेल.
वैद्यकीय तज्ज्ञ शवविच्छेदन करतील आणि मुलीवर बलात्कार झाल्याचा अहवाल आल्यास या प्रकरणात खून आणि बलात्काराची कलमे जोडली जातील, असे आश्वासन पोलिसांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
2 जानेवारी रोजी दिवसभर सुलतानपुरी पोलिस ठाण्यासमोर शेकडो लोक जमले होते. पोलिसांनी या प्रकरणात जाणूनबुजून हलगर्जीपणा केल्याचा आरोप मुलीचे कुटुंबीय आणि लोक करत आहेत.
त्याचवेळी दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांच्या पॅनेलने मुलीचे पोस्टमार्टम केले आहे. त्याचा अहवाल लवकरच येणे अपेक्षित आहे.
अपघातानंतर आरोपी पळून गेले, वाटेत मुलगी खाली अडकल्याचेही दिसले
एफआयआरनुसार, आरोपींना माहित होते की, त्यांनी स्कूटीला धडक दिली होती. यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी अमित आणि दीपक यांनी आपण दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. कृष्ण विहार परिसरात त्यांचा अपघात झाला होता. यामुळे ते घाबरले आणि ते कांजावालाकडे निघाले.
दीपक कार चालवत होता आणि मनोज मित्तल त्याच्या बाजूच्या सीटवर होता. मागच्या सीटवर मिथुन, कृष्णा आणि अमित बसले होते. कांजावाला रोडवर त्यांनी गाडी थांबवली. तिथे गाडीखाली एक स्कूटी असलेली मुलगी दिसली. यानंतर मुलगी सोडून सर्वजण त्यांचा मित्र आशुतोषच्या घरी गेले आणि गाडी पार्क करून आपापल्या घरी गेले.
आरोपींपैकी एक स्थानिक भाजप नेता
दिल्ली भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, मनोज मित्तल हे सुलतानपुरीतील पक्षाचे पदाधिकारी आहेत. चार दिवसांपूर्वीच त्यांना डाटा एन्ट्री सेलचे सह-संयोजक बनवण्यात आले होते.
सुलतानपुरी पोलिस स्टेशनच्या बाहेर मनोज मित्तल यांचे पोस्टरही चिकटवण्यात आले आहे. आरोपींवर कारवाईची मागणी करणाऱ्या लोकांनी सोमवारी सकाळी पोस्टर फाडले. पाच आरोपींच्या चौकशीसाठी रोहिणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणासंबधित आणखी बातम्या वाचा...
कारने मुलीला 12KM फरफटले, मृत्यू VIDEO:'आप' MLA म्हणाल्या- आरोपी भाजप कार्यकर्ता; कोर्टाने 5 आरोपींना 3 दिवसांची कोठडी सुनावली
एकीकडे नवीन वर्षाचे स्वागत सुरू असताना दिल्लीतील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील कांझावाला भागात 31 डिसेंबरच्या रात्री कारमधून आलेल्या काही तरुणांनी एका स्कूटीस्वार तरुणीला धडक दिली. अपघातानंतर तरुणांनी कारसह पळ काढण्यास सुरुवात केली. मुलगी गाडीखाली अडकली आणि सुमारे 12 किलोमीटर रस्त्यावर फरफटत राहीली. ती पूर्णपणे रक्तबंबाळ झाली होती. तर रस्त्यावर फरफटत गेल्याने तिचे कपडेही फाटले. रक्तबंबाळ झालेली मुलगी रस्त्यावर पडून तिचा मृत्यू झाला. पूर्ण बातमी वाचा..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.