आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना वेळेवर शवविच्छेदन, ना मेडिकल, पोलिस कुणाला वाचवताहेत?:कंझावला केसमध्ये सवाल! अंजलीसोबत OYO मध्ये कोण, मैत्रीण का लपली?

लेखक: वैभव पळनीटकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील कंझावाला प्रकरणात अंजलीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यानुसार बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. या अहवालानंतरही पोलिसांच्या कारवाईवर आणि कहाणीवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये अंजली आणि तिची मैत्रीण निधी एका OYO हॉटेलच्या बाहेर दिसत आहेत. दोन्ही मुली स्कूटी वरून निघत आहेत आणि जवळच तीन मुलं उभी आहेत, त्यापैकी एक अंजलीसोबत बोलतही आहे.

हे CCTV फुटेज हॉटेलच्या बाहेरचे आहे. अंजली तिच्या मैत्रीणीसोबत बाहेर येते. इथे दोघींत भांडण होते. गर्दी झाल्यानंतर दोघी स्कूटीवरून निघून जातात.
हे CCTV फुटेज हॉटेलच्या बाहेरचे आहे. अंजली तिच्या मैत्रीणीसोबत बाहेर येते. इथे दोघींत भांडण होते. गर्दी झाल्यानंतर दोघी स्कूटीवरून निघून जातात.

हे हॉटेल अंजलीच्या घरापासून अवघ्या 2.5 किलोमीटर अंतरावर सेक्टर-23 मधील बुध विहारमध्ये आहे. अंजलीच्या आईने दावा केला आहे की ती कामासाठी घरातून निघाली होती आणि ती पहाटे 4 वाजता उशिरा येईल असे तिने सांगितले होते. सकाळी 8 वाजता पोलिसांनी आईला फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यामुळे जर अंजली 4 वाजता घरी परतली नाही, तेव्हा आईने तिला फोन का केला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, अंजली तिच्या मैत्रिणीसोबत न्यू इयर पार्टीसाठी हॉटेलमध्ये गेल्याचे तपासात समोर आले आहे. हॉटेल मॅनेजरने पोलिसांना सांगितले आहे की मुलींचे मित्रांसोबत काही कारणावरून भांडण झाले होते, नंतर त्यांचे एकमेकींशीही भांडण झाले आणि नंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले.

अंजलीचे मित्र कोण होते, निधी कुठे गायब होती?

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, पोलिसांनी त्या रात्री हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या अंजलीच्या मित्रांचा शोध का घेतला नाही? सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, अंजलीच्या स्कूटीच्या पाठीमागे ही मुलेही बाईकवरून निघाली होती.

अपघातानंतर दुसरी मुलगी निधी का पळून गेली, तिने कोणाला काहीच का सांगितले नाही आणि समोरही का आली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अपघातानंतर ही मुलगी घरी कशी पोहोचली, तब्बल 60 तास पोलिसांना तिचा शोध का लागला नाही?

आता समोर आल्यावर निधी अंजली खूप नशेत असल्याचे सांगत आहे. हा केस कमकुवत करण्याचा डाव आहे का? स्कूटीवरून परतण्यापूर्वीच रस्त्यात दोघींमध्ये भांडण झाल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

निधीने सांगितले की, 'धडक लागल्यानंतर अंजलीचा पाय किंवा काहीतरी गाडीखाली अडकले, तिला गाडीखालून बाहेर येता आले नाही. गाडी चालवत असलेल्या लोकांनी दोन-तीन वेळा गाडी पुढे-मागे केली. अंजली ओरडत होती, पण त्यांना काही ऐकू आले नाही. त्या लोकांनी मद्यपान केले होती. त्यांनी गाडी पुढे नेली. मी घाबरले होते, म्हणून मी घरी गेले आणि आईला सर्व काही सांगितले.'

निधीच्या या वक्तव्यामुळे आरोपींच्या अडचणीही वाढणार आहेत. यावरून कळत आहे की, आरोपींनी अंजलीला पाहिले होते. त्यांनी तिला पाहिले तेव्हा ती जिवंत होती. असे असूनही, त्यांनी बचावासाठी तिला फक्त चिरडलेच नाही तर 14 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. अंजलीच्या मृत्यूचे कारणही हेच ठरले.

पोलिसांचा हलगर्जीपणा, आरोपींना फायदा न होवो

या संपूर्ण प्रकरणाने दिल्ली पोलिसांवर अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दारू पिऊन आरोपींनी मुलीला चिरडले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ते मुलीचा मृतदेह गाडीखालून 14 किलोमीटरपर्यंत फरफटत राहिले, पण ना कोणताही पोलिस नाका, ना दिल्ली पोलिसांच्या गस्ती पथकाच्या ते नजरेत आले.

ही घटना 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री घडली, पोलिसांनी दावा केला की ते जास्तीत जास्त सतर्क होते. पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर देखील कमकुवत असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामध्ये आरोपींविरोधात लावलेल्या कलमांत 304 (अहेतूक हत्या), 304-ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) या कलमांचा समावेश आहे.

दिव्य मराठीने या प्रकरणात दिल्ली पोलिसांची कारवाई आणि भूमिका याविषयी दोन लोकांशी संवाद साधला. एक म्हणजे उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी विक्रम सिंग, ज्यांना पोलीस कायदा आणि व्यवस्थेबद्दल चांगलीच माहिती आहे.

दुसरे म्हणजे, फौजदारी वकील कुमार वैभव यांच्याकडून समजून घेतले की, हे प्रकरण जेव्हा न्यायालयात जाईल, तेव्हा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे कोणती आव्हाने उभी राहतील.

मला या प्रकरणातील दिल्ली पोलिसांच्या भूमिकेत 8 प्रमुख त्रुटी दिसतात:

1. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्लीचे छावणीत रूपांतर होते. या दिवशी संपूर्ण चपळाईने गस्त, नाकाबंदी करायला हवी. ठिकठिकाणी तपासणी नाके लावून दारू पिणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जाते. मुलीचा मृतदेह वाहनाखालून 14 किमीपर्यंत फरफटत राहिला, पण पोलिसांना त्याचा थांगपत्ताही कसा लागला नाही. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिस इतके हलगर्जी कसे?

2. प्रत्यक्षदर्शी दीपकने पोलिसांना 22 वेळा फोन केला, त्यावर कसलीही कारवाई झाली नाही. पोलिसांचे पेट्रोलिंग पीसीआर वाहन समोरून गेले आणि आवाज देऊनही थांबले नाही. दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीलाही पोलिस म्हणाले की - जा तुझे काम कर.

प्रत्यक्षदर्शीशी पोलिसांनी स्वतःहून संपर्क साधला नाही. तर ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये येताच त्याने स्वतः पोलिसांकडे जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी रात्रीपासून पहाटेपर्यंत प्रत्यक्षदर्शींना शोधण्याचा प्रयत्न का केला नाही?

3. दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने पोस्टमॉर्टम न करताच मृत्यू अपघातामुळे झाल्याचे म्हटले. कारमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजत असल्याचे आरोपींनी सांगितले, पोलिसांनी तेही खरे मानले. मात्र गाडीखाली साधी पाण्याची बाटली आली तरी ड्रायव्हरला काहीतरी अडकल्याचे लगेच कळते. पोलिस प्रवक्त्यांनी आरोपीच्या वकिलासारखीच पाठराखण केली. पीडितेच्या बाजूने आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांना तपास करावा लागतो.

4. पोलिसांनी आरोपींची तत्काळ अल्कोहोलिक चाचणी करून घ्यायला हवी होती. चाचणीचा निकाल आरोपींच्या जबाबाशी जुळवून प्रकरण समजून घ्यायला हवे होते. ही चाचणी 80 तास करता येत असली तरी, अशा गंभीर प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा का केला? पोलिसांनी तब्बल 36 तासांनंतर मुलीचे पोस्टमॉर्टम केले. एवढ्या गंभीर प्रकरणात पोलिसांचा एवढा हलगर्जीपणा आकलनापलीकडचा आहे. याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे.

5. गुन्हा किंवा अपघाताच्या ठिकाणी पोलिसांनी कुंपण घातले नाही. दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी क्राईम स्पॉट पायदळी तुडवले. यामुळे अत्यंत महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याची भीती आहे. पोलिसांनी तत्काळ फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळावरून पुरावे गोळा करायला हवे होते.

6. सुरुवातीला पोलिसांनी फक्त आणि फक्त अपघाताची कलमे लावली. यानंतर टप्प्यानुसार कलम 304A, 120B लावण्यात आले. पीडितेच्या आईने बलात्काराचा संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचे कलम का जोडले नाही. पोस्टमॉर्टममधून ते चुकीचे निष्पन्न झाले असते, तर नंतर तपासात ही कलमे काढून टाकण्यात आली असती. पोलिसांनी पीडितेच्या आईच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणात कारवाई का केली नाही? पोलिसांच्या या एकतर्फी कारवाईतून पोलिस स्टेशन स्तरावर आरोपींना फायदा करून देण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होते.

7. पोलिसांनी सार्वजनिक केलेली एफआयआर ही रनिंग कमेंट्रीसारखी आहे. तथापि तोपर्यंत पोलिसांना आरोपी कोण आहेत हे समजले होते. पोलिसांनी मुलीच्या बाजूने एफआयआर लिहायला हवा होता. एफआयआर हा एखादा विश्वकोश नसतो असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पोलिसांनी घटनेची योग्य माहिती द्यायला हवी, जेणेकरून नंतर केस व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल.

8. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर काही तासांपर्यंत मुलीची आई आणि कुटुंबीयांना त्यांच्या मुलीचे काय झाले हे सांगितले गेले नाही. पीडित पक्षाला राईट टू नो आणि नीड टू नो दोन्ही अधिकार असतात. पीडितेच्या आईला घटनेची/गुन्ह्याची माहिती लवकरात लवकर देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. मृतदेह पाहण्याचाही त्यांना अधिकार होता.

आरोपींना गाडीखालील मुलीबद्दल कळले नाही, हे अशक्य

तुमच्या कारखाली 14 किमीपर्यंत बॉडी फरफटते आणि गाडीत बसलेल्या लोकांना याची कल्पना येत नाही, हे शक्य नाही. म्हणजे हे मुद्दाम केले गेले आहे. दुसरे, जरी असे मानले जाते की त्यांना माहिती नव्हते, तर ते दारूच्या नशेत इतके होते की त्यांना याची जाणीवच नव्हती. तरीही हे प्रकरण मुद्दामहूनच आहे.

हे सर्व पुरावे असतानाही पोलिसांनी न्यायालयात 304 अ अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतरही त्याचे 304 मध्ये रूपांतर करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. या कलमाखाली दोषी आढळल्यास 14 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

पोलिस प्रश्नांच्या घेऱ्यात, हलगर्जीपणामुळे प्रकरण कमकुवत झाले

पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असे सध्या तरी म्हणणे कठीण आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की पीसीआरवर त्यांना वारंवार कॉल केले जात होते, त्यांनी उचलले असते तरी हा अपघात टाळता आला असता.

आरोपी मुलीला 14 किमी फरफटत राहिले, यात जवळपास 1 तास लागला असावा. अशा परिस्थितीत पोलिसांनी आधीच कुठेतरी हस्तक्षेप केला असता, तर कदाचित मुलीला वाचवता आले असते. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. मृतदेहाचे पोस्टमॉर्टमही ते करत आहेत.

एफआयआरमध्ये 15 तास आणि पोस्टमॉर्टममध्ये 36 तासांचा विलंबही पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. या विलंबाचा तपासावर विपरीत परिणाम होतो. पोलिसांच्या आधी मीडियाला सर्व काही माहीत होते. ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली.

मुलीच्या आईने सांगितले की, घटनेनंतर पोलिसांचा सकाळी 8 वाजता फोन आला, मात्र दुपारी 1 च्या सुमारास मृत्यूची माहिती दिली, त्यापूर्वी ते फिरवत राहिले. कोणत्याही प्रकारचा विलंब संशयास्पद आहे, पोलिसांवर संशय निर्माण करतो.

लैंगिक अत्याचाराच्या कोनातूनही तपास आवश्यक आहे

पोस्टमॉर्टममधून लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर न आल्याने या दृष्टीने चौकशी होऊ नये, असा समज चुकीचा आहे. असेही असू शकते की या मुलीचे या मुलांशी संबंध होते आणि एखादे भांडणच या क्रौर्याचे कारण बनले. आता प्रकरण उघड आहे, त्यामुळे तपास सर्वात महत्त्वाचा आहे. अनेक घटनांमध्ये असा अत्याचार त्या घटनेत होत नाही. पण त्याचे कारण तेच असते. या प्रकरणात अजून एफएसएल अहवालाची प्रतीक्षा आहे, त्यातूनही गोष्टी अधिक स्पष्ट होतील.

मुंबईतील अ‍ॅलिस्टर परेरा प्रकरणात 304 अ नव्हे तर 304 लावण्यात आले होते, कारण त्या प्रकरणात आरोपी नशेत होता, त्यामुळे त्याने त्या स्थितीत गाडी का चालवली, असा प्रश्न न्यायालयात उपस्थित करण्यात आला. त्यामुळेच हे जाणीवपूर्वकच केल्यासारखे झाले ना. (2006 मध्ये अॅलिस्टर परेरा नावाच्या व्यक्तीने कारने सात लोकांना चिरडले होते.)

या प्रकरणात आरोपींच्या वैद्यकीय चाचणीत अल्कोहोल आढळून आले आणि पोलिसांनी कलम बदलण्यासाठी अर्ज केला नसेल तर यावर प्रश्न उपस्थित व्हायला हवे.

अंजलीच्या मृत्यूचे ५ आरोपी...

1. दीपक खन्ना, वय 26, ग्रामीण सेवेत चालक 2. अमित खन्ना, वय 25, उत्तम नगरमध्ये SBI कार्डसाठी काम करतो 3. कृष्णा, वय 27, कॅनॉट प्लेसमधील स्पॅनिश कल्चर सेंटरमध्ये काम करतो 4. मिथुन, वय 26 , नरेला येथे हेअर ड्रेसर 5. मनोज मित्तल, वय 27, पी ब्लॉक सुलतानपुरी येथील रेशन विक्रेता, भाजप नेता

हे वृत्तही वाचा...

मुलीला कारखाली फरफटत नेणाऱ्यांना किती शिक्षा होईल?:पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा नोंदवला, सवाल केल्यावर मनुष्यवधाचा गुन्हा

बातम्या आणखी आहेत...