आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:दिल्लीची हवा नोव्हेंबरमध्येच का अधिक प्रदुषित होते, कधी मिळणार यापासून दिलासा, जाणून घ्या सविस्तर

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर..

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमधील हवा प्रदुषण पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला सुरूवात झाली आहे. प्रदूषणाची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारलाही फटकारले आहे. उलट ऑक्टोबरमध्ये लोकांनी चांगल्या वातावरणात श्वास घेतला. त्यावेळी हवा चार वर्षांत सर्वात स्वच्छ होती.

नोव्हेंबरमध्ये असे काय घडले ज्यामुळे हवेची गुणवत्ता इतकी खराब झाली? दरवर्षी नोव्हेंबरमध्येच अशी परिस्थिती का निर्माण होते? दिवाळीच्या फटाक्यांमुळे असे होते का? यामागे पालापाचोळा जाळणे हेसुद्धा एक मोठे कारण आहे का? दिल्लीत प्रदूषण इतके का आहे? जाणून घेऊया…

ऑक्‍टोबरमध्‍ये काय झाले की हवा स्वच्छ झाली?

गेल्या काही वर्षांपासून दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता ऑक्टोबरच्या आसपास घसरते. हीच ती वेळ असते जेव्हा भात कापणीनंतर शेतकरी पालापाचोळा जाळतात. विशेषत: दिल्लीला लागून असलेल्या पंजाब-हरियाणातील शेतकरी गव्हाची लागवड करण्यासाठी रान जाळून शेत स्वच्छ करतात.

यंदा ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे तसे होऊ शकले नाही. याचा परिणाम असा झाला की दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 72 च्या जवळ पोहोचला. जो मागील वर्षी याच काळात 125 च्या आसपास होता. मात्र असे असूनही यंदा ऑक्टोबरचा हवा गुणवत्ता निर्देशांकही सुरक्षित क्षेत्रात नव्हता. तो 50 किंवा त्यापेक्षा कमी असायला हवा.

प्रदूषण का वाढले?
याची दोन कारणे आहेत. प्रथम, पंजाब-हरियाणातून येणारे वारे ज्यामध्ये पालापाचोळ्याचा धूर मिसळला गेला आहे. ऑक्टोबरच्या शेवटी हवामान साफ ​​झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी पालापाचोळा जाळला. कारण ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी त्यांचा वाया गेलेला वेळ लवकरात लवकर भरून काढला. सामान्यत: शेतक-यांना पालापाचोळा जाळण्यापासून ते गव्हाच्या पेरणीपर्यंत 20 ते 25 दिवसांचा कालावधी मिळतो. जर पेरणी उशिरा झाली तर त्यामुळे पीक उत्पादन खूपच कमी होऊ शकते. या वेळी शेतकऱ्यांना यासाठी नोव्हेंबरचे पहिले दोन आठवडेच मिळाले. अशा स्थितीत हळुहळू पालापाचोळा जाळण्याऐवजी मोठ्या भागात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात तो जाळला जात आहेत. त्यामुळे प्रदूषणही झपाट्याने वाढले.

हवेची गुणवत्ता खराब होण्याचे आणखी एक कारण म्हणजे वाऱ्याच्या मंद गतीमुळे स्थानिक प्रदूषक घटक विखरू शकत नाहीत. वास्तविक, नोव्हेंबर हा काळ असतो जेव्हा तापमान झपाट्याने घसरते. अशा परिस्थितीत पालापाचोळा जाळल्यामुळे हवेची गुणवत्ता खूप खराब होते, कारण कोरड्या हवामानामुळे हवा दाट धुक्यात अडकते. एकूणच बदलत्या हवामानाचा यात मोठा वाटा आहे.

दिल्लीतच दरवर्षी अशी परिस्थिती का निर्माण होते?
देशाच्या उत्तरेकडील मैदानी भाग इतर राज्यांपेक्षा जास्त कोरडे आणि धुळीने भरलेले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवी दिल्लीचा लुटियन परिसर खूप हिरवागार आहे, तरीही येथे पंजाब-हरियाणा तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधूनही प्रदूषित हवा येते, ज्यामुळे प्रदूषण वाढते. थारच्या वाळवंटातून येणाऱ्या धुळीचे कण दिल्लीतील प्रदूषणात भर घालतात.

शहराबाहेरील शेतकऱ्यांनाही तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालापाचोळा जाळल्याने होणारे प्रदूषणही कमी होऊ शकते.

2018 पासून पालापाचोळा नष्ट करणा-या यंत्रांच्या खरेदीवर 80% अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांनी या यंत्रांचा वापर केल्यास पालापाचोळा न जाळता तो नष्ट होऊ शकतो. जनजागृतीअभावी आणि शासनाच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे बहुतांश शेतकरी आजही पालापाचोळा जाळत आहेत.

येत्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता आणखी बिघडेल का?

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत गुरुवार आणि शुक्रवारी हवेची गुणवत्ता सुधारेल. मात्र, त्यानंतर ते अत्यंत निकृष्ट पातळीवर राहील. 21 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. 21 नोव्हेंबरनंतर त्यात सुधारणा सुरू होईल. जेव्हा जोरदार वारे अपेक्षित असतात. सध्या सर्वात महत्वाचे प्रदूषक pm2.5 आहे. यासोबतच पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्येही 11 नोव्हेंबरपासून सतत पालापाचोळा जाळण्याच्या घटनांमध्ये घट होत आहे.

बातम्या आणखी आहेत...