आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा होती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आमचे कंबरडे मोडले आहे. अजून काय करावं समजत नाहीये. आम्ही तर आमची विचारशक्तीच गमावली आहे. आपल्या 19 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपीविरुद्ध एका आईने 10 वर्षे लढा दिला. मात्र, आज डोळ्यांसमोर या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सुडलेले पाहून तिला नीट रडूही येत नाही.
सोमवारी या 3 आरोपींची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 19 वर्षीय कल्पना (नाव बदलले आहे) हिचे 2012 मध्ये दिल्लीतील छावला येथून अपहरण करण्यात आले होते. यानंतर हरियाणातील रेवाडी येथे नेऊन तिच्यावर तीन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी अॅसिडने तीचा चेहरा जाळला, तीच्या शरीरावर गरम लोखंडी सळईने वार केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा प्रायव्हेट पार्टमधून दारूची बाटलीही निघाली.
'सर्वोच्च न्यायालयाचा हा अन्याय कसा सहन करायचा'
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुलीच्या आईने सांगितले की, आम्ही आधीच अनेक अडचणींचा सामना करत होतो, मात्र न्यायालयाचा हा अन्याय खपवून घेतला जात नाही. कुटुंबात आर्थिक समस्या आहेत, त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने तोंड द्यावे लागत आहे. माझ्या मुलीला खूप त्रास झाला. न्यायालयाने अशा पीडितांची सुटका केली.
या प्रकरणी आधी स्थानिक न्यायालयाने आणि नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आता कुठे जावे, हेच त्यांना समजत नाहीये.
हा मुद्दा मांडणाऱ्या कार्यकर्ते म्हणाले, न्यायालयावरील विश्वास उडाला
या प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या बलात्कार विरोधी कार्यकर्त्या योगिता भयना म्हणतात की, ‘न्यायालय असा निर्णय घेईल असे आम्हाला वाटलेही नव्हते. आम्ही अधिकाधिक विचार करत होतो की, कदाचित न्यायालय फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलू शकेल. मात्र, त्यासाठी आम्हीही तयार नव्हतो. त्याच्याविरोधातही आम्ही आवाज उठवू. अशा गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, असे आमचे मत आहे. त्याची निर्दोष मुक्तता झाल्याचे समजल्यावर आम्हाला विश्वास बसेना.
या निर्णयामुळे आमच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासलाही तडा गेला आहे. न्यायालयाकडून असे अपेक्षित नव्हते. संध्याकाळपर्यंत हे बदमाश तुरुंगाबाहेर येतील. आम्ही त्या मुलीचा जीव वाचवू शकलो नाही, पण निदान न्याय तरी मिळवून देऊ शकलो असतो. आता आम्ही तेही करू शकलो नाही. अशीच परिस्थिती राहिली तर मुली सुरक्षित कशा राहतील. गुन्हेगारांमध्ये भीती कशी निर्माण करावी?
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात एवढेच म्हटले आहे की, आरोपींना निर्दोष सोडले जात आहे. त्यांना कोणत्या कारणास्तव निर्दोष सोडण्यात आले, हे आता सांगण्यात आलेले नाही.
कामावरून परतत असताना अपहरण, नंतर खून
कल्पनासोबत हा अपघात झाला तेव्हा ती 19 वर्षांची होती. वयाने लहान असूनही तिला घराची संपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे, हे तिला माहीत होते. ती नोकरी करून कुटुंबाचा खर्च भागवत होती.
आपल्या मुलीची आठवण करून आई म्हणते – ती खूप स्वप्न पाहायची. मला लवकरात लवकर घर विकत घ्यायचे आहे, असे ती म्हणायची. त्यावर आम्ही कधीही बंधने घातली नाही. ती कामावरून परतली की लगबगीने जवळ यायची आणि म्हणायची आई मी आलेय.
9 फेब्रुवारी 2012 रोजी कामावरून घरी परतत असताना तीचे अपहरण झाले. तीन दिवस सामूहिक बलात्कार केल्यानंतर तीची हत्या करण्यात आली. दिल्लीतील छावला येथे एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत त्यांचे कुटुंब राहते. वडील सुरक्षा रक्षक असून आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर निवृत्तीच्या वयातही कुटुंब चालविण्यासाठी काम करत आहेत.
दिव्य मराठी नेटवर्कने दोन वर्षांपूर्वी या प्रकरणाचा रिपोर्ट तयार केला होता. त्यावेळी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अडकले होते. तो रिपोर्टही वाचा...
पीडितेचे वडील छोट्याशा भाड्याच्या घरात राहतात. हे त्यांचे निवृत्तीचे वय आहे, मात्र, थोड्या वेळानंतर त्यांना नाईट ड्युटीवर जायचे आहे. ते एक सुरक्षा रक्षक असून घरातील एकमेव कमावणारे व्यक्ती आहेत. नोकरी करून संसाराची जबाबदारी उचललेल्या मोठ्या मुलीचे आता समोर भिंतीवर छायाचित्र लटकवलेले आहे.
ते हाताने इशारा करत सांगतात की, ही माझी मुलगी होती. आणि मी त्या मुलीकडे बघत राहिले. नीट नेटका नेसलेल्या कुर्त्यावर गळ्यात घेतलेला पांढरा दुपट्टा. वडिलांसारखा चेहरा. डोळ्यांत डोकावणारी स्वप्ने. कागदपत्रांवर लावण्यासाठी त्यांनी हे छायाचित्र काढले होते. आता ते भिंतीवर टांगलेले आहे. तीच्या निधनाने केवळ तीचीच स्वप्नेच संपली नाहीत तर कुटुंबातील उर्वरित चार जणांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला आहे.
ज्या बापाला नेहमी वाटायचं की आता मुलगी कमवायला लागली आहे, माझ्या विश्रांतीचे दिवस येत आहेत. जी आई आपल्या मुलीच्या टिफिनमध्ये रोट्या ठेवताना अभिमान बाळगायची की माझी मुलगी कामाला जातेय. आपल्या प्रत्येक गरजेसाठी दीदीकडे धाव घेणारे धाकटे भाऊ-बहीण आता उदास मनस्थितीत बसलेले आहेत. घरात एकमेकांपासून ते दु:ख लपवतात, एकटे असताना मनापासून रडतात, पण त्यांचे दु:ख कमी होत नाही.
9 फेब्रुवारी 2012 ची ती संध्याकाळ होती. पीडित महिला नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतत होती. सूर्य मावळला होता, थोडा मंद प्रकाश शिल्लक होता. बसमधून उतरताच तीच्या पावलांचा वेग वाढला होता, 20 मिनिटांचा हा प्रवास तीला पटकन कव्हर करायचा होता, पण त्या दिवशी अत्याचाऱ्यांचे तीच्यावर लक्ष्य होते. लाल रंगाच्या इंडिका कारमधून त्यांनी तीचे अपहरण केले.
आरोपींनी तिला हरियाणात नेऊन तीन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर तीला मोहरीच्या शेतात मरायला सोडले. पोलिसांच्या नोंदीनुसार ती आरोपींकडे आयुष्याची भीक मागत राहिली, पण त्यांची वासना पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही आणि त्यांनी तिला इतका वेदनादायक मृत्यू दिला की, लिहिताना हात थरथरू लागतात.
तिच्या डोळ्यात अॅसिड टाकण्यात आले. त्याच्या खासगी जागेतील नाजूक भागातून दारूची बाटली निघाली. लोखंडी सळई गरम करुन अंगावर डाग देण्यात आले होते. एवढं सगळं घडलं नसतं तरी तिच्या निधनाचं दु:ख कुटुंबाला कमी नसते झाले?
मुख्यमंत्र्यांकडे गेले तेव्हा ते म्हणाले, 'अशा घटना घडतच राहतात'
पीडितेच्या मृत्यूमुळे कोणी संताप व्यक्त केला नव्हता. मीडियानेही मोठ्या बातम्या बनवल्या नव्हत्या. ती गेल्यानंतर कोणतेही वादही झाले नाहीत, कायदे बदलले गेले नाहीत. एकही नेता त्यांच्या घरी गेला नाही. मुलीला न्याय मिळावा म्हणून तिचे वडील तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे गेले असता ‘अशा घटना घडतच राहतात’ असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले होते. त्यावेळी शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या.
तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिल्याचे वडील सांगतात. याशिवाय कोणत्याही प्रकारची मदत किंवा भरपाई मिळालेली नाही.
या प्रकरणाशी संबंधित खालील बातमी देखील वाचा...
दिल्लीतील छावला गँगरपेच्या दोषींची सुटका:सुप्रीम कोर्टाने रद्द केला हायकोर्टाचा निर्णय, HC ने दिली होती फाशीची शिक्षा
दिल्लीतील छावला येथे 2012 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारातील दोषींची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने रवी कुमार, राहुल आणि विनोद यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द केला.
14 फेब्रुवारी 2012 रोजी छावला येथे उत्तराखंडमधील एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. आरोपींनी तिला गाडीत बसवून दिल्लीबाहेर नेले होते. सामूहिक बलात्कारादरम्यान मुलीवर अमानुष अत्याचारही झाले होते. तिच्या अंगाला सिगारेटचे चटके देण्यात आले आणि चेहऱ्यावर अॅसिड टाकण्यात आले. ट्रायल कोर्टाने रवी, राहुल आणि विनोद यांना मुलीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. वाचा पूर्ण बातमी..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.