आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Delhi CM Arvind Kejariwal Interview : T; Earlier 6,000 Patients Used To Come, Now Less Than A Thousand, The Severity Of Corona Has Decreased:

भास्कर ओरिजिनल:चाचणी सोडा; आधी 6 हजार रुग्ण यायचे, आता हजारपेक्षाही कमी, कोरोनाची तीव्रता कमी झाली : अरविंद केजरीवाल

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना चाचणी व केंद्रासोबत समन्वयाबाबत चर्चेत आलेले दिल्लीचे सीएम केजरीवाल यांच्याशी बातचीत

दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल पुन्हा चर्चेत आहेत. या वेळी ते नायब राज्यपालांच्या घरासमोर धरणे किंवा केंद्रासोबत एखाद्या संघर्षामुळे नव्हे, कोरोनाशी लढण्याच्या दिल्ली मॉडेलवरून चर्चेत आहेत. पंतप्रधान मोदींनीही दिल्ली मॉडेलचे कौतुक केले आहे. मात्र, कोरोना चाचणीच्या बदललेल्या पद्धतीबाबतही सवाल उपस्थित होत आहेत. कोरोना चाचणी ते केंद्रासोबतचा समन्वय व इतर विषयांवर दैनिक भास्करने त्यांच्याशी बातचीत केली. सादर आहे मुख्य अंश...

> दिल्लीत कोरोनाचे रुग्ण घटताहेत, ही सर्वोच्च पातळी आहे की अजूनही वर-खाली होईल?

कोरोनाबाबत कोणीही काहीच सांगू शकत नाही. कोणतीही उणीव राहू द्यायची नाही. जोपर्यंत पूर्ण विश्वास होत नाही तोपर्यंत तयारी कमी करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. देशाच्या तुलनेत दिल्लीत स्थिती चांगली आहे. ती तशीच राहील अशी आशा आहे.

> आरटीपीसीआर चाचणी मानक मानली जाते. मात्र अाता मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजन चाचण्या होत आहेत. यात चुकीची शक्यता जास्त सांगितली जात आहे. वस्तुस्थिती काय आहे?

आम्ही तज्ञ नाही, ही चाचणी जास्त चांगली की ती जास्त चांगली. आयसीएमआरचे दिशानिर्देश आहेत त्यानुसार चाचणी व पॉझिटिव्हचे प्रमाण आहे. चाचण्या विसरा, तुम्ही संपूर्ण दिल्लीची स्थिती बघा. मृत्यूंत घट होत आहे. एकेकाळी दिवसभरात सहा रुग्ण येत होते, आता हजारपेक्षाही कमी आहेत. रिकव्हरी रेट ९०% पेक्षा जास्त आहे. एकूणच कोरोनाची दिल्लीत तीव्रता कमी होत आहे.

> तुम्ही सतत राज्यांना सल्ला देत आहात की, दिल्ली मॉडेल स्वीकारायला हवे...

दिल्ली मॉडेल स्वीकारा हे मी सांगितले नाही. मी सांगितले की, दिल्ली माॅडेलची सगळीकडे चर्चा होत आहे. कोविड अशी गोष्ट आहे, त्यापासून सर्वांना शिकण्याची गरज आहे. हाेम आयसोलेशनचे दिल्लीचे मॉडेल एक उदाहरण आहे. मात्र, कंटेनमेंट झोन कोठे असावेत याचा निर्णय राज्यांनाच घ्यायचा आहे. मुंबईतील धारावी मॉडेलकडून आपण शिकू शकतो.

> दिल्लीत स्थिती चांगली आहे, शेजारच्या राज्यांतील लोकांना सांगणार का उपचारासाठी या?

मला सांगण्याची गरज नाही, त्यांनी येणे सुरू केले आहे. एक दिवसाचा आकडा मी पाहिला, त्या दिवशी एकूण ३०० रुग्णालयात भरती झाले. त्यातील २०० दिल्लीकर होते, ९७ बाहेरचे. लोक स्वत:हून येत आहेत, त्यांचे स्वागत आहे.

> लॉकडाऊन आता किती प्रभावी असेल?

लॉकडाऊनने कोरोना थांबत नाही, केवळ विलंब होतो. आमच्याकडे एक हजार खाटा आहेत आणि दोन हजार रुग्ण येण्याचा अंदाज असेल तर आपल्याला १०-१५ दिवसांचे लॉकडाऊन करून खाटा वाढवायला हव्या, मग उघडायला हवे.

> कोरोना काळात तुमचा केंद्र सरकारशी चांगला समन्वय राहिला, हेच दिल्ली मॉडल आहे का?

दिल्ली मॉडेलचा पाया आहे की, कोरोनाशी कोणीही सरकार किंवा व्यक्ती एकटी लढू शकत नाही. जेवढी भांडणे आहेत, मतभेद आहेत, ते बाजूला ठेवा. आमच्याकडे ऑक्सिजन सिलिंडर कमी होते, व्हेंटिलेटर कमी होते. आम्ही केंद्राकडे मागितले, त्यांनी उपलब्ध करून दिले.

शिक्षण चांगले हवे, आमचे शिक्षण मंडळ आणणार

केजरीवाल यांनी सांगितले, शिक्षण चांगले हवे हे आमचे स्वप्न आहे. सीबीएसईचे सध्याचे जे मॉडेल आहे ते लॉर्ड मॅकाॅलेच्या मॉडेलवर आधारित आहे. त्याला बदलायचे आहे. आम्ही अामचे मंडळ आणणार. नव्या शैक्षणिक धोरणात मनीष सिसोदिया व त्यांच्या टीमने अभ्यास केला आहे. चांगल्या गोष्टीही आहेत, त्रुटीही आहेत. उद्देश चांगला आहे. मात्र अंमलबजावणी कशी होईल याची रूपरेखा दिसत नाही.

बातम्या आणखी आहेत...