आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमध्ये ओसरतेय कोरोनाची दुसरी लाट:​​​​​​​एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात स्मशानात दररोज 700 मृतदेह येत होते, आता ही संख्या जवळपास 450 झाली

नवी दिल्ली (संध्या द्विवेदी)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीतील तिन्ही महापालिका स्मशानभूमी आणि कब्रिस्तानात कमी झाले मृतदेहांचे आकडे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमित आणि मृतांचे आकडे झपाट्याने वाढले. मात्र आकड्यांपेक्षाही स्मशान आणि कब्रिस्तान येथील दृष्य भयावह होते. रांगेत लागलेले मृतदेह, आपल्या नंबरची प्रतिक्षा करत असलेले नातेवाईक आणि स्मशानात एकाच वेळी जळत असलेल्या शेकडो चितांचे दृष्य हे सामान्य झाले होते. मात्र आता स्मशान आणि कब्रिस्तानातून येत असलेले आंकडे सांगतात की, दुसरी लाट ओसरत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही प्रमाणात कमी होत असताना दिसतोय.

सध्या आपण दिल्लीविषयी बोलत आहोत. सध्याचे आकडे देखील दिलासा देणार नाही, मात्र तरीही हे पाहून आशा आहे की, लवकरच दुसरी लाट ओसरेल. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात दररोज 700 पेक्षा जास्त अंत्यसंस्कार होत होते. तर मेच्या दुसऱ्या आठवड्यात हा आकडा कमी होऊन 450 झाला आहे.

दिल्लीच्या सीमापूर स्मशानात गेल्या 25 वर्षांपासून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे जितेंद्र सिंह शंटी याविषयावर बोलले. स्मशानभूमीत प्रेतांबद्दल विचारणा केली असता ते भावनिक होतात, 'देव काय काय दिवस दाखवेल कळत नाही. मी पाच महिन्यांच्या मुलीचा चेहरा विसरु शकत नाहीये. तिचे नाव परी होते. तिच्या वडिलांनी मृतदेह आणला. एकदम निरागस. आम्ही हा मृतदेह स्मशानातील सर्वात शांत कोपऱ्यात दफन केला. वडील फक्त म्हणाले, पहिले मूल होते हे आमचे, अशा ठिकाणी दफन करा जिथे अजिबात इजा होणार नाही' हे बोलत असतानाच जितेंद्र सिंह शंटी यांचा कंठ दाटून आला.

पाच मिनिटे थांबून ते म्हणाले, 'पण आता परिस्थिती सुधारत असताना दिसत आहे. गेल्या 5-6 दिवसांपासून मृतदेहांचे आकडे कमी होत आहेत. 12 मेला केवळ 31 मृतदेह आले, तर 11 मेला 46 आणि 10 मे रोजी 55 मृतदेह आले होते.' शंटी म्हणतात की, एप्रिलमध्ये परिस्थिती खूप भयंकर होती. ते म्हणतात, 'एप्रिलमध्ये दररोज जळपास 95-100 मृतदेह येथे येत होते. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तर एका दिवसात 118 मृतदेह आले होते. पण आता बस झाले... देवाने कृपा करावी.'

दिल्लीतील तिन्ही महापालिका स्मशानभूमी आणि कब्रिस्तानात कमी झाले मृतदेहांचे आकडे
दिल्ली एमसीडीच्या आकड्यांनुसार 1 एप्रिलपासून 29 एप्रिलपर्यंत अंत्यसंस्कारांसाठी येणाऱ्या मृतदेहांच्या संख्येत सलग वाढ झाली. मात्र त्यानंतर संख्येमध्ये घट होत आहे. 10 मेपर्यंत स्मशानभूमीत 14,000 कोविड संक्रमितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलासादायक म्हणजे 1 मेपासून मृतदेहांमध्ये घट झाली आहे.

पूर्व दिल्लीचे महापौर निर्मल जैन म्हणतात, 'गेल्या एका महिन्यापासून हृदय हेलावणारे आकडे समोर येत होते, परंतु गेल्या एका आठवड्यापासून स्मशानभूमी आणि कब्रिस्तानातील मृतदेहांची संख्या कमी होऊ लागली आहे. असे दिसते आहे - दुसर्‍या लाटेचा कहर थांबत आहे'. दक्षिण दिल्लीतील अधिकारी वंदना यांनी म्हटले की, 'आकडेवारीत लक्षणीय घट झाली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत स्मशानभूमी आणि कब्रिस्तानातील मृतदेहांची संख्या 40-45 टक्क्यांनी खाली आली आहे.

बातम्या आणखी आहेत...