आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Delta Plus Variant Of Coronavirus And COVID Vaccine; Who Is At Higher Risk? Ways To Prevent Infection

कोरोनाची तिसरी लाट:लसीकरणानंतरही 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका; जाणून घ्या या प्राणघातक विषाणूपासून कसा करावा स्वतःचा बचाव

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आता हा जीवघेणा विषाणू सर्वच वयोगटातील लोकांना आपले लक्ष्य करत आहे.

कोरोना विषाणूच्या दुसरी लाट ब-याच अडचणी आणि आव्हाने घेऊन आली होती. या लाटेने लोकांना केवळ शारीरिकरित्या अशक्तच केले नाही तर अनेकांचे मानसिक खच्चीकरणही केले.

आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र आता लोकांमध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटची धोका वाढला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सुरुवातीला वयोवृद्ध लोक डेल्टा व्हेरिएंटच्या कचाट्यात सापडले. मात्र आता हा जीवघेणा विषाणू सर्वच वयोगटातील लोकांना आपले लक्ष्य करत आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट पसरण्याची क्षमता वाढू शकते

 • तज्ज्ञ असा दावा करत आहेत की, डेल्टा आणि डेल्टा प्लस दोन्ही प्रकार आपल्या सर्वांसाठी चिंताजनक आहेत. अलीकडेच सरकारी अधिका-यांनी सांगितले की, डेल्टा प्लस व्हेरिएंट म्युटेशननंतर अधिक प्राणघातक झाला आहे. त्यांनी असा दावा केला की, डेल्टा प्लस व्हेरिएंटची पसरण्याची क्षमता वाढू शकते.​​​​​​​

डेल्टा प्लस व्हेरिएंट वेगाने फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो

 • कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये झालेल्या म्युटेशनला K417N हे नाव देण्यात आले आहे. हे म्युटेशन कोरोना विषाणूच्या बीटा आणि गामा व्हेरिएंटमध्येही आढळले होते.
 • नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनाइझेशन (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा म्हणतात की, डेल्टा प्लस व्हेरिएंट उर्वरित कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने फुफ्फुसांपर्यंत​​​​​​​ पोहोचतो.
 • यूके अधिका-यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डेल्टा व्हेरिएंट कोरोनाच्या सर्व प्रकारांपैकी सर्वात प्रमुख आहे. आतापर्यंतच्या सर्व प्रकरणांचा विचार करून पब्लिक हेल्थ इंग्लंडचा दावा आहे की, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, तरुण लोक, लसीचा डोस न घेतेलेले आणि अर्धवट लसीकरण झालेल्या लोकांना डेल्टा संसर्गाचा धोका जास्त आहे.

डेल्टामुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा मृत्यू

 • यूकेच्या अभ्यासानुसार डेल्टामुळे मृत्यूची 117 प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील बहुतेक लोक हे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. यापैकी 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 38 जणांना लस मिळाली नव्हती,
 • याच वयोगटातील 50 लोक असे होते ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर 50 पेक्षा कमी वयोगटातील 6 लोक असे होते ज्यांना लस दिली गेली नव्हती आणि 2 लोकांनी लसीचा एक डोस घेतला होता.

वृद्ध आणि तरुण पिढी दोघांवरही डेल्टा व्हेरिएंटचा अधिक धोका

 • पब्लिक हेल्थ इंग्लंडने दिलेली आकडेवारी पाहता हे स्पष्ट झाले आहे की, वृद्ध आणि तरुण पिढी दोघांनाही डेल्टा व्हेरिएंटचा जास्त धोका आहे. ते म्हणाले, जेव्हा कोरोनाची नवीन रुपं समोर येत आहेत, तेव्हा सावध राहणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे.
 • अशा परिस्थितीत, कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करणे आवश्यक आहे, ज्यात डबल मास्किंग, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त लोकांनी लवकरात लवकर लसीकरण​​​​​​​ करुन घेतले पाहिजे. लसीकरण हा त्याचा गंभीर धोका कमी करण्याचा एकमेव चांगला मार्ग आहे.

डेल्टा प्लस विरूद्ध लस किती प्रभावी आहे?

 • WHOने म्हटल्यानुसार, सध्या वापरल्या जाणा-या या लसी डेल्टा प्लसमुळे होणारे गंभीर संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी आहेत, परंतु विषाणूदेखील या लसविरूद्ध लढायला स्वतःला तयार करत आहे.
 • पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अहवालानुसार, भारतात दिल्या जाणा-या लसी डेल्टा प्लस विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहेत. संघटनेने जगभरातील डेल्टा व्हेरिएंटच्या 160 घटनांची जीनोम​​​​​​​ सीक्वेन्सिंग केली होती, त्यापैकी 8 हे भारतातील होते. अहवालात म्हटले आहे की, डेल्टा व्हेरियंटविरूद्ध लस पहिल्या डोसनंतर 80% आणि दुस-या डोसनंतर 96% प्रभावी आहे.

लसीकरणानंतर गंभीर संसर्ग टाळता येतो

 • डेल्टा प्लसबद्दल सध्या जास्त माहिती उपलब्ध नाही. या कारणास्तव, जगभरात वेगवेगळे अभ्यास केले जात आहेत. प्राथमिक निकालात हे उघड झाले आहे की, व्हायरस स्वतः बदलत असला तरी,​​​​​​​ संसर्ग टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस हाच आहे.

WHOने स्पष्ट केले आहे की, लस विषाणू संसर्गास प्रतिबंधित करू शकत नाही परंतु रुग्णाला गंभीर लक्षणे आणि मृत्यूपासून वाचवू शकते.

बातम्या आणखी आहेत...