आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Demand For Antibiotics Fell By 49 Per Cent In Lockdown, While Demand For Various Minerals And Vitamins Increased By 35 Per Cent.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनमध्ये अँटिबायोटिक्सची मागणी 49 टक्के घटली, तर विविध मिनरल्स, व्हिटॅमिनच्या मागणीत मात्र तब्बल 35% वाढ

रोशनी शिंपी | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पर्सनल हायजीनचे महत्त्व पटले; कॅल्शियम, मिनरलचा वापर 70 टक्के वाढला

लॉकडाऊनमध्ये प्रतिजैविकांची (अँटिबायोटिक्स) मागणी ४९% कमी झाली, तर विविध मिनरल्स, व्हिटॅमिनची मागणी ३५ % वाढल्याचे चित्र आहे. एकूणच औषधींचा खप ४०% कमी झाल्याचे व हे चित्र राज्यभर असल्याचे निरीक्षण औरंगाबादेतील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.च्या पदाधिकाऱ्यांनी नोंदवले.

असोसिएशनचे कोषाध्यक्ष निखिल सारडा यांनी सांगितले, कोरोनासाठी वैयक्तिक सुरक्षा हा महत्त्वाचा उपाय सर्वांच्या लक्षात आला. त्यामुळे सतत हात धुणे, सॅनिटायझर वापरणे सुरू झाले. मास्कमुळे हवेतून पसरणाऱ्या आजारांना आळा बसला. त्यामुळे अँटिबायोटिकचा वापर कमी झाला. सॅनिटायझर, मास्क तसेच हँडवॉशचा वापर वाढला. लॉकडाऊनमध्ये पर्सनल हायजीन ८५% वाढले आहे. या काळात ऑगमेन्टिन, क्लॅव्हम, अरिथ्रोमायसिन, सिफॅड्रोक्सिल, सिफोडोक्झिम, अजिथ्रोमायसिन, सेफिझाइमस, सेफिरोझाइम, रॉक्सीथ्रीमायसिन अशा प्रतिजैविकांची मागणी घटली आहे.

कॅल्शियम, व्हिटॅमिनचा वापर ७०% वाढला :

कोरोनात व्हिटॅमिन, मिनरल व कॅल्शियम यांचा वापर ७०% वाढला. यापैकी ३५ टक्के औषधी दुकानातून तर ३५ ते ४० टक्के ऑनलाइन विक्री झाली.

यामुळे घटला प्रतिजैविकांचा वापर

> घरातच राहणे. धावपळ कमी झाली. शक्ती खर्च झाली नाही.

> घरातील आहार घेण्यामुळे जंतू संसर्ग टळला.

> बाहेरचे पाणी बंद. पाण्यामुळे होणारे आजार थांबले.

> मास्कचा वापर वाढल्याने हवेतून होणारे आजार घटले.

> हात वारंवार धुण्याने जंतुसंसर्ग, प्रसार थांबला.

> अपघातांचे प्रमाण घटल्याने प्रतिजैविकांचा वापर कमी.

ताप, खोकला, सर्दीवर नजर

सर्दी, ताप व खोकला यासाठी कुणी औषध घेण्यास आले तर नावे नोंदवून घ्या आणि यंत्रणेला कळवा, असा आदेश आहे. त्यामुळे सेल्फ मेडिकेशनचे प्रमाण घटले. - विनोद लोहाडे, जनसंपर्क अधिकारी, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. औरंगाबाद

प्रतिजैविकांचा वापर नियंत्रित हवा

प्रतिजैविकांचा अतिवापर घातक आहे. अति घेतल्यास परिणाम होत नाही. आम्ही वारंवार यासाठी जागृती करतो, पण वापर थांबत नव्हता. यानिमित्ताने वापर अत्यल्प झाला ही आनंदाची बाब आहे. - डॉ. आनंद निकाळजे