आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Determination To Reach One Lakh Children In The State Through 'A Story A Day' Initiative; Cricketers Sunil Gavaskar And Ajinkya Rahane

दिव्य मराठी विशेष:‘ए स्टोरी ए डे’ उपक्रमातून राज्यात एक लाख मुलांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार; क्रिकेटपटू सुनील गावसकर, अजिंक्य रहाणे यांचे पाठबळ

अतुल पेठकर । नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिले अक्षर फाउंडेशनचा उपक्रम, पंचायत समितीचाही पुढाकार; नवीन माेहीम घेतली हाती

कोरोना लाॅकडाऊनच्या काळात मुलांनी रोज एक गोष्ट शिकावी व त्यातून इंग्रजीवर प्रभुत्व मिळवतानाच शिक्षणही सुरू राहावे या उद्देशाने नागपूरजवळ हिंगणा येथील पहिल्या अक्षर फाउंडेशनने “ए स्टोरी ए डे’ उपक्रम सुरू केला असून या माध्यमातूत दीड लाख मुलांपर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याची माहिती सुमीत चटर्जी यांनी दिली.

या उपक्रमात हिंगणा पंचायत समिती व नागपूर पंचायत समिती भागीदार म्हणून सहभागी आहेत. पहिले अक्षर फाउंडेशन ही आरपीजी फाउंडेशनच्या संचालक राधा गोएंका यांची एनजीओ आहे.

शिक्षणात काेणत्याही प्रकारचा खंड पडू नये हा उद्देश

मुले देशाचे भविष्य आहे. पुढे जाऊन हीच मुले देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल करणार आहे. त्यामुळे मुलांसाठी काम करण्यात खूप आनंद मिळतो. कोरोना काळात त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने उपक्रम सुरू केला. इतर अनेक राज्यांत स्थानिक भागीदारांसोबत आम्ही काम करीत आहोत, अशी प्रतिक्रीया सुमीत चटर्जी यांनी दिली.

क्रिकेटपटू व तारकांचा पाठिंबा

या उपक्रमाला सुनील गावसकर, अजिंक्य रहाणे, सोनाक्षी सिन्हा व मयंक अग्रवाल यांनी पाठिंबा दिला आहे. सुनील गावसकर यांनी “छकुची सायकल’, अजिंक्य रहाणेने “टिम्मी अँड पेपे’, मयंक अग्रवाल याने “स्टोरी आॅफ लेटर बी’ व सोनाक्षी सिन्हाने “द न्यू गर्ल’ या कथांचे वाचन केले. २०१९ च्या बालकदिनी आयोजित कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हा सहभागी झाली होती. त्यामुळे आता या उपक्रमाला माेठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

स्टोरी बँकमध्ये आहे २०० कथा

आजघडीला फाउंडेशनकडे २०० कथांची बँक आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत १००० स्टोरी बँक करण्याचे ठरवले आहे. फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून राज्यातील १.५ लाख मुलांपर्यंत या कथा पोहोचवण्याचा निर्धार स्वयंसेवकांनी केला आहे. याशिवाय फाउंडेशन आकाशवाणी व दूरदर्शनच्या प्रादेशिक केंद्रांशी टायअप करणार असल्याचे चटर्जी यांनी सांगितले. यात कथा सांगण्यास इच्छुक स्वयंसेवक स्वत:च्या वैयक्तिक संग्रहातील अथवा फाउंडेशनच्या www.astotyday.in या वेबसाइटवरील कथा निवडू शकतात. त्यानंतर वेबसाइटवर उपलब्ध करून िदलेल्या लिंकवर जाऊन ते कथा वाचू शकतात आणि रेकाॅर्ड करून अपलोड करू शकतात. कथा मिळाल्यानंतर पहिले अक्षरची टीम २४ तासांच्या आत कथा डिजिटल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करील.- राधा गोएंका, संचालक, आरपीजी फाउंडेशन