आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
“चप्पल-बूट घराबाहेरच सोडा, बाहेरच हातपाय धुवा, मगच घरात प्रवेश...’ साधारणपणे पूर्वी खेड्यांतील मानल्या जाणाऱ्या या सवयी कोरोना आपत्तीत शहरांतील गरज बनत आहेत. देशात अनेक डेव्हलपर्सनी नव्या प्रकल्पांत काेरोनामुळे झालेल्या बदलांनुसार घरांच्या रचना बदलल्या आहेत. वर्क फ्रॉम होमसाठी २-३ बीएचकेऐवजी हे डेव्हलपर्स २.५ व ३.५ बीएचकेच्या योजनेवर काम करत आहेत. यात एका खोलीत निम्मा भाग केवळ ऑफिससाठी असेल.
देशातील तीन रिअल इस्टेट समूह, दाेन अर्बन प्लॅनर सांगताहेत कसे बदलेल घर
दीपेश असनानी, संचालक, असनानी ग्रुप
मोठ्या कॉलनीऐवजी छोट्या वसाहतींचे प्लॅनिंग आहे. १०० ते २०० घरांच्या वसाहतीत एक प्रवेशद्वार, पार्क आणि क्लब हाऊस असेल. येथे कोरोनाशी निपटणे सोपे जाईल. शिवाय संसर्गाचा फैलाव होणार नाही. सेंटा फे या नव्या प्रकल्पात ३ बीएचकेसोबत ऑफिससाठी जागा देत आहोत. घराबाहेर एक बेसिन असेल.
लिंकन रॉड्रिक्स, अध्यक्ष, बेनेट अँड बर्नार्ड समूह
गोव्यातील व्हिक्ट्री गार्डन प्रकल्पात हायड्रोपोनिक्स फार्म असतील. घरीच भाज्या-फळे लावू शकाल. घराबाहेर पादत्राणांसाठी व निर्जंतुकीकरणासाठी वेगळी जागा असेल. प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून नळ फिटिंग तांब्याची असेल. प्रत्येक घरात ऊन-हवा मिळेल. वर्क फ्रॉम होमसाठी साउंडप्रूफ खोल्या आहेत.
सुरेंद्र हिरानंदानी, एमडी, हाऊस ऑफ हिरानंदानी
मुंबई, ठाणे, बंगळुरू आणि चेन्नईत वर्क फ्रॉम होमच्या हिशेबाने अपार्टमेंटच्या प्रकल्पांत बदल केला अाहे. घराबाहेर एक अतिरिक्त वॉशरूम देत आहोत. टाऊनशिपमध्ये हायस्पीड इंटरनेटची स्मार्ट सिक्युरिटी सिस्टिम असेल. सुरक्षा व हायजिनला महत्त्व असेल. घरून काम करण्यासाठी वेगळी जागा असेल.
कोरोनाच्या हिशेबाने नकाशा, होम थिएटरची रचना
१५०० वर्गफूट प्लॉटसाठी नवा नकाशा असेल. मध्यभागी छत खुले असेल. मल्टिप्लेक्समध्ये जाण्याची मग गरज नाही. येथे होम थिएटरसाठी विशेष जागा ठेवली आहे.-प्रवीण भागवत, अर्बन प्लॅनर, भोपाळ
केंद्र सरकारही शहरी रचनेत बदल करत आहे
कोरोनाच्या हिशेबाने शहरांच्या योजनेत केंद्र बदल करत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स हे बदल करत आहे. सूचना मागवल्या आहेत. - प्रो. शाश्वत बंदोपाध्याय, सेप्ट युनिव्हर्सिटी, अहमदाबाद
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.