आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Devendra Fadanvis Interviews | Officials Became Kings, Government Control Ended; Devendra Fadnavis Criticized On Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खास मुलाखत:अधिकारीच राजे झाले, सरकारचे नियंत्रण संपले; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक
  • समन्वयाचा-सातत्याचा अभाव आणि गोंधळलेले सरकार यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली

‘परिस्थिती कशी हाताळावी, याचे तारतम्य राज्य सरकारकडे नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी त्यांना वेळोवेळी फटकारले आहे. मात्र, समन्वयाचा-सातत्याचा अभाव आणि गोंधळलेले सरकार यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली. अधिकारीच राजे झाले आहेत आणि हातावर पोट असलेला माणूस अस्वस्थ आहे,’ अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत फडणवीस यांनी सध्याची आपत्ती आणि आव्हानांविषयी विस्ताराने भाष्य केले.

‘मी राज्यभर दाैरे करताेय. काेराेना रुग्णांच्या टेस्टिंगची संख्या खूपच कमी असल्याचे दिसतेय. ती वाढवली पाहिजे. सरकार आणि प्रशासनात माेठ्या प्रमाणावर समन्वयाचा अभाव दिसताे. स्वॅब लवकर घेतले जात नाहीत, घेतले तर अहवाल लवकर येत नाहीत. रुग्णांना अॅडमिट करून घेतले जात नाही. अशी खूप गडबड राज्यभर आहे. खूप दुर्लक्ष हाेतेय, त्याचा लाेकांना त्रास सहन करावा लागताेय,’ अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

‘दिव्य मराठी’ प्रश्न राज्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल ?

> प्रश्न : पदवी परीक्षांचा वाद उद‌्भवलाय, त्याबद्दल काय सांगाल?

देवेंद्र : देशात काय चालले आहे याचा विचार करावा लागेल. राज्यात एटीकेटीच्या परीक्षा तर घ्याव्याच लागणार आहेत. या मुद्द्यावर राज्य सरकार संभ्रमात आहे. कारण परीक्षा रद्दचा निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करायचे हा विषय त्यांनी विद्यापीठांवर साेडला. केवळ युवा सेनेेने घाेषणा केली म्हणून या मुद्द्याचा इगाे करणे याेग्य नाही. विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. विद्यार्थी तर म्हणतीलच परीक्षा नकाे म्हणून, पण राज्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घ्यायचा असताे.

> प्रश्न : महाविकास आघाडी सरकारविषयी काय मत आहे?

देवेंद्र : सरकारमध्येच समन्वय नाही. एकहाती नेतृत्व नसल्याने हा प्रश्न निर्माण हाेताेय. मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिकारीच सर्व निर्णय घेत असल्याचे चित्र निर्माण झालंय. राज्यात प्रशासनच काम करत असतं, पण लीडरशिप ही राजकीय नेतृत्वाची असावी लागते. अधिकारी अनेकदा निर्णय घेताना कचरतात. त्यांच्यातही वाद असतात. तेव्हा राजकीय नेतृत्वाने निर्णय घ्यायचे असतात. महाराष्ट्रात मात्र दुर्दैवाने अधिकारी राजा बनलाय.

> प्रश्न : काेराेनाच्या लढाईत समन्वयाचा अभाव असल्याचे ‘दिव्य मराठी’ने समाेर आणले. खंडपीठाने त्याची सुमोटो दाखल केली. प्रशासनाने मात्र ‘दिव्य मराठी’वरच गुन्हे दाखल केले?

देवेंद्र : प्रशासनाची ही भूमिका पूर्णपणे चुकीची व निषेधार्ह आहे. मी यापूर्वीही तसे स्पष्ट सांगितलेेले आहे. या बाबतीत आम्ही पूर्णपणे ‘दिव्य मराठी’च्या पाठीशी आहाेत.

संजय राऊतांची मुलाखत घेऊन प्राेमाेला ‘एक नारद अन‌् शिवसेना गारद’ नाव द्या

जळगाव | संजय राऊतांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा प्रोमो ‘एक शरद आणि बाकी सगळे गारद’ असा केला आहे. बाकी सगळे कोण कोण हे बघावे लागेल. बाकी सगळे म्हणजे उद्धवजीही गारद का? असादेखील विचार करावा लागेल. मला आलेल्या संदेशाप्रमाणे आता राऊत यांचीही मुलाखत घेऊन ‘एक नारद आणि शिवसेना गारद’ असे नाव द्या, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात लगावला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser