आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभा निवडणूक 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाजातील दलित वंचित आणि ओबीसी समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या मतदारांची साथ मिळाल्यामुळेच 2014 मध्ये देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार स्थापन झाले. 2014 नंतर 2019 च्या निवडणुकीत देखील भाजपला या मतदारांनी साथ दिली. आता भाजप 2024 च्या निवडणुकीची तयारी करत आहे. यासाठी वंचित समाजाबरोबरच ओबीसी तसेच महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. याची प्रचिती राज्याच्या अर्थसंकल्पात देखील दिसून आली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यावरून भाजपचा डोळा आता महिला मतदारांवर असल्याचे स्पष्ट होते.
अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद करण्यात येईल अशी अपेक्षा आधीच होती. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्याची प्रचिती देखील आली. राज्यात महिला मतदारांची संख्या पाहता महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने अर्थसंकल्पात पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसून येते.
सर्वात आधी पाहूयात अर्थसंकल्पात महिलांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी...
भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आगामी काळात राज्यात अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगर पालिकांच्या निवडणूका होणार आहेत. तसेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून देखील याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तदतूद करण्यात आली आहे. सध्या भाजप आगामी निवडणुकांच्या रणनितीवर काम करत आहे.
भारतीय जनता पक्षाची विस्तारक योजना
माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वप्रथम गुजरातमध्ये विस्तारक योजना लागू केली होती. हीच योजना सर्व राज्यांमध्ये लागू करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या योजनेत भाजपचा कार्यकर्ता निश्चित एका मतदार संघात पूर्णवेळ प्रचाराचे काम करेल. या माध्यमातूनही महिला, मागास आणि ओबीसी समाजाला आकर्षीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
केंद्राच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारच्या वतीन राबवण्यात येणाऱ्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विस्तारक आणि मतदार संघ निहाय जबाबदारी देण्यात आलेल्या पक्षाच्या नेत्यांवर देण्यात आली आहे. यात पीएम हाऊसिंग, घरोघरी शौचालये, मुद्रा योजना, जल जीवन मिशन, उज्ज्वला यांसारख्या योजना लोकांपर्यंत आणि विशेष करुन महिलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.