आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Dialogue With The Author Of India Tomorrow: Conversation With The Next Generation Of Political Leaders

दिव्य मराठी विशेष:पतीवर आरोप झाले तेव्हा प्रियंकांनी मुलास प्रॉपर्टीची कागदपत्रे दाखवली... राहुलनी पॅलेस्टिनी कविता म्हणून धक्काच दिला : लेखक प्रो. प्रदीप छिब्बर आणि हर्ष शहा

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘इंडिया टुमारो : कन्व्हर्सेशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स’च्या लेखकांशी संवाद
  • पुस्तकाचे आज प्रकाशन : राहुल-प्रियंका, सचिन पायलट यांच्यासह देशातील 20 युवा नेत्यांच्या मुलाखती

राजकारणात कुणाचा शिक्का नसावा, असे राहुल गांधींना वाटते. त्यांच्या दृष्टीने राजकारण महत्त्वाचे असले तरी त्यांचे इतर काही छंद आहेत. तर, राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष बिगर गांधी असावा, या मांडलेल्या भूमिकेशी प्रियंकाही सहमत आहेत. गांधी कुटुंबाच्या या दोन वारसदारांचे हे विचार गेल्या आठवड्यात प्रसिद्ध “इंडिया टुमारो : कन्व्हर्सेशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स’ या पुस्तकात नमूद आहेत. पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन मुंबईत गुरुवारी होत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेतील प्रा. प्रदीप छिब्बर आणि याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी हर्ष शहा या पुस्तकाचे लेखक आहेत. यात प्रियंका, राहुल, अरविंद केजरीवाल, सचिन पायलट, अखिलेश यादव यांच्यासह २० तरुण भारतीय नेत्यांच्या मुलाखती आहेत. वाचा या लेखकांचे अनुभव...

विदेशात मला विनासुरक्षा पूर्ण माेकळीक मिळते, त्या देशांतील वैविध्यपूर्ण संस्कृतीची माहिती घेता येते : राहुल

हर्ष सांगतात, राहुल यांनी चर्चेत पॅलेस्टिनी कवी मेहमूद दरवेश यांची एक कविता ऐकवून धक्का दिला. त्यांना वाचनाचाच नव्हे, विविध पक्वान्ने तयार करण्याचाही छंद आहे. विदेशात सुट्यांची मौज करण्यासंबंधीच्या आरोपावर राहुल म्हणाले, मी भारताबाहेर असतो तेव्हा सुरक्षा नसते. मला मोकळीक मिळते. याचा सदुपयोग करून मी त्या-त्या देशातील संस्कृती जाणून घेतो. कोणत्याच विदेश यात्रेकडे मी सुटीची मौज म्हणून पाहत नाही. राजकारणाच्या पलीकडे भारतीय दर्शन, मंगोल लोकांचा इतिहास, महायुद्ध, आखाती देश, पाकिस्तानचा इतिहास, चिनी संस्कृती यावरील पुस्तके वाचनाचा छंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

जीवनातील प्रत्येक घटनेची रोज डायरी लिहिते...पक्षाचा बिगर गांधी अध्यक्ष झाला तरी तो बॉस असेल : प्रियंका

प्रा. छिब्बर व हर्ष सांगतात, प्रियंका स्पष्टवक्त्या आहेत. त्यांनी सांगितले की, पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर आरोप झाले मुलगा अस्वस्थ झाला. प्रियंका म्हणाल्या, “मी त्याच्या शाळेत गेले. कागदपत्रे दाखवली. मुलीलाही समजावले की हे आरोप खोटे आहेत. माध्यमांनी आमचे ऐकूनच घेतले नाही.’ बिगर गांधी काँग्रेस अध्यक्षाच्या राहुल यांच्या भूमिकेलाही त्यांनी पाठिंबा दर्शवला. कोणतीही व्यक्ती पक्षाध्यक्ष असेल तर तो आमचा बॉस असेल, असेही नमूद केले. बालपणीच्या राहुलसोबतच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. वडील राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी महिलेची भेट घेतल्यावर त्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहीत असल्याचेही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...