आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Love Affairs Of Son Charles, Frustrated By Daughter in law Diana; She Was Embarrassed By Kate's Topless Photo

एलिझाबेथ यांच्या घराण्यातील वाद:मुलगा चार्ल्सची प्रेम प्रकरणे, सून डायनामुळे आले नैराश्य्य; केटच्या टॉपलेस फोटोमुळे होत्या लज्जित

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाले आहे. त्या 96 वर्षांच्या होत्या. 70 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही, परंतु या काळात राजघराण्यात तेढ आणि दुरावा निर्माण झाला होता. जरी कुटुंबातील विश्वासाला तडा गेला, अनेक प्रश्न निर्माण झाले तरी एलिझाबेथ यांनी ते हाताळण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक वेळी त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला.

त्यातील सर्वात मोठे वादग्रस्त व्यक्ती ठरले प्रिन्स चार्ल्स, म्हणजेच राणीचा मोठा मुलगा. 40 वर्षांपूर्वी कॅमिला पार्करसोबतच्या त्यांच्या अफेअरमुळे कुटुंबात तेढ निर्माण झाले होते. यानंतर त्यांची पत्नी प्रिन्सेस डायना, मुले हॅरी, सून केट आणि मगन यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. प्रिन्स अँड्र्यूचे नाव देखील आहे, जो राणीचा दुसरा मुलगा होता.

1. राजकुमारी डायना: राजघराण्यातील सर्वात वादग्रस्त आणि संस्मरणीय व्यक्ती

राजकुमारी डायना, राजघराण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वांच्या स्मरणात असलेली राजकुमारी. 24 फेब्रुवारी 1981 रोजी राजघराण्याने 32 वर्षीय प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाची घोषणा केली गेली. राणीचा मोठा मुलगा चार्ल्सची पत्नी त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान होती. नाव होते डायना स्पेन्सर, वय 19 वर्षे.

प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचे लग्न 29 जुलै 1981 रोजी झाले. त्याला वेडिंग ऑफ द सेंचुरी असे म्हटले गेले. सेंट पॉल कॅथेड्रल येथील भव्य समारंभासाठी 48 दशलक्ष डॉलर खर्च करण्यात आले. 74 देशांमध्ये 750 दशलक्ष लोकांनी याचे थेट प्रक्षेपण पाहिले.
प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचे लग्न 29 जुलै 1981 रोजी झाले. त्याला वेडिंग ऑफ द सेंचुरी असे म्हटले गेले. सेंट पॉल कॅथेड्रल येथील भव्य समारंभासाठी 48 दशलक्ष डॉलर खर्च करण्यात आले. 74 देशांमध्ये 750 दशलक्ष लोकांनी याचे थेट प्रक्षेपण पाहिले.

एंगेजमेंटच्या 5 महिन्यांनंतर दोघे पती-पत्नी म्हणून लग्न बंधनात अडकले. डायना आता राजकुमारी झाली होती, पण ती राजघराण्याच्या बाहेरची होती. राजघराण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्याचे त्यांना दडपण येत होते. यामुळे येथे श्वास कोंडत असल्याचे त्यांना वाटत होते.

यातही सर्वात जास्त त्रासदायक ठरले ते प्रिन्स चार्ल्सचे अफेअर. डायनाला लग्नापूर्वीच याची माहिती होती. तिला चार्ल्सशी लग्न करायचं नव्हतं, पण डायना तसे करू शकली नाही, अशी जगभरात चर्चा होती. 11 वर्षांनंतर दोघे वेगळे झाले. डिसेंबर 1992 मध्ये राणीने त्यांना वेगळे राहण्याची परवानगी दिली.

राजकुमारी डायनाने शेकडो वर्षांपूर्वीच्या परंपरांसह राजघराण्याची प्रतिमा बदलली. ब्रिटनच्या लोकांना ते आवडले. वास्तविक ती राजघराण्यामध्ये खूश नव्हती. 'हर ट्रू स्टोरी' या पुस्तकात तीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लिहिले आहे.
राजकुमारी डायनाने शेकडो वर्षांपूर्वीच्या परंपरांसह राजघराण्याची प्रतिमा बदलली. ब्रिटनच्या लोकांना ते आवडले. वास्तविक ती राजघराण्यामध्ये खूश नव्हती. 'हर ट्रू स्टोरी' या पुस्तकात तीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लिहिले आहे.

1992 मध्ये एक पुस्तक आले - डायना: हर ट्रू स्टोरी. त्यात डायनाचे तुटलेले लग्न, चार्ल्स आणि कॅमिला यांचे अफेअर आणि डायनाचे नैराश्य या सर्व गोष्टी होत्या. आता पडद्यामागच्या गोष्टी पुस्तकाच्या रूपाने लोकांच्या हाती लागल्या होत्या. त्यामुळे राजघराण्याला मोठा पेच निर्माण झाला. स्वत: राणी एलिझाबेथ यांनी 1992 हे अत्यंत वाईट वर्ष असल्याचे सांगितले होते.

2. प्रिन्स चार्ल्स: विवाहित महिलेसोबत डेट, डायनाच्या मृत्यूनंतर तिच्याशीच लग्न

प्रिन्स चार्ल्सने लग्न केल्यावर कॅमिला पार्करला डेट करायला सुरुवात केली. त्यांच्या नात्यामुळे राजघराण्यात तणाव निर्माण झाला होता. असे म्हटले जाते की राणी एलिझाबेथने चार्ल्सला समजावून सांगितले, परंतु काही उपयोग झाला नाही.

प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला विंडसर ग्रेट पार्कमधील स्मिथच्या लॉनवर वारंवार भेटत होते. इथे चार्ल्स पोलो खेळायचे. असे म्हटले जाते की, दोघांची पहिली भेट एका पोलो सामन्यादरम्यानच झाली होती. (फोटोमध्ये कॅमिला उजवीकडे आहे)
प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला विंडसर ग्रेट पार्कमधील स्मिथच्या लॉनवर वारंवार भेटत होते. इथे चार्ल्स पोलो खेळायचे. असे म्हटले जाते की, दोघांची पहिली भेट एका पोलो सामन्यादरम्यानच झाली होती. (फोटोमध्ये कॅमिला उजवीकडे आहे)

31 ऑगस्ट 1997 रोजी प्रिन्सेस डायनाचा पॅरिसमध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. तेव्हा ती 36 वर्षांची होती. डायना त्यावेळी तिचा मित्र डोडी अल फयेदसोबत होती. यानंतर चार्ल्स आणि कॅमिला 1999 पासून पुन्हा भेटू लागले. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी एप्रिल 2005 मध्ये लग्न केले.

कॅमिला आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या एंगेजमेंटची घोषणा 10 फेब्रुवारी 2005 रोजी करण्यात आली. चार्ल्सने कॅमिलाला दिलेली हिऱ्याची अंगठी राणी एलिझाबेथ II चा जन्म झाल्यावर आजीला मिळाली होती.
कॅमिला आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या एंगेजमेंटची घोषणा 10 फेब्रुवारी 2005 रोजी करण्यात आली. चार्ल्सने कॅमिलाला दिलेली हिऱ्याची अंगठी राणी एलिझाबेथ II चा जन्म झाल्यावर आजीला मिळाली होती.

महाराणीच्या कारकिर्दीला 70 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त आयोजित कार्यक्रमात राणी एलिझाबेथ यांनी घोषणा केली की, चार्ल्स राजा झाल्यास कॅमिला ब्रिटनची राणी होईल. एलिझाबेथच्या या घोषणेने कॅमिला राजघराण्यातील सदस्य म्हणून दत्तक घेण्यास मान्यता दिली.

3. डायनाचा धाकटा मुलगा हॅरी: पत्नीसाठी राजघराण्यापासून विभक्त

डायनाचा धाकटा मुलगा प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मॅगन हे दोघे 9 जानेवारी 2020 रोजी राजघराण्यापासून वेगळे झाले. ते ब्रिटनमधून अमेरिकेत गेले. प्रिन्स हॅरी आणि मॅगन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, राजघराण्यापासून वेगळे होणे हा खूप कठीण अनुभव होता. जसे एकदा त्याची आई प्रिन्सेस डायनासाठी झाले असते.

हॅरी म्हणाला की, त्याच्या आईची अवस्था किती वाईट झाली असेल याची कल्पनाही करू शकत नाही. हॅरीची पत्नी मॅगन ही एक फिल्म स्टार होती आणि ती गैर-ब्रिटिश होती. ती डायनासारखीच जगली. बाहेरचे लोक त्याला आवडतात. मॅगनला तिच्या जीवनशैलीमुळे राजघराण्याच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यामुळे हॅरी त्याच्या कुटुंबापासून दूर होता.

4. प्रिन्स विल्यमची पत्नी केट: मॅगझिनमध्ये छापले टॉपलेस छायाचित्र

2012 मध्ये, प्रिन्स विल्यमची पत्नी केट मिडलटनचा टॉपलेस फोटो एका फ्रेंच मॅगझिनमध्ये आला होता. यामुळे राजघराण्यातून संताप व्यक्त करण्यात आला. स्वतः प्रिन्स विल्यम यांनी याचे वर्णन दुःखद असे केले होते. या प्रकरणी मासिकाशी संबंधित 6 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

केट मिडलटनवर तिचा मेहुणा प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मार्केल यांच्याशी वाद झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावर राजघराण्याने मौन बाळगले. जेव्हा केट मिडलटन तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार होती तेव्हा तिची काळजी घेणाऱ्या नर्सने आत्महत्या केली. याबाबत राजघराण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

5. प्रिन्स अँड्र्यू: अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपामुळे साडावे लागले पद

राजघराण्याच्या इतिहासातील सर्वात मोठा पेच प्रिन्स अँड्र्यूमुळे निर्माण झाला होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. 2019 मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणाला 'एपस्टाईन स्कँडल' असे म्हटले गेले. यानंतर प्रिन्स अँड्र्यू यांना दिलेली ड्यूक ऑफ यॉर्क ही पदवी काढून घेण्यात आली. त्याला त्याच्या नावासोबत हिज रॉयल हायनेस वापरण्याचा अधिकारही देण्यात काढून घेण्यात आला.

ब्रिटीश सिंहासनाच्या दाव्यात प्रिन्स अँड्र्यू नवव्या क्रमांकावर होते. आरोपांनंतर अँड्र्यूने आपल्यावरही सर्व शाही कर्तव्ये सोडून दिले.

बातम्या आणखी आहेत...