आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. राधाकृष्णन यांनी थोपटले होते माओचे गाल:हुकूमशहा स्टॅलिनच्या केसात फिरवला हात, म्हणाले - तुमची भेट सहज का होत नाही?

नीरज सिंह25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

1939 ची घटना आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला पत्र पाठवून त्यांना कायमचे भारतात येण्याचे आमंत्रण दिले. तत्त्वज्ञानाचे हे प्राध्यापक तेथे संपूर्ण जगाला धर्म आणि नैतिकतेचे धडे देत होते. प्राध्यापकानेही आनंदाने आमंत्रण स्वीकारले आणि ऑक्सफर्डमधील नोकरी सोडून ते भारतात आले.

हे प्राध्यापक दुसरे तिसरे कोणी नसून तामिळनाडूमधील स्थानिक जमीनदारासाठी जमीन मोजणी करणारे सर्वपल्ली वीरस्वामी यांचे पुत्र डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होते. ज्यांना पंडित मदन मोहन यांनी त्यांना बनारस हिंदू विद्यापीठाचे म्हणजेच बीएचयूचे कुलगुरू केले. वयाच्या 20 व्या वर्षापासून तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या डॉ. राधाकृष्णन यांच्यासाठी हा टर्निंग पॉइंट ठरला.

यानंतर या प्राध्यापकाने राजकारण आणि मुत्सद्देगिरीचा दरवाजा ठोठावला. त्यांचा वेग इतका जास्त होता की, डॉ. राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती झाले.

जेव्हा एखादा शिक्षक मुत्सद्दी बनतो तेव्हा तो माओ किंवा स्टॅलिनसारख्या हुकूमशहांच्या गालावर थोपटून किंवा केसांना हात लावून शिष्यासारखे कसे बोलू शकतो, ही त्याचीच कथा आहे.

आज संपूर्ण देश डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतोय.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी बीएचयूमध्ये 9 वर्षे घालवली होती. त्यांच्या कार्यकाळात ब्रिटीशांना बीएचयू कॅम्पसमधून हाकलण्यात आले होते.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी बीएचयूमध्ये 9 वर्षे घालवली होती. त्यांच्या कार्यकाळात ब्रिटीशांना बीएचयू कॅम्पसमधून हाकलण्यात आले होते.

वास्तविक, बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर राधाकृष्णन पहिल्यांदाच जवाहरलाल नेहरूंच्या संपर्कात आले. येथूनच त्यांना स्वातंत्र्य चळवळ जवळून पाहण्याची संधी मिळाली.

ते कधीच काँग्रेसमध्ये नव्हते. किंवा त्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी थेट संबंध नव्हता. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली तेव्हा डॉ. राधाकृष्णन यांना सदस्य करण्यात आले.

15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जगाची दोन ध्रुवांमध्ये विभागणी झाली हा तोच काळ होता. एकीकडे अमेरिकेचे नेतृत्व भांडवलशाही पाश्चात्य देश करत होते, तर दुसरीकडे कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालील विशाल सोव्हिएत युनियन आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने सोव्हिएत युनियनच्या जवळ असलेले देश.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1949 पर्यंत तटस्थेचा विचार सुरू केला होता. भारतासारख्या नव्या देशांनी मोठ्या शक्तींच्या या लढाईपासून दूर राहिले पाहिजे, असे त्यांचे मत होते.

दुसरीकडे संविधान जवळपास तयार झाले होते. त्यानंतर नेहरूंनी डॉ. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि त्यांना संविधान सभा सोडण्यास सांगितले. खरे तर राधाकृष्णन यांना सोव्हिएत युनियनमध्ये भारताचे राजदूत बनवण्याचा निर्णय नेहरूंनी घेतला होता. दोन गटात विभागलेल्या जगासोबत चर्चा करण्यासाठी त्यांना चारित्र्यावान व्यक्तीची आवश्यकता होती. जो या शक्तिशाली देशांच्या शक्तिशाली नेत्यांना भारताची भूमीका पटवून देऊ शकेल.

राधाकृष्णन यांनी 12 जुलै 1949 रोजी पदभार स्वीकारला. सर्वांना प्रश्न पडला की, तत्त्वज्ञानाच्या शिक्षकाला सोव्हिएत युनियनसारख्या कम्युनिस्ट हुकूमशाहीकडे का पाठवण्यात आले?

राधाकृष्णन यांना 1957 मध्ये राष्ट्रपती बनवण्याची तयारी नेहरूंनी केली होती, परंतु राजेंद्र प्रसाद यांनी पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी माघार घेतली.
राधाकृष्णन यांना 1957 मध्ये राष्ट्रपती बनवण्याची तयारी नेहरूंनी केली होती, परंतु राजेंद्र प्रसाद यांनी पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी माघार घेतली.

स्टॅलिन इतके प्रभावित झाले की 5 मिनिटांची बैठक 3 तास चालली

मॉस्कोला पोहोचल्यावर राधाकृष्णन यांची सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिन यांच्याशी औपचारिक भेट होणार होती, पण स्टॅलिनने 6 महिने भेट दिली नाही. 14 जानेवारी 1950 रोजी राधाकृष्णन यांना स्टॅलिनच्या वतीने बैठकीसाठी बोलावण्यात आले. रात्री 9 वाजताची वेळ देण्यात आली होती. गंमत म्हणजे स्टालिन रात्री 12 वाजल्यानंतरच इतर देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटायचे.

के सच्चिदानंद मूर्ती आणि अशोक वोहरा यांनी लिहिलेल्या Radhakrishnan His Life and Ideas या पुस्तकाच्या 12व्या भागात या विशेष भेटीचे संदर्भ दिले आहेत. पुस्तकाच्या पान क्रमांक 121 वर उल्लेख आहे - अभिवादनानंतर राधाकृष्णन यांनी स्टॅलिनला पहिला प्रश्न विचारला - मिस्टर चेयरमॅन, तुम्हाला भेटणे इतके अवघड का आहे?

स्टॅलिनने उत्तर दिले- मला भेटणे खरोखर इतके अवघड आहे का, पाहा तुम्ही आणि मी तर भेटलो आहोत. या संवादाने दोघांमधील वातावरण इतकं सुखकर झालं की, अवघ्या 5 मिनिटांसाठी ठरलेली ही भेट तब्बल 3 तास चालली.

या संभाषणादरम्यान राधाकृष्णन स्टॅलिन यांना मार्शल आणि स्टॅलिन हे प्रोफेसर राधाकृष्णन असे संबोधत करत होते.

राधाकृष्णन यांनी नंतर काही लोकांना सांगितले होते की, या संवादादरम्यान मी एकदा स्टॅलिनच्या केसांवरुनह हात फिरवला होता. आता हा संवाद कोणत्या विषयावर होता, याचा कुठेही उल्लेख नाही.

के सच्चिदानंद यांच्या या पुस्तकानुसार, राधाकृष्णन यांनी स्टॅलिनला सम्राट अशोकाची कथा सांगितली, ज्याने कलिंगावर प्रहार केल्यावर युद्ध सोडले आणि ते बौद्ध भिक्षू बनले. राधाकृष्णन यांनी स्टॅलिनला सांगितले की, तुम्हीही ताकदीच्या जोरावर सत्तेचा मार्ग मोकळा केला आहे. माहिती नाही, असे काही तुमच्या बाबतीत घडले तर?

राधाकृष्णन यांच्या या वक्तव्याला स्टॅलिन काय उत्तर देणार? ते गेल्यानंतर स्टॅलिनने आपल्या दुभाष्याला सांगितले की, या माणसाला राजकारण माहित नाही, तो फक्त मानवतेचा भक्त आहे.

चिनी नेते माओ यांचेही गाल थोपटले

ही घटना 1957 ची आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तेव्हा उपराष्ट्रपती होते आणि चीनच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ते प्रसिद्ध चिनी नेते माओ यांना भेटणार होते. माओ यांनी राधाकृष्णन यांना त्यांच्या घरी बोलावले.

राधाकृष्णन चुग नान हाई येथे माओच्या घरी पोहोचले. दोन्ही नेत्यांनी अंगणातच हस्तांदोलन केले. येथे काय करावे हे न समजल्याने राधाकृष्णन यांनी माओच्या डाव्या गालावर थोपटले. माओ काही बोलायच्या आधीच राधाकृष्णन म्हणाले- अध्यक्ष महोदय, नाराज होऊ नका. मी स्टॅलिन आणि पोप यांच्याशी देखील अशी आत्मीयता दर्शविली आहे.

जेव्हा सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्रपती म्हणून चीनला गेले, तेव्हा माओने निवासस्थान चुंग नान हाई च्या अंगणात त्यांचे स्वागत केले.
जेव्हा सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्रपती म्हणून चीनला गेले, तेव्हा माओने निवासस्थान चुंग नान हाई च्या अंगणात त्यांचे स्वागत केले.

वयाच्या 20 व्या वर्षी बनले तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक

सर्वपल्ली राधाकृष्णन हे एकमेव राष्ट्रपती आहेत ज्यांनी दोन शेजारी राष्ट्रांशी दोन युद्धांचा सामना केला. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांसारख्या दिग्गज पंतप्रधानांचेही निधनही पाहिले.

1926 साली अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाची 6वी आंतरराष्ट्रीय परिषद झाली. सर्वपल्ली राधाकृष्णनही त्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. आधुनिक सभ्यतेतील अध्यात्माच्या अभावावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

तामिळनाडूतील स्थानिक जमीनदाराचे सहाय्यक महसूल अधिकारी सर्वपल्ली वीरस्वामी यांच्या मुलाने अमेरिकेत धुमाकूळ घातला होता. यापूर्वी स्वामी विवेकानंदं यांचीही अशाच चर्चेत 1893 मध्ये सहभाग घेतला होता.

1926 मध्येच डॉ. राधाकृष्णन यांचे The Hindu View Of Life हे प्रसिद्ध पुस्तक प्रकाशित झाले, ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केले. यानंतर त्यांचे दुसरे पुस्तक The Idealist View of Life 1929 मध्ये प्रकाशित झाले. या दोन पुस्तकांद्वारे राधाकृष्णन यांनी पाश्चिमात्य जगाला हिंदू जीवन, धर्म आणि तत्त्वज्ञान यांची ओळख करून दिली.

याआधी, भारतीय जीवनशैली पाश्चात्य जगात एक रहस्य मानली जात होती.

1909 मध्ये वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी राधाकृष्णन यांना मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजच्या तत्त्वज्ञान विभागात नोकरी मिळाली.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे ब्रिटिश अकादमीसाठी निवडलेले पहिले भारतीय फेलो होते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे ब्रिटिश अकादमीसाठी निवडलेले पहिले भारतीय फेलो होते.

मुस्लिम लीगची पाकिस्तान निर्माण करण्याची मागणी फेटाळली

he White Umbrella: Indian Political Thought from Manu to Gandhi या पुस्तकासह भारताच्या राजकीय इतिहासावर अनेक पुस्तके लिहिणारे अमेरिकन लेखक डोनाल्ड मॅकेंजी यांनी त्यांचे पुस्तक Nationalist Movement: Indian Political Thought from Ranade to Bhave मध्ये लिहिले की, त्यांनी (राधाकृष्णन) पाश्चात्य हिंदू संस्कृतीवर टीका करणाऱ्या पाश्चात्यांच्या विरोधात संस्कृतीचे रक्षण केले होते. त्यांनी भारतीयांच्या बौद्धिक परंपरा त्यांच्या वैभवात मांडल्या होत्या.

त्याचवेळी राधाकृष्णन यांचा नोव्हेंबर 1944 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सप्रू समितीमध्ये समावेश करण्यात आला. या समितीने मुस्लिम लीगची पाकिस्तान निर्माण करण्याची मागणी फेटाळून लावली. स्वतंत्र देश कोणत्याही समाजासाठी फायदेशीर ठरणार नाही, असे समितीचे मत होते. समितीने एक संविधान सभा स्थापन करण्याची शिफारस केली ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमांची संख्या समान असेल.

सर्वपल्ली राधाकृष्णन 13 मे 1962 रोजी देशाचे दुसरे राष्ट्रपती बनले. तेव्हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ बर्टांड रसेल म्हणाले की, तत्त्वज्ञानासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
सर्वपल्ली राधाकृष्णन 13 मे 1962 रोजी देशाचे दुसरे राष्ट्रपती बनले. तेव्हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ बर्टांड रसेल म्हणाले की, तत्त्वज्ञानासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

वडिलांना राधाकृष्णन यांना पुजारी बनवायचे होते

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राधाकृष्णन यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी पुढील शिक्षण घेण्याऐवजी मंदिरात पुजारी व्हावे. वास्तविक, राधाकृष्णन यांना त्यांच्या प्रतिभेतून मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून शिष्यवृत्ती मिळवली आणि 1906 मध्ये ते बी.ए. मध्ये प्रथम आले.

आवड होती भौतिकशास्त्राची, योगायोगाने केले तत्वज्ञानात एम.ए

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1906 मध्ये तत्त्वज्ञानात एमए केले. यातही एक योगायोग होता. राधाकृष्णन यांना भौतिकशास्त्रात एमए करायचे होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे राधाकृष्णन यांच्याकडे पुस्तके विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते.

त्याचे असे झाले की, त्यांच्या चुलत भावाने त्याच महाविद्यालयातून एमए केले होते आणि त्यांनी राधाकृष्णन यांना तत्त्वज्ञानाची पुस्तके दिली होती. यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही तत्त्वज्ञानात एमए करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांनी फुलांनी सजवलेल्या बग्गीला हाताने ओढून दिला निरोप

डॉ. राधाकृष्णन हे त्यांच्या साधेपणामुळे आणि ज्ञानामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. याचा अंदाज 1921 च्या घटनेवरून लावता येईल. ते म्हैसूर विद्यापीठ सोडून कलकत्ता विद्यापीठात जात असताना विद्यार्थी खूप भावूक झाले होते. विद्यार्थ्यांनी त्याला भव्य निरोप देण्याची योजना तयार केली.

विद्यार्थ्यांनी एका बग्गीची व्यवस्था करून ती फुलांनी सजवली. निरोप समारंभ आटोपून राधाकृष्णन सभागृहाबाहेर आले तेव्हा फुलांनी सजलेली ही गाडी बाहेर उभी होती, पण ही गाडी ओढायला घोडे नव्हते. राधाकृष्णन आश्चर्यचकित झाले. अचानक काही विद्यार्थी पुढे आले आणि त्यांनी हाताने बग्गी ओढण्यास सुरुवात केली. या विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने आपल्या लाडक्या शिक्षकाला म्हैसूर रेल्वे स्थानकावर सोडले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा काही विद्यार्थ्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्यावर त्यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केल्यास अभिमान वाटेल, असे उत्तर दिले होते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा काही विद्यार्थ्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्यावर त्यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केल्यास अभिमान वाटेल, असे उत्तर दिले होते.

राज्यसभेत संतप्त सदस्यांना श्लोक म्हणून दाखवायचे

जेव्हा उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी राज्यसभेच्या अधिवेशनाचे सभापती पद भूषवले तेव्हा ते अतिशय साधेपणाने आणि शांतपणे प्रतिक्रिया देत. सदस्याला कोणत्याही मुद्द्यावर राग आला की, ते श्लोक म्हणून त्याचा अर्थ सांगत होते. त्यांच्यातील हा गुण अनेकांना आवडला होता.

बातम्या आणखी आहेत...