आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शून्यातून गाठले शिखर:पायलट ट्रेनिंगनंतर नोकरी मिळाली नाही, मग उधार घेऊन सुरू केला कापड उद्योग

नवी दिल्ली (रितेश शुक्ल)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 65 लाख रु. खर्च करून सौम्या पायलट बनली, पण मंदी आली; आता रोज 10 हजार ड्रेसची विक्री
Advertisement
Advertisement

सन २००८ च्या आर्थिक मंदीत कानपूरच्या सौम्याचे स्वप्नही भंगले. त्या वेळी १९ वर्षीय सौम्याने ६५ लाख रुपये खर्च करून अमेरिकेत पायलटचे प्रशिक्षण घेतले होते. परंतु नोकरी मिळाली नाही म्हणून जिम रिसेप्शनिस्ट तसेच कॉल सेंटरमध्येही काम केले. मग उधार घेऊन स्वत:चा कापड उद्योग सुरू केला. आज तिच्या कंपनीत ३५ लोक काम करतात. तिने डिझाइन केलेले १० हजार ड्रेस दररोज विकले जातात.

सौम्या म्हणते,सन २००६ मध्ये माझे करिअर सुरू होण्यापूर्वीच संपले. ट्रेनिंगनंतर नोकरी मिळणे निश्चित होत, परंतु अचानक उद्योगाविश्वातच अनिश्चितता पसरली. अमेरिकेत सब प्राइम समस्येमुळे लिमन ब्रदर्ससारख्या बड्या बँका आणि अमेरिकन इन्शुरन्स ग्रुप दिवाळखोर झाला. सन २००८ हे पूर्ण वर्ष नोकरी शोधण्यात घालवले. अखेर दरमहा ५ हजारांची जिम रिसेप्शनिस्टची नोकरी धरली. काही दिवसांनंतर एका कॉल सेंटर जॉइन केले. रात्री काम करून दिवसा नोकरी शोधत होते. त्याचवेळी  रॉबर्टो कवाली आणि गॉटियरसारख्या ब्रँडेड कपड्यांची आयात-निर्यात करणाऱ्या एका महिलेशी माझी ओळख झाली. मी त्यांच्याकडून २० ड्रेस उधार घेतलेे आणि मित्रांसाठी घरीच त्याचा सेल लावला. एका तासात १०० टक्के नफा झाला. ही २००९ ची गोष्ट.

मी कॉल सेंटरची नोकरी सोडून कपड्यांच्या उद्योगात प्रवेश केला. स्नॅपडिल,फ्लिपकार्ट आणि इतर छोट्या-मोठ्या ऑनलाइन प्लॅटफार्मवर कपडे विकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आज माझी कंपनी दररोज १० हजार ड्रेस विकते. कंपनीचे कामही अमेरिकेहून चालते. कॅनडा आणि युरोपमध्येही उद्योग सुरू केला आहे. 

आता मास्कची निर्यात : सौम्या म्हणतात, कोरोनाची साथ आल्याने मला २००८ मध्येच गेल्यासारखे वाटते आहे. फरक एवढाच की आज माझी ९ आकड्यांची कमाई सुरू आहे. ड्रेसची विक्री घटली तर मास्कची निर्यात सुरू केली आहे.

Advertisement
0