आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Digi Yatra Policy Explained; What Is A Digi Yatra Scheme? New Digital Experience For Paperless And Hassle Free Air Travel

एक्सप्लेनर:देशातील 6 विमानतळांवर वर्षाच्या अखेरीस नवीन सुविधा, आपला चेहराच असेल आता बोर्डिंग पास; जाणून घ्या काय आहे फेशिअल रेकग्निशन सिस्टम?

जयदेव सिंह/आबिद खान9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • विमानतळांवर चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याची योजना आहे.

विमानतळावर गेल्यावर प्रवाशांना सर्वप्रथम त्यांचे बोर्डिंग पास आणि ओळखपत्र दाखवावे लागते. पण आता मात्र तुम्हाला बोर्डिंग पास किंवा आयडी प्रूफची गरज भासणार नाही. कारण आता विमानतळावर प्रवेश केल्यापासून आपला चेहराच बोर्डिंग पास आणि आयडी प्रूफ म्हणून काम करेल. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नवीन योजनेंतर्गत देशातील विमानतळांवर चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञाना (फेशिअल रिकग्निशन सिस्टम) चा वापर सुरू करण्याची योजना आहे. 'डिजी यात्रा' नावाची ही योजना सुरू झाल्यानंतर विमानतळाची सुरक्षा व्यवस्थाही आणखी मजबूत होईल, असा दावा केला जात आहे. लवकरच या यंत्रणेची चाचणी सुरु होणार असल्याचे कोलकाता विमानतळाने नुकतेच जाहीर केले आहे.

चेह-यावरील ओळख तंत्रज्ञानाला कधी आणि कुठून सुरुवात होणार आहे? हे तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय आणि ते कसे कार्य करते? डिजी यात्रा योजना काय काय? नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर सामान्य प्रवाशांसाठी आणि विमानतळावर काय बदल होणार आहेत? चला जाणून घेऊया...

 • विमानतळांवर चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाला केव्हा आणि कुठून सुरुवात होईल?

यावर्षीच्या मार्च महिन्यात सरकारने लोकसभेत सांगितले होते की, वर्षाच्या अखेरीस विमानतळांवर चेहर्‍यावरील ओळख तंत्रज्ञानाला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात ही सुविधा कोलकाता, वाराणसी, पुणे, विजयवाडा, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सुरू होईल. सध्या या तंत्रज्ञानाची चाचणी देशातील वेगवेगळ्या विमानतळांवर सुरू आहे. 6 सप्टेंबर 2020 रोजी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 येथे या योजनेची चाचणी घेण्यात आली. बंगळुरू आणि मुंबई विमानतळांवर यापूर्वीच हे काम सुरु झाले आहे. जुलै 2019 मध्ये हैदराबाद विमानतळावरही याची चाचणी घेण्यात आली आहे. कोलकाता विमानतळावर लवकरच या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होणार आहे.

 • चेह-यावरील ओळख तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत?
 1. प्रवाशांना विविध चेक पॉइंट्वर बोर्डिंग पास किंवा ओळखपत्र दाखवावे लागणार नाही.
 2. बोर्डिंग प्रक्रियेस कमी वेळ लागेल आणि प्रवाशांना लांबलचक रांग टाळता येईल.
 3. विमानतळाची सुरक्षा व्यवस्थाही आणखी मजबूत होईल आणि प्रत्येक चेक पॉइंटवर फक्त प्रवाशालाच प्रवेश मिळेल.
 4. एअरपोर्ट ऑपरेटरजवळ प्रवाशांचा रिअल टाइम डेटा असेल. यामुळे पेसेंजर लोड आणि रिसोर्स प्लानिंग उत्तम होण्यास मदत होईल.
 • ही डिजी यात्रा योजना काय आहे?

पेपरलेस बोर्डिंग नागरी उड्डयन मंत्रालयाच्या DIGI YATRA योजनेचा एक भाग आहे. याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एकदा आधार, पासपोर्ट किंवा इतर कोणत्याही ओळखपत्रासह डेटाबेसमध्ये आपल्या चेहर्‍याची ओळख पटवावी लागेल. विमान वाहतूक मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून प्रवाशांना डीवाय आयडी क्रमांक तयार करावा लागणार आहे. विमानतळावर या डीवाय आयडीचा प्रथम वापर करताना शारीरिक पडताळणी केली जाईल. यानंतर विमानाचे तिकीट काढताना प्रवाशांना हा नंबर द्यावा लागेल. जेव्हा आपण विमानतळावर पोहोचाल तेव्हा डेटाबेसमध्ये आपल्या चेहऱ्यावरील ओळखीची एंट्री मिळेल. आपणास या सुविधेचा लाभ घ्यायचा नसेल तर विमानतळावर कागदी तिकिटे आणि ओळखपत्र दाखवून बोर्डिंगची सुविधा अबाधित राहील.

 • फेशिअल रेकग्निशन तंत्रज्ञान म्हणजे काय?

चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञान याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या चेह-याने करणे. ही पेपरलेस आणि टचलेस एअरपोर्ट बोर्डिंग सिस्टम एनईईसीनुसार आगमन, सुरक्षितता तपासणी आणि निर्गमनानंतर प्रस्थान करण्याचे अधिकार असलेल्या प्रवाशाला ओळखते.

 • हे तंत्रज्ञान विमानतळावर कसे कार्य करेल?

दुबईच्या विमानतळावर या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. ज्या प्रवाशांनी यात नोंदणी केली आहे त्यांना विमानतळाच्या वेगवेगळ्या गेटवर कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. त्यांना फक्त पाच मिनिटांसाठी वेगळ्या गेटवर असलेल्या कॅमेर्‍याकडे पहावे लागेल आणि त्यानंतर ते पुढे जाऊ शकतात. या तंत्रानंतर इमिग्रेशन प्रक्रियेस वेग आला आहे.

 • कोरोना काळात फेस मास्क घातल्यानंतरही हे तंत्र कार्य करेल?

हे तंत्रज्ञान दुबईमध्ये वापरण्यात येत आहे. येथे जे लोक फेशिअल रेकग्निशन ऑप्शनची निवड करतात, त्यांना कॅमे-यात बघताना मास्क आणि चष्मा काढायला सांगितले जाते. सध्या तरी मास्कसह हे तंत्रज्ञान चेहरा रीड करु शकत नाही. सध्या टेक एक्सपर्ट्स यावर काम करत आहेत.

 • प्रवासानंतर आपल्या डेटाचे काय होईल?

डिजिटलायझेशननंतर यूजरच्या गोपनीयतेविषयी दररोज बातम्या चर्चेत आहेत. डेटा प्रायव्हसीविषयी डिजी यात्रा धोरणात स्पष्ट सूचना आहेत. प्रवाशाचा डेटा प्रवासाच्या 1 तासानंतर किंवा प्रवास पूर्ण होताच सिस्टमवरून हटवला जाईल. परंतु अद्यापपर्यंत रजिस्ट्रेशन करणा-याचा फोटो कसा स्टोअर केला जाईल, याबाबत स्पष्टता नाही. पण सोबतच हा पर्याय पर्यायी असेल. त्यामुळे आपणाला हवं असल्यास तुम्ही या पर्यायाची निवडू शकता अन्यथा नाही.

बातम्या आणखी आहेत...